गोएअरने आपल्या ताफ्यात केला ५०व्या विमानाचा समावेश
गोएअरने आपल्या ताफ्यात केला ५०व्या विमानाचा समावेश
● नवीन विमानाचा समावेश हा विस्तार धोरणाचा भाग
● भारतातील सर्वांत वेगाने वाढणारी विमान वाहतूक कंपनी
● विमानांचा ताफा २ वर्षांहून कमी काळात दुप्पट झाला
● गोएअर लवकरच आपल्या नेटवर्कमध्ये चार आंतरराष्ट्रीय स्थळांची भर घालणार
मुंबई, २७ जून २०१९: गोएअरने आपल्या ताफ्यात ५०व्या विमानाचा समावेश केला आहे. हा नवीन टप्पा पार करतानाच कंपनीने दोन वर्षांहून कमी काळात आपल्या ताफ्यातील विमानांची संख्या दुप्पट केली आहे आणि त्यायोगे भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणारी विमान वाहतूक कंपनी होण्याचा मान प्राप्त केला आहे. कंपनी सध्या दररोज २७० फ्लाइट्स चालवते. कंपनीच्या नेटवर्कमध्ये २४ देशांतर्गत तर ४ आंतरराष्ट्रीय सेवांचा समावेश आहे.
गोएअर ही वाडिया समूहाची नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनी कमी शुल्कात हवाई प्रवासाची सेवा देते. यासाठी भाडे मर्यादेत राखण्यामध्ये आघाडी, प्रशासनातील कार्यक्षमता व खात्रीशीरता यांची आवश्यकता असते. गोएअर ए३२० विमाने चालवते. अहमदाबाद, बागडोगरा, बेंगळुरू, भुवनेश्वर, चंदीगढ, चेन्नई, दिल्ली, गोवा, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कोची,कोलकाता, कन्नूर, लेह, लखनौ, मुंबई, नागपूर, पटना, पोर्ट ब्लेअर, पुणे, रांची आणि श्रीनगर येथे ही कंपनी विमान वाहतूक करते. फुकेत, माले, मस्कत व अबूधाबी या चार आंतरराष्ट्रीय ठिकाणीही कंपनी सेवा देते. गोएअरने आपल्या स्थापनेपासून ७२ दशलक्षांहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली आहे आणि येत्या दोन वर्षांत ही विमान वाहतूक कंपनी १०० दशलक्ष प्रवाशांचा जादूई टप्पा पार करेल.
गोएअरचे व्यवस्थापकीय संचालक श्री. जेह वाडिया ५०व्या विमानाच्या समावेशाबद्दल म्हणाले: “या नवीन टप्प्यामुळे मला खूप समाधान लाभले आहे आणि यशाची जाणीव झाली आहे. त्याचवेळी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे याची आठवणही ही जाणीव मला करून देत आहे. पुढचा विचार करता आम्ही दर महिन्याला किमान एका नवीन विमानाचा समावेश ताफ्यात करत राहणार आहोत. त्यामुळे आपोआपच उड्डाणांची संख्या वाढेल,सेवाक्षेत्रातील ठिकाणांची संख्या वाढेल आणि ग्राहकांना अधिक स्मार्ट पर्याय उपलब्ध होतील. आम्ही लवकरच आमच्या नेटवर्कमध्ये चार नवीन आंतरराष्ट्रीय ठिकाणांचा समावेश करणार आहोत.”
श्री. वाडिया पुढे म्हणाले: “२०१६ मध्ये आम्ही एक आक्रमक धोरण आखले आणि भारताचा आर्थिक विकास व गोएअरला नागरी विमान वाहतूक क्षेत्रात पार पाडावी लागणारी निर्णायक भूमिका यांचा विचार करून दीर्घकालीन निर्णय घेतला. त्यावर्षी आम्ही आमच्या ए३२० विमानांची ऑर्डर दुपटीने वाढवून १४४ केली. यामागे वाढीला वेग देण्याचा व त्याचवेळी नफ्यात राहण्याचा स्पष्ट दृष्टिकोन होता. व्यवसायाच्या दृष्टीने विचार करता, ती उद्दिष्टे आजही आमची मार्गदर्शक तत्त्वे आहेत. ग्राहकांच्या दृष्टीने विचार करायचा तर, गोएअरने आपले व्यवसाय प्रारूप तीन मुलभूत तत्त्वांवर कार्यान्वित केले आहे- वक्तशीरपणा, परवडण्याजोगी भाडी आणि सोय. या तत्त्वांमुळे आम्हाला आमच्या ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात मदत झाली आहे.”
थोडक्यात:
● वक्तशीर कामगिरी: गोएअरने ओटीपी तक्त्यात सलग ९ वेळा आघाडीचे स्थान प्राप्त केले आहे.
● भार: भार म्हणजे विमानातील भरलेल्या आसनांची टक्केवारी. गोअर भाराच्या दृष्टीने भारतातील पहिल्या दोन विमान वाहतूक कंपन्यांमध्ये मोडते. कंपनी ९० टक्क्यांहून अधिक भार वाहून नेते.
● रद्दीकरण: रद्द करण्याचे प्रमाण सर्वांत कमी- याचाच अर्थ ग्राहकांचा गोएअरवर गाढ विश्वास आहे.
● प्रवाशांच्या तक्रारी: गोएअरच्या १०,००० प्रवाशांमागे तक्रारींची संख्या ०.५हून कमी आहे.
|
Comments
Post a Comment