मारुती सुझुकीतर्फे सणासुदीच्या दिवसात मिनी SUV S-PRESSO सादर
मारुती सुझुकीतर्फे सणासुदीच्या दिवसात
मिनी SUV S-PRESSO सादर
डिझाइन - 'मेक इन इंडिया'चे उत्तम उदाहरण असलेल्या S-PRESSO च्या दणकट SUV वैशिष्ट्यांमुळे तरुणांना आकर्षित करण्याची क्षमता
सुरक्षितता - सुझुकीच्या पाचव्या जनरेशनच्या HEARTECT व्यासपीठावर बनवलेल्या S-PRESSO मध्ये दणकटपणा, कणखरपणा आणि सुरक्षितता आणि 10 हून अधिक सुरक्षा वैशिष्ट्ये
तंत्रज्ञान : BS6 समर्थित 1.0 ली. K10 इंजिनची 21.7 किमी/ली अशी इंधन क्षमता
स्मार्टप्ले स्टुडिओ इन्फोटेनमेंट सिस्टम
|
Mumbai , 30 सप्टेंबर 2019 : मारुती सुझुकीने आज त्यांची बहुप्रतिक्षित मिनि-SUV S-PRESSO सादर केली. S-PRESSO ची रचना आणि संकल्पना पुर्णपणे भारतातच भारत आणि संपूर्ण जगासाठी करण्यात आली आहे. आपल्या दमदार आणि आकर्षक SUV रुपामुळे ही गाडी उठून दिसते. 5व्या जनरेशनच्या HEARTECT व्यासपीठावर तयार करण्यात आलेल्या या गाडीत अधिक दणकट, सुरक्षित आणि स्थिर बांधणीसाठी 40 टक्के हाय टेन्साइल स्टीलचा वापर करण्यात आला आहे.
देशभरातील व्यापक एरेना रीटेल नेटवर्कच्या माध्यमातून S-PRESSO ची विक्री केली जाणार आहे आणि सर्व सुरक्षितता नियमांचे पालन करत यात 10 हून अधिक सुरक्षा वैशिष्ट्ये पुरवण्यात आली आहेत. S-PRESSOसह ग्राहकांना सुझुकीतर्फे या विभागातील सर्वोत्कृष्ट सुविधा पुरवण्यात येत आहेत.
ग्राहकांसाठी नवी S-PRESSO सादर करताना मारुती सुझुकी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. केनिची आयुकावा म्हणाले, "मारुती सुझुकीमध्ये आमचा 'ग्राहक प्रथम' या तत्वावर विश्वास आहे. परवडणाऱ्या दरांमध्ये उच्च दर्जाच्या गाड्या भारतीय ग्राहकांना पुरवण्याचे आमचे कार्य सातत्याने सुरू आहे. आज S-PRESSOच्या जागतिक अनावरणामुळे आम्ही ग्राहकांना डिझाइन, तंत्रज्ञान आणि सुरक्षेची सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये देण्याची बांधिलकी जपली आहे. नव्या उत्सर्जन नियमांचे पालन करणाऱ्या BS6 रेंजमधील S-PRESSO ही आठवी गाडी आहे, याचा मला आनंद आहे. सतत उत्क्रांत होणाऱ्या तरुण ग्राहकांना आकर्षित करून S-PRESSO या विभागात उत्साह निर्माण करेल, असा मला विश्वास आहे."
S-PRESSO- रस्त्यावरील दणकट आणि कणखर अस्तित्व
S-PRESSOमध्ये SUVच्या ठळक वैशिष्ट्यांसह आकर्षक डिझाइनही आहे.
यातील अपराइट ए-पिलर आणि मागील दरवाजांच्या डिझाइनमुळे या गाडीला SUVचे ठळक रूप मिळते. आधुनिक काचा आणि बॉडी यातील योग्य समतोल साधून आकर्षक रूप देण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण रचना करण्यात आली आहे.
उच्च ग्राऊंड क्लिअरन्सला लिफ्टेड डोअर-सिलची जोड देण्यात आल्याने यातून दमदार आणि कणखर रूप दिसून येते. या दणकट रुपाला R14 टायर्सच्या चौकोनी व्हील आर्चेसमुळे अधिकच अधोरेखित करण्यात आले आहे.
यातील सिंगल अपार्चर हेड लॅम्प आणि ग्रील ग्राफिकमुळे या गाडीला एक अनोखा आणि इतरांहून वेगळा असा ठसठशीत आकर्षकपणा मिळतो. रूंद C-सिग्नेचर टेल लॅम्पही ठळक रुपात आहेत आणि त्यामुळे, या गाडीच्या डिझाइनची एक वेगळी, वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण होते.
