नॅशनल बल्क हँडलिंग कॉर्पोरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ म्हणून श्री. रमेश दोरायस्वामी यांची नियुक्ती

नॅशनल बल्क हँडलिंग कॉर्पोरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ म्हणून श्री. रमेश दोरायस्वामी यांची नियुक्ती


नॅशनल बल्क हँडलिंग कॉर्पोरेशन (एनबीएचसी) हा अॅग्री कमोडीटीच्या अद्ययावत कमोडीटी अँड कोलॅटेरल मॅनेजमेंट सर्विसेसचा भारतातील अग्रगण्य पुरवठादार आहे. त्यांचे नवनिर्वाचित मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ म्हणून श्री. रमेश दोरायस्वामी यांची नियुक्ती 1 नोव्हेंबर, 2018 पासून करण्यात आल्याची घोषणाकेली. त्यानी कंपनीला धोरणात्मक मार्गदर्शन आणि नेतृत्व पुरवणारेएनबीएचसीसोबत डायरेक्टर म्हणून संबंधित असलेल्या श्री. मनिंदरसिंग जुनेजा यांचा पदभार श्री. दोरायस्वामी  आपल्या हातात घेतला आहे.

श्री. रमेश हे संघटनात्मक कामगिरी वाढविणेधोरणात्मक मार्गदर्शन आणि दिशा देणेअपेक्षित विकास नियोजनाला चालना देणे आणि मूल्य साखळीत भागीदारांना मिळणाऱ्या परताव्यात सुधारणा करण्यासाठी जबाबदार असतील.   

एनबीएचसीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ श्री. रमेश दोरायस्वामी म्हणाले की, “एनबीएचसीसोबत काम करण्याची संधी माझ्याकरिता सन्मानाची बाब आहे. ही कंपनी अॅग्री कमोडीटी क्षेत्रात कार्यरत असून भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरते. माझा कंपनीतील प्रवास उत्साहवर्धक असेलयाबाबत मला आत्मविश्वास वाटतो. ही संघटना उत्साही भवितव्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असल्याने याठिकाणी योगदान देण्याच्या दृष्टीने मी अतिशय उत्सुक आहे.

श्री. रमेश यांना उद्योगक्षेत्रात तीन दशकांहून अधिकच्या नेतृत्वाचा अनुभव आहे. यापूर्वी ते ओलीयोकेमिकल्स आणि एफएमसीजी उत्पादनसंबंधी जागतिक पटलावर मान्यताप्राप्त भारतीय कंपनी वीवीएफ इंडिया लिमिटेडसोबत मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून संलग्न होते. याठिकाणी ते व्यापाराची कार्यविषयक उलाढाल पाहत. त्यांनी युनिलिव्हर आणि जॉन्सन अँड जॉन्सन (जे अँड जे) यासारख्या ग्लोबल एमएनसीमध्ये फायनान्ससंकलनपुरवठा साखळी आणि व्यवसायविषयक विश्लेषणमर्जर आणि अॅक्विझीशन अशा विविध कार्यक्षेत्रात नेतृत्व बजावले आहे.

युनिलिव्हरमध्ये 2005 मध्ये ग्लोबल प्रोक्यूरमेंट टीमचे नेतृत्व करणारे पहिले आशियाई म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. यशिवाय जॉन्सन अँड जॉन्सन येथे स्ट्रॅटेजिक अॅनलिटीक्स म्हणून त्यांनी काम पाहिले. एशिया पॅसिफीक सेल्स अँड मार्केटींग टीमसोबत सहयोगी म्हणून काम केलेसिंगापूर येथे रिजनल डिस्ट्रिब्युशन सेंटरमध्ये एशिया पॅसिफीकमधील 14 देशांना प्रभावीपणे सेवा उत्पादने उपलब्ध करून दिली.   
श्री. रमेश हे आयआयएम अहमदाबादचे विद्यार्थी असून ते इन्स्टीट्युट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटस ऑफ इंडियाचे असोसिएट मेंबर आहेत.

एनबीएचसीविषयी:
नॅशनल बल्क हँडलिंग कॉर्पोरेशन (एनबीएचसी), हा भारताच्या कृषी-परिसंस्थेमधील अद्ययावत असा अग्रगण्य सेवा पुरवठादार आहेजो  इतर गोष्टींसोबत गोदाम सेवासंयुक्त व्यवस्थापन सेवासंकलन आणि पुरवठा शृंखला व्यवस्थापन सेवा त्याचप्रमाणे इतर सहाय्यक सेवा जसे कीगुणवत्ता तपासणी व प्रमाणपत्रकीड व्यवस्थापन आणि लेखापरीक्षादेखरेख आणि नियंत्रण देऊ करते. पहिली गोदाम कंपनी अधिस्वीकृत ISO 22000:2005 आहेतिला NABL ISO 17025:2005, ISO 9001:2008 अंतर्गत देखील अधिस्वीकृती प्राप्त आहेशिवाय ती कॅटेगरी एफ मेंबरशीपसह जीएएफटीए –युके प्राप्त आहे. कालांतराने कठोर गुणवत्ता नियमांचे पालन करणारी कृषी माल निर्यातीशी संलग्न झाली.

Comments

Popular posts from this blog

क्रिकेटपटू सुनिल गावसकर समाजातील वंचित घटकांच्या 34 मुलांच्या जीवनरक्षक हृदय शस्त्रक्रियांसाठी संपूर्ण आर्थिक मदत करणार

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

सीएसबी बँक लि. प्रारंभी समभाग विक्रीला नोव्हेंबर 22, 2019 रोजी सुरुवात