लिव्‍हटेक इंडियाचा मुंबईतील पहिल्‍याच पेन कार्निवलमध्‍ये सहभाग


लिव्‍हटेक इंडियाचा मुंबईतील पहिल्‍याच पेन कार्निवलमध्‍ये सहभाग
लिव्‍हटेक इंडिया पहिल्‍याच 'इंडिया पेन शो'मध्‍ये सहभाग घेत आहे. कंपनी या प्रदर्शनाच्‍या माध्‍यमातून लक्‍झरी फाऊंटन पेन्‍सचे प्रदर्शन करणार आहे. हे प्रदर्शन नेहरू सेंटर, वरळी, मुंबई येथे २ ते ३ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत आयोजित करण्‍यात येणार आहे.
भारत ही लक्‍झरी राइटिंग इन्‍स्‍ट्रूमेंट्स व अॅक्‍सेसरीजसाठी उदयोन्‍मुख बाजारपेठ आहे. 'द इंडिया पेन शो'देशभरातील ट्रेडर्स, डीलर्स, कलेक्‍टर्स व हौशी पेन प्रेमींना अद्भुत राइटिंगचा अनुभव देण्‍यासोबतच स्‍वत:चा समुदाय निर्माण करण्‍यासाठी व्‍यासपीठ देते. लिव्‍हटेक इंडिया भारतातील कॉन्क्लिन, मॉन्‍टेवर्दे, वॉल्‍टडमन व स्टिपुला यांसारखे आघाडीचे लाइफस्‍टाइल राइटिंग इन्‍स्‍ट्रूमेंट्स देण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी राहिली आहे. या पेन शोच्‍या माध्‍यमातून नवीन व उदयोन्‍मुख बाजारपेठांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍याचा प्रयत्‍न आहे.
या उपक्रमाबाबत बोलताना लिव्‍हटेक इंडियाचे अध्‍यक्ष श्री. विनोद कृष्‍णा म्‍हणाले, ''आम्‍हाला लक्‍झरी फाऊंटन पेन्‍स ऑफरिंग्‍ज दाखवण्‍यासाठी 'इंडिया पेन शो' या अद्वितीय उपक्रमाचा भाग होण्‍याचा आनंद होत आहे. भारतात लक्‍झरी फाऊंटन पेन्‍ससाठी प्रचंड मागणी आहे. आम्‍ही भारतीय बाजारपेठांना कॉन्क्लिन,मॉन्‍टेवर्दे, वॉल्‍डमन आणि स्टिपुला अशी प्रिमिअम रेंज सादर करतो. आम्‍हाला आमच्‍या डिजिटल व्‍यासपीठावर इतर शहरांतून देखील प्रचंड मागणी मिळत आहे. हा पेन शो आम्‍हाला बाजारपेठेमधील आघाडीच्‍या कंपन्‍यांसोबत आणि लेखनाचा आनंद असलेल्‍या व्‍यक्‍तींशी जुडण्‍यामध्‍ये साह्य करेल.''
लिव्हटेक इंडिया विषयी:
लिव्हटेक इंडिया हा पॅकेजिंगवेअरहाउसिंग/लॉजिस्टिक्स आणि लक्‍झरी वस्तूंचे वितरण अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांत रस असलेल्या एका समूहाचा भाग आहेअनेक महत्त्वाचे लाइफस्टाइल ब्रॅण्ड्स देशात आणण्यात तसेच नियोजनसंघटन व आयुष्य समृद्ध करण्याच्या कामात लिव्हटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आघाडीवर राहिली आहेकंपनीचे मुख्यालय मुंबईबाहेर आहे आणि यूकेफ्रान्सइटली व अमेरिकेतील जीवनशैली उत्पादने भारतात आणण्यावर कंपनीचा भर आहेकंपनीची कार्यालये मुंबईदिल्ली व कोलकाता येथे आहेत आणि चेन्नई व बेंगळुरू येथे प्रतिनिधी आहेतब्रॅण्डबद्दल जागरूक अशा ग्राहकांची वर्दळ असलेल्या उच्चभ्रू पंचतारांकित हॉटेल्समध्ये तसेच शॉपिंग मॉल्समध्ये हे ब्रॅण्ड्स ठेवले जातातवेबसाइट:https://www.livtekindia.com

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth