एसकेएफ इंडिया ने मुंबई येथे नकली उत्पादने जप्त केल्याची घोषणा केली

एसकेएफ इंडिया  ने मुंबई येथे
नकली उत्पादने जप्त केल्याची घोषणा केली

मुंबई, २७ जून २०१९: ग्राहकांना नेहमीच अस्सल आणि विश्वांर्ह उत्पादने उपलब्ध करून देणा-या एसकेएफ इंडिया ने नुकत्याच मुंबईत नागदेवी स्ट्रीट येथे दोन दुकानांवर छापा घालून कंपनीच्या नावाने विकल्या जाणा-या बनावट उत्पादनांचा मोठा साठा जप्त केला. ही दोन्ही दुकाने एसकेएफ चे अधिकृत विक्रेत्यांची नाहीत.  एसकेएफ इंडिया च्या अधिका-यांनी स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने घातलेल्या या छाप्यात विविध प्रकारची आणि आकाराची बनावट बेअरिंग्ज, रिकामे खोके, बेअरिंग वर खुणा उमटवणारी यंत्रे, लेबल छपाई यंत्रे तसेच पॅकिंग साहित्य मोठ्या प्रमाणावर ताब्यात घेण्यात आले. 

बनावट बेअरिंग चा धोका दिवसेंदिवस वाढत असून त्याची व्याप्तीही वाढत आहे. देशात अनेक ठिकाणच्या बाजारांमध्ये विविध कंपन्यांच्या नावाने बनलेली आणि कमी दर्जाची अशी बेअरिंग्ज बेमालूमपणे पुरविली आणि विकली जातात. अशी बनावट बेअरिंग वापरल्यास यंत्रांचे नुकसान होते आणि यंत्रे बंद पडून उत्पादन कमी झाल्यामुळे जास्तीचा फटका बसतो. यामुळे कारखान्याची बदनामी होते आणि विक्रीवर परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते.  

एसकेएफ इंडिया चे बनावट बेअरिंग्ज उत्पादनाबद्दलचे धोरण अत्यंत कठोर आहे. विविध बाजारांमध्ये विकली जाणारी बनावट बेअरिंग्ज शोधून कारवाई करणे आणि अशी उत्पादने बाजारात येऊच नयेत यासाठी प्रयत्न करणे याबद्दल एसकेएफ इंडिया सतत प्रयत्नशील असते. याबरोबरच ग्राहकांना अस्सल बेअरिंग खरेदी करण्याचे महत्व समजावून सांगण्याचाही सातत्याने प्रयत्न होतो. बनावट बेअरिंग वापरल्यामुळे यंत्राचे नुकसान होऊन उत्पादनाला फटका बसलेल्या एका ग्राहकाने केलेल्या तक्रारीनंतर हे छापे घालण्यात आले.  

बनावट उत्पादने अस्सल उत्पादनांसारखीच दिसतात. प्रशिक्षित एसकेएफ प्रतिनिधींनाच बनावट आणि अस्सल यातील फरक समजू शकतो. बनावट उत्पादनांची बेकायदा विक्री रोखण्यासाठीएसकेएफ इंडिया
नियमितपणे स्थानिक प्रशासन अधिका-यांशी सहकार्य करीत असते. एखाद्या विक्रेत्याला अथवा ग्राहकाला उत्पादन बनावट असल्याचा संशय आला तर तो एसकेएफ ला genuine@skf.com या ठिकाणी कळवून कंपनीची मदत घेऊ शकतो.  

मात्र कंपनीची उत्पादने अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करणे हा यावरचा सर्वात चांगला उपाय आहे. एसकेएफ इंडिया च्या आपल्या जवळच्या  अधिकृत विक्रेत्यांची माहिती www.skf.com/in येथे उपलब्ध आहे. शिवाय ग्राहक कंपनीच्या स्थानिक प्रतिनिधीशी संपर्क साधू शकतात.  

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार