पर्ल अकॅडमी मुंबई चे डिझाइनच्या माध्यमातून सलाम बालक ट्रस्टमधील मुलांसाठी कार्यशाळेचे आयोजन


पर्ल अकॅडमी मुंबई चे डिझाइनच्या माध्यमातून सलाम बालक ट्रस्टमधील मुलांसाठी कार्यशाळेचे आयोजन

पर्ल अकॅडमी ने मुंबई मधील अंधेरी ईस्ट स्थित आपल्या कॅम्पस मध्ये अनाथ आणि निराधार मुलांची काळजी घेणाऱ्या सलाम बालक ट्रस्ट या एनजीओमधील मुलांसाठी एका वर्कशॉपचे आयोजन केले होतेया कार्यशाळेचे आयोजन पर्लअकॅडमी च्या #MumbaiByDesign (#मुंबईबायडिजाइनया उपक्रमाच्या एका भागा अंतर्गत करण्यात आले होते.

मुंबईबायडिजाइनडिजाइनच्या क्षेत्रामधील पर्ल अकॅडमीची एक संकल्पना आहेयामध्ये मुंबई शहराच्या डिजाइनची नवीन दृष्टिकोनातून कल्पना करण्यासाठी डिजाइनिंगवर विचार-विमर्श करण्याची कुवत प्रदर्शित करण्यात आली आहेया संकल्पनेचे उद्दिष्ट्य शहरची संचालन आणि पर्यावरण संबंधी समस्यांचे स्थिर समाधान विकसित करणे आणि सादर करणे हे आहे.

या संकल्पनेच्या पहिल्या चरणाचे आयोजन दोन वर्गांमध्ये करण्यात आलेयामध्ये लहान मुलांना त्यांच्या वयोगटाप्रमाणे तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आणि त्यांना काही विशिष्ट अक्षरांशी संबंधित अनेक मुख्य रंग आणिमुख्य रंगांना मिसळल्याने बनणाऱ्या रंगांचे प्रशिक्षण देण्यात आलेया कार्यशाळेत बेघर मुलांना नवीन रंग बनविणेडिझाईनचे लेआऊट तयार करणे आणि डिझाईनला एक खास आकार देणे या गोष्टी शिकविण्यात आल्या.

दुसऱ्या चरणामध्ये सलाम बालक ट्रस्टने आपल्या अंधेरी स्थित आश्रयालयाच्या मोठ्या भिंतीचा एक भाग पेंट करण्यासाठी पर्ल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित केलेतीन दिवस चाललेली हि गतिविधी विद्यार्थी आणि शिक्षकांनाखूपच उत्साहित करणारी होतीत्यांनी या कालावधीमध्ये भिंतीवर फ्रेमवर्क आणि डिझाईन बनविले ज्यामुळे हि भिंत मुंबईबाइडिजाइन वॉल बनलीविद्यार्थ्यांनी कार्यशाळेमध्ये शिकविलेल्या डिझाईनच्या संकल्पनेचा व्यवहारिकतेमध्येउपयोग केलाहि पेंटिंग मुंबईच्या सुंदरतेमध्ये एखाद्या कवितागझल किंवा कलाकृतीसारखी आहेमुंबई शहर एक विरोधाभासी गजबज आणि आवाजाने भरपूर असे शहर आहेयेथील समुद्र किनारा मनाला शांती प्रदान करतो.

डिझाईन फेस्टिवल हे या संकल्पनेचे दुसरे चरण असणार आहेज्याचे आयोजन पर्ल अकॅडमीच्या मुंबईमधील कॅम्पसमध्ये होणार आहेहे डिझाईन फेस्टिवल शहरातील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या स्पर्धापॅनलडिस्कशन आणि कार्यशाळेला समर्पित असेलहा दोन दिवसांचा सोहळा जानेवारी २०१९ मध्ये आयोजित केला जाणार आहे.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202