नवव्या “नेक्स्टजेन जेनोमिक्स, बायोलॉजी, बायोइन्फर्मेटिक्स आणि टेक्नॉलाजिज (एनजीबीटी)” परिषदेचे मुंबईत आयोजन
नवव्या “नेक्स्टजेन जेनोमिक्स, बायोलॉजी, बायोइन्फर्मेटिक्स आणि टेक्नॉलाजिज (एनजीबीटी)” परिषदेचे मुंबईत आयोजन
मुंबई, ३० सप्टेंबर २०१९- सायजिनॉम रिसर्च फाऊन्डेशन (एसजीआरएफ) या भारतात संशोधन आणि शिक्षणाच्या माध्यमातून विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ना नफा तत्वावर कार्यरत असलेल्या संस्थे तर्फे ९ व्या वार्षिक ‘नेक्स्टजेन जिनोमिक्स, बायोलॉजी, बायोइन्फर्मेटिक्स आणि टेक्नॉलॉजिज (एनजीबीटी) परिषदेचे मुंबईत ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.
तीन दिवस चालणार्या या परिषदेत जीवशास्त्र, जीवशास्त्राशी संबंधित तंत्रज्ञान यांच्याशी संबंधित देश विदेशातील प्रतिथयश वक्ते आपले विचार मांडणार आहेत. या वेळी आयोजित विविध सभांमध्ये अधुनिक जेनोमिक्स तंत्रज्ञाना बरोबरच मुलभूत आणि बदलणार्या विज्ञाना बरोबरच मोठ्या प्रमाणावरील जीवशास्त्राचा अभ्यास करण्यात येणार असून यांत मानवी जेनेटिक्स, औषधांचा शोध, क्लिनिकल औषधे, बायोमार्कर्स, डायग्नोस्टिक्स, प्राणी, वनस्पती, कृषी आणि बचावात्मक विज्ञान यांचा समावेश आहे.
“ गेल्या नऊ वर्षांच्या कालावधीत एनजीबीटी ने नेहमीच संशोधक, विद्यार्थी, क्लिनिशियन्स, वनस्पती आणि पशू वैज्ञानिकां बरोबरच भारत व विदेशातील तंत्रज्ञान/जीवशास्त्र कंपन्यांना एकत्र आणत भेटून, एकमेकांमध्ये अधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञानाची माहिती वाटून घेण्यासाठीमंच उपलब्ध केला आहे. जेनोमिक्स चे विज्ञान हे हेल्थकेअर, औषधांचा शोध, वनस्पती आणि प्राणी विज्ञान यांत क्रांती करत आहे. आमची ही परिषद म्हणजे हे सर्व ज्ञान एकत्र करून शास्त्रज्ञ आणि भारतीय विद्यार्थ्यांसमोर आणत आहे. विज्ञानाचे मुख्य उद्दिष्ट्य हे आहे की समाजाचे भले व्हावे आणि आंम्हाला आशा आहे की आमची ही परिषद हे लक्ष्य पूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण भुमिका अदा करेल.” असे एनजीबीटी कॉन्फरन्स चे अध्यक्ष आणि एसजीआरएफ चे प्रेसिडेंट डॉ. शेखर शेषगिरी यांनी सांगितले.
ही परिषद म्हणजे एक वार्षिक मंच असून या मंचाने नेहमीच भारत आणि दक्षिण एशियातील वैज्ञानिक संशोधनाला चालना दिल्याने जगभरांतील व्यावसायिक या परिषदेला उपस्थित राहतात.
“आम्ही नुकतेच एका फुप्फुसाच्या कॅन्सरच्या एका रूग्णावर योग्य औषधे शोधून उपचार केल्याने तिचा ट्युमर कमी झाला आणि तिच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारली. जिनॉमिक्स मुळे सुयोग्य औषध सापडले जेणेकरून कॅन्सरच्या उपचारात फरक पडला व औषध रूग्णानुसार बदलणे शक्य झाले.” असे मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल च्या मेडिकल ऑन्कोलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. कुमार प्रभाष यांनी सांगितले.
“ एनजीबीटी तर्फे हा उपक्रम चालवणे खरोखरच आनंददायी आहे कारण यामध्ये तज्ञ, विचारवंत आणि जगभरांतील लोक एकत्र येऊन त्यांच्या संकल्पना एकमेकांसमोर मांडतात. जिनोमिक्स क्षेत्रातील वैज्ञानिक विकास हा मोठ्या प्रमाणावर बदलत असून कृषी विज्ञान क्षेत्रातही यामुळे मोठा बदल घडत आहे. याचा सकारात्मक परिणाम शेतकर्यांवर होऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.” असे मेटॅहेलिक्स इंडिया चे माजी सीईओ आणि संस्थापक डॉ. के के नारायणन् यांनी सांगितले.
या परिषदेला विज्ञान क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार असून त्यांत एसीटीआरईसी, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, टीआयएफआर, आयआयएसईआर, आयआयएससी, एनआयबीएमजी, एनसीबीएस, आयआयटी, एआयआयएमएस, टीएनएयू, एसआरएमसी, सीसीएमबी, बीजीआय, जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी, यूसीएसएफ, युनिव्हर्सिटी ऑफ फ्रँकफर्ट, दि इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्च, यूके, युनि. ऑफ टॉरोंटो, युनि. ऑफ माँट्रेयल, गोएथ युनिव्हर्सिटी, सीएमसी वल्लोर, इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्च: रॉयल कॅन्सर हॉस्पिटल , टाटा रॅलिज, जेनेटेक, १० एक्स जिनॉमिक्स, नॅनोस्ट्रींग, पॅकबायो, ऑक्सफर्ड नॅनोपोअर, मेडजिनॉम, ॲग्रीजिनॉम, नेचर, क्यूआयएमआर बर्गहोफर,सेंट ज्यूड चिल्ड्रन्स रिसर्च हॉस्पिटल आणि जगभरांतील आघाडीच्या संस्थांचा समावेश आहे.
एसजीआरएफ तर्फे १०० हून अधिक लोकांच्या मिटींग स्कॉलरशिप्सची घोषणा करण्यात आली असून एनजीबीटी मिटींगला विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ही स्कॉलरशीप मुलांना एनजीबीटी परिषदेतील सादरीकरणाचा सारांश देऊ शकणार्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. “ नेचर, सेल ॲन्ड सायन्स सारख्या प्रसिध्द नियतकालिकांनी विद्यार्थ्यांच्या पोस्टरला दिलेले बक्षिस आणि दिलेल्या सहयोगा बद्दल मी त्यांचे आभार मानतो.” असे एनजीबीटी मिटिंगचे सह अध्यक्ष तसेच युनि. ऑफ फ्रँकफर्ट चे प्राध्यापक डॉ. कृष्णा राजलिंगम यांनी सांगितले.
Comments
Post a Comment