S-PRESSOच्या आत : अनोख्या ठिकाणी असलेल्या इन्स्ट्रूमेंट क्लस्टरची सुविधा पहिल्यांदाच
S-PRESSOमधील अनोख्या आणि आकर्षक अंतर्गत सजावटीमुळे या गाडीला एक अनोखी स्टाईल प्राप्त होते. दमदार सेंटर कन्सोलमधून मिळणाऱ्या ऊर्जेमागे मजबूत स्पोर्ट वॉचेसची प्रेरणा असल्याने तरुण ग्राहकांना ही गाडी आकर्षित करून घेईल. ट्रेंडी इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल स्पीडोमीटर यामुळे या गाडीच्या अनोख्या स्टाईलमध्ये भर पडते आणि यात बोल्ड डिझाइन आणि नव्या तंत्रज्ञानाचा अप्रतिम मेळ साधला जातो.
S-PRESSOमधील हाय सीटिंग लेआऊटमुळे चालकाला सुयोग्य स्थिती मिळते. शिवाय, यामुळे सुयोग्य लेग रूमसोबतच सहज इनग्रेस आणि इग्रेस शक्य होते. यातील मोठ्या केबिन स्पेसला गडद स्पोर्टी काळ्या रंगाची जोड देण्यात आली आहे. शिवाय, यातील ठळक पॉप आऊट वैशिष्ट्यांमुळे तरुण ग्राहक अधिक आकर्षित होतील.
S-PRESSOमध्ये पुढच्या आणि मागच्या बाजूला सोयीस्कर वाटेल अशी युटिलिटी स्पेस आहे. यात ओपन ट्रे, ग्लोव्ह बॉक्स, डोअर ट्रिम आणि स्मार्टफोन ठेवण्यासाठी डोअर कन्सोल पॉकेट अशा अनेक सुविधा आहेत.
तंत्रज्ञान - वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असा गाडी चालवण्याचा साहसी अनुभव
S-PRESSOमध्ये या विभागातील पहिलीच स्टीअरिंग माऊंटेड ऑडिओ आणि व्हॉईस कंट्रोल सुविधा देण्यात आली आहे. यातील आधुनिक स्मार्टप्ले स्टुडिओमुळे संगीत, मनोरंजन आणि नेव्हिगेशन नेहमीच फक्त एका स्पर्शाच्या साह्याने करता येण्याची खातरजमा होते. यातील वापरकर्त्याच्या सोयीचे आणि ठळक ग्राफिक यूझर इंटरफेस अँड्रॉईड ऑटो, अॅपल कारप्ले आणि इतर स्मार्टप्ले स्टुडिओ अॅप्सला समर्थित आहे.
S-PRESSOमध्ये BS6 समर्थित खात्रीशीर 1.0 ली K10 इंजिन आहे. मॅन्युअल आणि एजीएस (ऑटो गीअर शिफ्ट) पर्यायांनी युक्त या गाडीमध्ये उत्तम परफॉर्मन्स आणि अप्रतिम इंधन क्षमतेची ग्वाही मिळते.
सुरक्षा आणि अतिरिक्त क्षमता : नेहमीच तुमच्या बाजूने
प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सातत्याने आणि अविरत प्रयत्न केल्याचे परिणाम S-PRESSOमध्ये दिसून येतात. सुझुकीच्या 5 व्या जनरेशनच्या HEARTECT व्यासपीठावर उभारलेली S-PRESSO फ्रंटल ऑफसेट क्रॅश, साइड इम्पॅक्ट आणि पादचाऱ्यांची सुरक्षा अशा सर्व भारतीय सुरक्षितता नियमनांची पूर्तता करते. HEARTECT व्यासपीठामुळे अधिक चांगले अॅब्झॉर्बशन मिळते आणि बॉडी स्ट्रक्चरमध्ये सुयोग्य एनर्जी डिस्परशन होऊन पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेची खात्री बळावते.
S-PRESSOमध्ये ड्युअल एअरबॅग्स, ईबीडी (इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन)सह एबीएस (अँटी-लॉक-ब्रेकिंग सिस्टम), प्री-टेन्शनर्स आणि फोर्स लिमिटर्ससह सीट बेल्ट्स, चालक आणि शेजारच्या सीटसाठी सीट बेल्ट रीमांइडर, रीअर पार्किंग असिस्ट सिस्टम, वेगाची सूचना देणारे वॉर्निंग अलर्ट आणि रीव्हर्स पार्किंग सेन्सर्स अशी अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.
Comments
Post a Comment