ओलेक्ट्रा ग्रीनटेकने सादर केली 'eBuzz K6 LuXe' लक्झरी इलेक्ट्रिक बस
ओलेक्ट्रा ग्रीनटेकने सादर केली 'eBuzz K6 LuXe' लक्झरी इलेक्ट्रिक बस
ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडने आज त्यांची पहिली लक्झरी मिनी बस सादर करून आपल्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एका स्टेट ऑफ दि आर्ट मॉडेलची भर घातली. भारतामध्ये निर्मित शून्य उत्सर्जनअसलेली eBuzz K6 LuXe हि इलेक्ट्रिक बस या वर्गातील देशातील पहिली इलेक्ट्रिक बस आहे. पर्यायी ऊर्जा वापरून हाय एन्ड प्रवाशांना सर्व सुविधांनी युक्त असा प्रवास अनुभव देणे हे या बसचे लक्ष्यआहे. यावर्षी जागतिक पर्यावरण दिवसाला K6 चे २२ प्रवासी क्षमता असलेले दुसरे मॉडेल लाँच करण्यात आले होते आणि या बस नेपाळला निर्यात केल्या होत्या. हि बस भारतीय बाजारपेठेसाठीहीउपलब्ध आहे.
अतिशय सुंदर डिझाईन असलेल्या या वातानुकूलित बसची प्रवासी क्षमता ११ प्रवासी आणि चालक एवढी आहे. हि बस सपाट रस्ते, खडबडीत रस्ते, डोंगराळ भागातील रस्ते किंवा वळणावळणाच्याकंटाळवाण्या रस्त्यांवरही प्रवाशांना अतिशय सुलभ अशी वाहतूक देते. या विद्युत बसेसची निर्मिती जगातील सर्वात मोठ्या विद्युत वाहन कंपनी असलेल्या बीवायडी ऑटो इंडस्ट्री कंपनी लिमिटेडबरोबर धोरणात्मक भागीदारी असलेल्या ओलेक्ट्रा ग्रीनटेकने भारतामध्ये केली आहे.
या बसची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:
- भारतामध्ये निर्मित पहिली लक्झरी इलेक्ट्रिक बस
- ७ मीटर ओलेक्ट्रा eBuzz K6 LuXe एका चार्जमध्ये 200 Kms चालते
- मजबूत गाडी आणि शक्तिशाली इंजिन ज्यामुळे खडतर डोंगराळ रस्त्यांवर आणि सपाट रस्त्यांवरदेखील अतिशय सुलभ अशी वाहतूक देते
- जगातील सर्वात मोठ्या विद्युत वाहन कंपनी असलेल्या बीवायडी ऑटो इंडस्ट्री कंपनी लिमिटेड बरोबर धोरणात्मक भागीदारी अंतर्गत बसेसची निर्मिती
- प्रगत अशी Li-ion बॅटरी जी फक्त ३ ते ४ तासांमध्ये चार्ज होते
Comments
Post a Comment