मित्सुई अॅण्ड कं. इंडिया प्रा. लि. भारतात आणणार जपानमधील आघाडीचा बेबी डायपर ब्रॅण्ड

मित्सुई अॅण्ड कंइंडिया प्रालिभारतात आणणार 
जपानमधील आघाडीचा बेबी डायपर ब्रॅण्ड

जपानची प्रमुख एफएमसीजी कंपनी असलेल्या काओ कॉर्पोरेशनचे उत्पादन असलेल्या मेरिसचे लॉन्चिंग

३० जुलै २०१८ : अॅण्ड कंइंडिया प्रालि.ने केलीजपानच्या एफएमसीजीमधील मोठी कंपनीअसलेल्या काओ कॉर्पोरेशनच्या तीन प्रमुख ब्रॅण्डपैकी एक ब्रॅण्ड मेरिस आहेया कंपनीला विक्रीतून वर्षाला १०० अब्ज येन एवढे उत्पन्न मिळतेटेप आणि पॅण्ट्स डायपरच्या विक्रीमूल्याच्या हिस्सेदारीबाबत जपानच्याबेबी डायपर मार्केटमधील आघाडीचा प्रीमियम ब्रॅण्ड म्हणून या कंपनीने सलग ११ वर्षे आपले स्थान अबाधित राखले आहेभारतात बेबी डायपर मार्केटच्या वाढीला पोषक वातावरण असल्याने मेरिसच्या माध्यमातूनमित्सुई अॅण्ड कंइंडिया प्रालि.नेही बाजारपेठेत उतरण्याचे ठरविले असून देशात तो प्रीमिय बेबी डायपर ब्रॅण्ड म्हणून अव्वल ठरेल.

मेरिसच्या उत्पादनांमध्ये टेप आणि पॅण्ट डायपर तसेच त्वचाची निगा राखणाऱ्या उत्पादनांचा समावेश आहेमित्सुई अॅण्ड कंइंडिया प्रालिया कंपनीने भारतात टेप आणि पॅण्ट डायपर्स उपलब्ध केले असून त्यांचीविक्री केवळ अॅमेझॉनवर (https://www.amazon.in/b?node=15329486031करण्यात येत आहेमेरिस टेप आणि पॅण्ट डायपर हे लहान बाळांच्या त्वचेच्या दृष्टीने अतिशय मुलायम असून तेच याब्रॅण्डचे प्रमुख वैशिष्ट्य आहेटेप डायपरमध्ये त्रिस्तरीय एअर-थ्रू सिस्टीम आहेपहिला स्तर काहीसा हवेशीर असून त्यातील विशिष्ट प्रकारची जाळी बाळाच्या त्वचेला डायपरचा थेट स्पर्श होऊ देत नाहीडायपर आणित्वचा यातील या अंतराद्वारे ओलावा आणि कोंदटपणा रहात नाहीदुसरा स्तर द्रवशोषक असून जो द्रव शोषून घेतो आणि ओलावा होऊ देत नाहीतिसरा स्तर हा ओलाव आणि द्रावापासून निर्माण होणारी उष्णातापूर्णपणे काढून टाकण्यासाठी सहाय्यभूत आहेतर दुसरीकडे पॅण्ट डायपरमध्ये कंबरेजवळील भाग वैशिष्ट्यपूर्णरीत्या हवेशीर ठेवण्यात आला आहेकंबरेभोवती असलेला डायपरचा भाग आणि त्वचा यामध्ये ठेवण्यातआलेल्या पोकळीद्वारे उष्णता आणि ओलावा थेट बाहेर निघून जातोओलावा आणि उष्णता निर्माण होऊन डायपरमुळे पुरळ तयार होते; परंतु मेरिसच्या या तंत्रज्ञानामुळे बेबीच्या त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेतलीजातेयाव्यतिरिक्त स्मॉल आणि मीडियम आकाराचे मेरिस पॅण्ट डायपर हे उत्पादनाच्या तुलनेत अडीचपट अधिक ताणले जातातत्यामुळे ते बाळाचे उदर आवळले जाणार नाहीअशा प्रकारे योग्यरीतीने हे डायपरबाळांना घालता येतात.

भारतीय डायपर उद्योग हा सध्या सुमारे . अब्ज नगांवर किंवा ८०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहेसन २०२२पर्यंत हा उद्योग सुमारे १० अब्ज नगांवर किंवा १४०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवरपोहोचण्याची शक्यता आहेवाढता जन्मदरउच्च उत्पन्नआरोग्याबाबतची जागरूकता आणि नोकरदार महिलांच्या संख्यत होणारी वाढ हे सर्व घटक बाजारपेठेच्या वाढीस चालना देणारे आहेतगेल्या काही वर्षांतडायपरच्या खरेदीबाबतची ग्राहकांची मानसिकता देखील बदलली आहेसुरुवातीला डायपरच्या शोषणाची क्षमता पाहिली जायचीपण आता हवेशीरपणा आणि कापडाचा मुलायमपणा यांना देखील महत्त्व दिले जातआहे.

भारतात मेरिस लॉन्च करीत असल्याच्या निमित्ताने मित्सुई अॅण्ड कंइंडिया प्रालि.चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीहिरोमिची यागी म्हणाले`अत्यंत दर्जेदार बेबी डायपरच्या उत्पादनामध्ये काओकार्पोरेशन ही आशियात अव्वल असून तिच्या एकूण उत्पादनांमध्ये मेरिस हे जास्त मागणी असलेले उत्पादन आहेआमच्या दृष्टीने वाढीसाठी भारतात अतिशय पूरक वातावरण आहे आणि दरवर्षी अंदाजे २५ दशलक्षबाळांचा जन्म होत असतानाही बेबी डायपर वापरण्याचे प्रमाण हे अद्याप  टक्क्यांहून कमी आहे८० अब्ज डायपरच्या वापराची क्षमता असताना देखील देशात सध्या . अब्ज नगांचा वापर होत आहेआता मेरिसलॉन्च केल्यानंतर ही संख्या वाढेलअशी आम्ही आशा करतो.`

भारतातील वितरण व्यवस्था आणि मार्केटिंगच्या धोरणाबाबत श्रीयागी पुढे म्हणाले`सध्या आम्ही जपानमधून भारतात मेरिसची आयात करीत आहोतआमच्या वेअरहाऊसमध्ये ते साठवून ठेवत असून ते केवळअॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध आहेतआमच्या मार्केटिंगचा भाग म्हणून आम्ही मेरिसच्या दर्जाबाबत ग्राहकांचे काम मत आहेहे जाणून घेणार आहोत.`

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24