एसबीआय जनरल इन्शुरन्सने बँकासुरन्ससाठी कर्नाटक ग्रामीण बँकेबरोबर केला करार

एसबीआय जनरल इन्शुरन्सने बँकासुरन्ससाठी 
कर्नाटक ग्रामीण बँकेबरोबर केला करार
एसबीआय जनरल इन्शुरन्स या भारतातील आघाडीच्या विमा कंपनीने कर्नाटक ग्रामीण बँकेबरोबर तेथील बँक ग्राहकांना विमा उत्पादने प्रदान करण्यासाठी  बँकासुरन्सचा करार केला आहे. या भागीदारीमुळे एसबीआय जनरल इन्शुरन्सने दक्षिण बाजारपेठेत वितरण वाहिन्यांचा विस्तार केला आहे आणि कर्माटक ग्रामीण बँकेच्या सर्व शाखांमध्ये आपली विमा उत्पादने वितरित केली जाणार आहेतत्यामुळे बँकेची स्थानिक उपस्थिती ही विमा कंपनीसाठी एक अतिरिक्त फायदा होऊ शकेल.
या युतीविषयी बोलताना एसबीआय जनरल इन्शुरन्सचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पुषण महापात्रा म्हणाले, “कर्नाटक राज्यातील अशा प्रतिष्ठित बँकेबरोबर करार केल्या बद्धल आम्ही आनंदित आहोत. बँकासुरन्स चॅनेलमध्ये शेवटच्या टप्प्या पर्यन्त पोहोचण्याची आणि विनाअनुदानित बाजारपेठांची सेवा देण्याची क्षमता आहे त्यामुळे भारतातील विमा प्रवेशास प्रोत्साहन मिळेल. एसबीआय जनरल इन्शुरन्समध्ये आम्ही सोसायटीच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्याचा आणि विमा संदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो आणि ही भागीदारी आमच्या हेतुनुसार झाली आहे. हया संघटनेमुळे दोन्ही कंपन्यांच्या समर्थाना फायदा होईल आणि कर्नाटक ग्रामीण बँकेच्या ग्राहकांना  विमा उत्पादनांचा व्यापक असा संच मिळेल. ” कर्नाटक ग्रामीण बँक ही कर्नाटकातील 21 जिल्ह्यांमध्ये 1167 शाखेची उपस्थिती असणारी भारतातील सर्वात मोठी आरआरबी आहे. बँकेची 46500 कोटी रुपयांची उलाढाल आहे आणि कर्नाटकात 1.58 कोटी ग्राहकांना सेवा देत आहेत. या कराराचा फायदा कर्नाटक राज्यातील ग्रामीणमध्यम शहरी आणि शहरी भागात पसरलेले  बँकेचे  रिटेलर आणि एसएमई ग्राहकांना होईल.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24