फिनोलेक्स केबल्स लिमिटेड आर्थिक निष्कर्श

फिनोलेक्स केबल्स लिमिटेड आर्थिक निष्कर्श
फिनोलेक्स केबल्स लिमिटेड (एफसीएल) च्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या सभेत २०१८-१९ च्या चौथ्या तिमाही बरोबर संपूर्ण वर्षांच्या आर्थिक निष्कर्शांना मंजूरी देण्यात आली.
 मार्च १९ मध्ये संपलेल्या तिमाहीत महसूल रू ८२१६.१९ दशलक्ष झाला जो २०१७-१८ च्या याच कालावधीत रू ७९९२.० दशलक्ष होता म्हणजेच वार्षिक तुलनेत ही वाढ ३ टक्के आहे.  व्हॉल्युमच्या दृष्टीने पहायचे झाल्यास सर्व इलेक्ट्रिकल वायर्स क्षेत्रात १८ टक्के वाढ तर पावर केबल्स मध्ये अगदी थोडी घट झाली.  कम्युनिकेशन केबल्स क्षेत्रात ऑप्टिक फायबर  केबल्स मध्ये घट झाली याचे मुख्य कारण म्हणजे सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील ऑर्डर्स मध्ये  झालेला ऊशीर तसेच खाजगी टेलिकॉम क्षेत्रातील बाजारपेठेतील घट होय.  अन्य कम्युनिकेशन उत्पादने ही डिलर नेटवर्कच्या माध्यमातून विकली जातात तरीही व्हॉल्युम मध्ये १५ टक्के वाढ  दिसून आली.  नवीन उत्पादने जी एफएमईजी क्षेत्रातील आहेत त्यांत प्रत्येकी १० टक्क्यांहून अधिकची वाढ नोंदवली गेली.  जीएसटीचा सकारात्मक परिणाम आता थोडा थोडा दिसू लागला आहे.    
 संपूर्ण वर्ष २१०८-२०१९ मध्ये विक्री रू ३०८२५ दशलक्ष झाली जी गेल्या वर्षी याच कालावधीत रू २९०२८.४ दशलक्ष होती म्हणजेच महसूलात ६ टक्के वाढ नोंदवली गेली.  पावर केबल्स आणि ऑप्टिक फायबर केबल्स वगळता बाकी सर्व उत्पादनांनी वाढ नोंदवली आहे.   नवीन उत्पादन श्रेणी (फॅन्स, स्विचगिअर आणि वॉटर हिटर्स) मध्ये वाढ झाली आहे.  त्याच बरोबर नवीन उत्पादनांमधील वाढ, वितरण शृंखलेतील वाढ, मिडिया मधील सातत्यपूर्ण  अस्तित्व यांमुळे फिनोलेक्स ब्रॅन्ड चा प्रसार झाल्याने या उत्पादन श्रेणीत वाढ नोंदवणे शक्य झाले.
 तिमाहीतील करपूर्व नफा हा रू १३९९.४ दशलक्ष झाला जो गेल्या वर्षी याच कालावधीत रू १२७६.८  दशलक्ष होता म्हणजेच १० टक्के वाढ.
 संपूर्ण वर्षभरांत करपूर्व नफा वाढून रू ५३१८.६ दशलक्ष झाला जो गेल्या वर्षी याच कालावधीत रू ५०४४.८ दशलक्ष होता म्हणजेच ५.५ टक्के वाढ नोंदवण्यात आली.
 करपश्चात नफा पाहता २०१८-१९ च्या ४थ्या तिमाहीतील नफा हा रू ८४९.० दशलक्ष झाला जो गेल्या वर्षी याच कालावधीत रू ८१७.६ दशलक्ष होता म्हणजेच ही ४ टक्के वाढ आहे.
 वर्षभरासाठी करपश्चात नफा रू ३४४०.९ दशलक्ष झाला जो गेल्या वर्षी रू ३५८२.० दशलक्ष होता. नफ्यातील घट ही रूड़की येथील आर्थिक लाभ रद्द करण्यात आल्याने झाली आहे.
ही कार्यक्षमता पाहता संचालक मंडळाने वर्षभरासाठी २२५ टक्के लभांश देण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
 ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या संपूर्ण वर्षांत एकूण निष्कर्शांतून असे दिसून येते की निव्वळ विक्री ही रू ३०८२५.८ दशलक्ष झाली जी गेल्या वर्षी याच कालावधीत रू २९०२८.४ दशलक्ष होती आणि करपूर्व नफा हा रू. ६१०२.२ दशलक्ष झाला जो गेल्या वर्षी रू ५४९१.४ दशलक्ष होता.    ‍


Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth