नौकाधारित ३डी एअर सर्व्हेअलन्स रडार्सचे १,२०० कोटी रुपयांचे कंत्राट संरक्षण मंत्रालयाकडून टाटा पॉवर एसईडीकडे सुपूर्त

नौकाधारित डी एअर सर्व्हेअलन्स रडार्सचे ,२०० कोटी रुपयांचे कंत्राट संरक्षण मंत्रालयाकडून टाटा पॉवर एसईडीकडे सुपूर्त

नौकाधारित ३डी एअर सर्व्हेअलन्स रडार्सचे १२०० कोटी रुपयांचे कंत्राट भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून आपल्या कंपनीला मिळाले असल्याचे घोषणा आज टाटा पॉवर स्ट्रॅटेजिक इंजिनिअरिंग डिव्हीजन (टाटा पॉवर एसईडी) या कंपनीने केली. येत्या १० वर्षांसाठी भारतीय नौदलाला ही रडार्स पुरवण्याचे हे कंत्राट आहे.

१२०० कोटी रुपयांच्या मूल्यांचे हे कंत्राट २०१३च्या डिफेन्स प्रोक्युअरमेण्ट प्रोसिजरच्या (डीपीपी) खरेदी व उत्पादन (भारत) या श्रेणीत मोडणारे असून भारतीय नौदलाला यामुळे एक सिद्धहस्त सोल्यूशन प्राप्त होणार आहे. भारतातच या उत्पादनाची निर्मिती करण्यात येणार असून ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी (टीओटी) अंतर्गत ही उत्पादन निर्मिती करण्यात येणार आहे. यामुळे भारतीय संरक्षण विभागांच्या स्वयंपूर्णतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होते.

हे कंत्राट टाटा पॉवर एसईडीतर्फे मुख्य कंत्राटदार म्हणून कार्यान्वित केले जाणार असून यासाठी परदेशी ओईएम (ओरिजिनल इक्विपमेण्ट मॅन्युफॅक्चरर) इंद्रा सिस्टेमाजस्पेन यांच्याशी भागीदारी करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24