फेडरल बँकेने अचल संपत्तींना त्वरित निकालात काढता यावे यासाठी मॅजिकब्रिक्सबरोबर एमओयूवर सह्या केल्या
फेडरल बँकेने अचल संपत्तींना त्वरित निकालात काढता यावे
यासाठी मॅजिकब्रिक्सबरोबर एमओयूवर सह्या केल्या
मुंबई, 23 डिसेंबर 2019: फेडरल बँकेने, वसूली कार्यवाहीअंतर्गत बँकेने पुन: कब्जा मिळवलेल्या अचल संपत्तींचे यादीकरण व ई-ऑक्शनिंगसाठी मॅजिकब्रिक्सबरोबर भागीदारी केलेली आहे. मॅजिक ब्रिक्सने प्रस्तुत केलेले पोर्टल विविध ठिकाणांभरातील भावी खरेदीकर्त्यांपर्यंत विस्तृत व थेट पोहोच पुरवते. बँकेच्या या नव्या उपक्रमामागचे ध्येय विकल संपत्तीची त्वरेने वसूली करण्याचा असून याने ग्राहकांना त्यांच्या संपत्तींसाठी बाजारातील सर्वोत्तम दर मिळण्यात मदत होणार आहे.
मॅजिकब्रिक्स व फेडरल बँकेदरम्यानच्या या भारतभरातील व्यवस्थेने, बँकेचे ध्येय 30 प्रमुख खात्यांमधील या वर्षाच्या क्यू4 मधील 50 करोडच्या देयतेची विक्री / वसूली करण्याचे आहे. या व्यवस्थेमार्फत मॅजिकब्रिक्सची पोहोच कोणतेही भौगोलिक निर्बंध मोडीत काढत खरेदीकर्त्यांसाठी विविध प्रदेश तसेच उपभोक्ता श्रेणींभरात नेणे सुलभ होणार आहे.
फेडरल बँकेचे ईडी व सीएफओ, श्री. आशुतोष खजुरिया तसेच मॅजिकब्रिक्सचे प्रतिनिधी यांच्यादरम्यान काल सेवा स्तराच्या कराराची फेडरल बँकेच्या मुंबईतील बीकेसी येथे अदलाबदल करण्यात आली. या प्रसंगी बोलताना श्री आशुतोष खजुरियांनी व्यक्त केले की, “फेडरल बँकेने रचनाबध्द व शिस्तबध्द वसूली प्रयासांमार्फत आपल्या लोन बुकच्या गुणवत्तेची जोपासना करणे तसेच सुधारणा करत राहण्यावर लक्ष केंद्रित ठेवलेले असून, ही भागीदारी या दिशेत एक सकारात्मक पाऊल आहे.”
या भागीदारीवर टिप्पणी करताना श्री. सुधीर पै, सीईओ, मॅजिकब्रिक्स यांनी म्हटले की, “गेल्या दोन वर्षांपासून, मॅजिकब्रिक्सचा ई-लिलाव मंच बँकांसाठी त्यांच्या पुन: कब्जा घेतलेल्या संपत्तींची फेड करून घेत आर्थिक बोजा घटवण्याच्या दृष्टीने मुल्यास साजेशा स्वरूपाने उजागर झालेला आहे. आमचा ई-लिलाव मंच, संपत्ती घेऊ इच्छितांना पारदर्शक तसेच लेव्हल प्लेईंग फिल्डची प्रस्तुती करतो. फेडरल बँकेशी त्यांच्या अचल संपत्तींचे यादीकरण व ई-ऑक्शनिंगसाठी निगडीत होणे आमच्यासाठी चरम आनंददायक आहे.”
Comments
Post a Comment