क्राऊनच्या अनावरणाने लोढाचा किफायतशीर घरांच्या क्षेत्रात प्रवेश
क्राऊनच्या अनावरणाने लोढाचा
किफायतशीर घरांच्या क्षेत्रात प्रवेश
मुंबईत (एमएमआर) रू.25-50 लाखाच्या
दरम्यान घरे बांधण्यासाठी रू.2500 कोटींची गुंतवणूक
मुंबई, 30 सप्टेंबर 2019: भारतातील
सर्वाधिक मोठे निवासी
रिअल इस्टेट विकासक
लोढा समुहाने आपल्या
“क्राऊन” ह्या
खर्या
अर्थाने किफायतशीर असलेल्या
हाऊसिंग ब्रँडची घोषणा
केली आहे. रू.50,000 आणि अधिक मासिक मिळकत असलेल्या परिवारांसाठी ही योजना आहे. ह्या घरांच्या किंमती रू.25-50 लाख (निवडक घरे रू.75 लाख पर्यंत) ह्या दरम्यान असतील. सर्वोत्कृष्ट डिझाईन,
जागतिक दर्जाच्या सुविधा,
उत्तम संपर्क सुविधा
असलेली ठिकाणे आणि
संपूर्ण सामाजिक पर्यावरण
यंत्रणा, ह्यावर भर
असलेली प्रतिष्ठाप्राप्त लोढा
जीवनशैली आता दर्जेदार
जीवनशैलीची इच्छा असलेल्या
परंतु आजपर्यंत उच्च
किंमतींमुळे बाजारापासून दूर
राहिलेल्या मोठ्या संख्येच्या मुंबईकरांसाठी
उपलब्ध होईल.
ह्या ब्रँड अंतर्गत आता ठाणे येथे (माजिवाडा, विवियाना मॉलजवळ) महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती निमित्ताने
2 ऑक्टोबर रोजी पहिल्या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येत आहे. ह्या आर्थिक वर्षात भिवंडी आणि तळोजा येथे अजून दोन प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत.
2 ऑक्टोबर रोजी पहिल्या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येत आहे. ह्या आर्थिक वर्षात भिवंडी आणि तळोजा येथे अजून दोन प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत.
ह्या शुभारंभ प्रसंगी अभिषेक लोढा, मॅनेजिंग डायरेक्टर, लोढा समुह म्हणाले, “किफायतशीर किंमतीला उच्च दर्जाची घरे’ उपलब्ध करून देऊन माननीय पंतप्रधानांच्या ‘सर्वांसाठी घर’ ह्या संकल्पनेनुसार सेवा देता येईल यावर आमचा विश्वास आहे. ज्यामुळे मध्यम वर्गीय कुटुंबांचे आरोग्य व जीवनाचा दर्जा यात सुधारणा तर होईलच परंतु त्याचबरोबर घरांच्या किंमतीत वाढ होण्यामुळे त्यांच्या संपत्तीत देखील वाढ होईल. आमचा विश्वास आहे की, सरकारच्या अलिकडच्या काही निर्णयांमुळे अर्थव्यवस्था पुनरूज्जीवित होईल आणि त्यामुळे, आम्ही ह्या नव्या महत्त्वाकांक्षी गुंतवणुकीचा शुभारंभ केला आहे. हे खरोखर अप्रतिम आहे की ज्या कुटुंबाची मासिक मिळकत रू.50,000 आहे ते आता लोढाचे घर घेऊ शकतील - आम्ही बँकांबरोबर अशा प्रकारे करार केला आहे की प्रथमच घर खरेदी करणार्या ग्राहकांसाठी व्याजाचा दर द.सा.5% असेल आणि अगदी अल्प डाऊन पेनेन्टची रक्कम भरून ते आता घर खरेदी करू शकतील. ह्या घरांचा मासिक ईएमआय हा भाड्यापेक्षा अगदी थोडा जास्त असेल. सर्व मेहनत करणाऱ्या मुंबईकरांना उच्च दर्जाची जीवनशैली उपलब्ध करून देणे हे आमचे स्वप्न आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमचा नवीन ‘क्राऊन’ ब्रँड रिअल इस्टेट उद्योगाच्या क्षेत्रातील संपूर्ण चैतन्यशक्तीत परिवर्तन घडवून आणेल.’ ’
घर हे प्रत्येक कुटुंबासाठी अभिमानाची गोष्ट असते आणि म्हणून सोयिस्कर असलेल्या ठिकाणी उच्च दर्जाच्या घरात राहण्याचा प्रत्येक परिवाराचा अधिकार आहे ह्या विश्वासासह ‘जिओ तो ऐसे’ हे वचन ह्या ब्रँडद्वारे पूर्ण केले जाईल. आतापर्यंत मध्यम वर्गियांना कमी प्रतीचा विकास किंवा गैरसोय यातून निवड करावी लागली आहे त्यामुळे त्यांचा घराबद्दल वाटणारा अभिमान कमी होता. ह्यात परिवर्तन घडविणे हे क्राऊनचे उद्दिष्ट आहे.
सध्या लोढा येथे, 50% निवासी घरांची विक्री ही किफायतशीर घरांच्या प्रकल्पाद्वारे होत आहे. क्राऊनच्या शुभारंभाद्वारे
3 नव्या प्रकल्पांमध्ये आयएनआर 2,500 कोटी इतकी गुंतवणूक करणे हे लोढा समुहाचे उद्दिष्ट आहे.
3 नव्या प्रकल्पांमध्ये आयएनआर 2,500 कोटी इतकी गुंतवणूक करणे हे लोढा समुहाचे उद्दिष्ट आहे.
नव्या ब्रँडद्वारे किफायतशीर घरांच्या क्षेत्राची नव्याने व्याख्या लिहिली जात आहे. आपल्या माननीय पंतप्रधानांच्या ‘सर्वांसाठी घर’ ह्या व्हिजनद्वारे प्रेरणा घेऊन लोढा समुह ही कहाणी अशीच पुढे सुरू ठेवत आहे आणि ‘प्रत्येक महत्त्वाकांक्षी मुंबईकरासाठी उच्च दर्जाचे घर’ देणारी मुंबई ही स्वप्ननगरी असल्याचे चित्र रेखाटत आहे.
Comments
Post a Comment