भारतामध्ये स्किल्स एसजी वेन्चर्स ऑफ़ सिंगापोरसह पहिल्यांदाच ऑडीसंकरा द्वारे “प्रॅकडेमिक्स” ची सुरवात
भारतामध्ये स्किल्स एसजी वेन्चर्स ऑफ़ सिंगापोरसह पहिल्यांदाच
ऑडीसंकरा द्वारे “प्रॅकडेमिक्स” ची सुरवात
ऑडीसंकरा समूह स्किल्स एसजी वेन्चर्स सह एका अभूतपुर्व अशा
भागीदारीमध्ये सहभागी होणार आहे, ज्याच्या अंतर्गत
मुंबई, १९ डिसेंबर २०१९: चेन्नई येथे मुख्यालय असलेले ऑडीसंकरा, हे दक्षिण भारतात आपली व्याप्ती वाढवित असतानाच, स्किल्स एसजी वेन्चर्स नामक सिंगापोरमधील एका कंपनीसह आंध्रप्रदेशामध्ये एका बहु-क्षेत्रीय कौशल्य विकास भागीदारीमध्ये सामील होणार आहे. याबद्दलचा समझोता करार हा डॉ. पेन्चलैआ वेन्की, ऑडिसंकरा संस्थेच्या समूहाचे अध्यक्ष आणि श्री. डेविड क्वी, स्किल्स एसजी वेन्चर्सचे अध्यक्ष यांच्यामध्ये केला गेला (छायाचित्र जोडावे).
२१ व्या शतकातील शिक्षण आणि प्रायोगिक शिक्षणाच्या कौशल्यास प्रोत्साहन देत निपुण आणि गतीमान असे कार्यबल निर्माण करत ४ थ्या औद्योगिक क्रांतीच्या गरजा पूर्ण केल्या जातील. भारतामध्ये पदवीधरांची संख्या वाढत असताना देखील ४७ दशलक्ष कुशल कामगारांची कमतरता येत्या ५ वर्षात जाणविणार आहे. ही कमतरता योग्य प्रशिक्षण आणि कार्यपद्धती प्रदान केल्याने कमी होऊ शकते आणि तरूणांमधील रोजगार क्षमता देखील वाढवू शकते.
“आम्ही भारताला जागाची कौशल्य राजधानी म्हणून सहकार्य करायला तयार आहोत.” असे ऑडिसंकरा संस्थांच्या समूहाचे अध्यक्ष डॉ. वेन्की पेन्चलैआ म्हणाले. “आजच्या तरूणांना उच्च प्रतीचे कौशल्य असणे हे चांगल्या रोजगारिता आणि औद्योगिक क्षेत्रातील संधींकरिता आवश्यक आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीनंतर कौशल्य पूर्ण आणि विविधता असलेल्यांची मागणी केली जाते. आमची एसएसजीव्ही सह ची भागीदारी ही याकरिता एक महत्वाची भूमिका पार पाडेल आणि जगासह भारतातील २१ व्या शतकातील तंत्रज्ञान निपुण असे नेतृत्व निर्माण करेल.आमची अशी आशा आहे की आम्ही आंध्रप्रदेश सरकारच्या सध्याच्या कौशल्य विकास विद्यापिठ आणि २५ कौशल्य विकास केंद्रांच्या निर्माण नियोजनामध्ये सहकार्य आणि योगदान प्रदान करू.” असे ऑडिसंकरा संस्थांच्या समूहाचे, समूह सीईओ असलेले श्री. आदित्य बर्रेला म्हणाले.
“स्किल्स एसजी वेन्चर्स हे सिंगापोर येथे स्थित एक एकत्रित असे वेन्चर आहे, ज्यामध्ये १२ मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थांचा समावेश होतो. या प्रशिक्षणांना आपल्या क्षेत्रातील कौशल्य विकास अभ्यासक्रम आणि नैपुण्यता सशी सिंगापोर शासनाची मान्यता मिळालेली आहे.” व्यवसाय विकास संचालक असलेले श्री. चेंग हॉन्ग सियॅन्ग म्हणाले.
“आम्ही एकमेकांना सहाय्य, मूल्य आणि दृष्टीकोन देण्याच्या उद्देश्याने एकत्र आलो आहोत.” असे स्किल्स एसजी वेन्चर्सचे अध्यक्ष आणि ट्रेनिंग विजन इन्स्टिट्युटचे सीईओ असलेले श्री. डेविड क्वी म्हणाले. “शिक्षणामधील कौशल्य हा असा भाग आहे, ज्यामुळे माणसातील हुशारी विकसित होते ज्यात त्याला प्रायोगिक कौशल्य-विकसाची व्यवहारिकता, कष्टाने मिळविलेल्या शिक्षणाची आणि औद्योगिक- प्रतिक्रियात्मक अभ्यासक्रमाची जोड देखील मिळते. यामुळे शिक्षण हे मोड्युल्सच्या स्वरूपात उपलब्ध होते आणि एक उच्च शिक्षणाचा मार्ग देखील निर्माण होतो. यामुळे दीर्घकालीन शिक्षणाची प्रासंगिकता उपलब्ध होते आणि प्रगती देखील होते.”
समझोता करार (“एमओयु”) हा ऑडिसंकराच्या नेल्लोर, आंध्रप्रदेश येथे १७ डिसेंबर २०१९ रोजी करण्यात आला आणि यात १२ सिंगापोरमधील शिक्षण आणि कौशल्य विकास कंपन्यांचा समावेश आहे ज्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने ऑडिसंकाराचे प्रयत्न आजच्या उच्च शिक्षणामध्ये रूपांतरीत करण्यास त्यांना मदत करतील.
समझोता करार हा आंध्र प्रदेशात असलेला पण सिंगापोर द्वारे जागतिक दर्जाचे सहकार्य लाभलेला करार असून, यामुळे रोजगार, उद्योग आणि दीर्घकालीन शिक्षण प्रक्रियांचे एक उत्तम व्यासपिठ निर्माण होणार आहे:
डिजिटल आणि डिझाईन तंत्रज्ञानामध्ये एक उत्तम आणि आधुनिक असे केंद्र ज्यामुळे ड्युएल-ट्रॅक प्रमाणपत्र आणि पदवीधर उपक्रम राबविता येतील जे बाथ विद्यापिठ, बोस्टन विद्यापिठ, एक्सेसियर विद्यापिठांसारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापिठांसह संलग्न असतील. ड्युएल-ट्रॅक उपक्रम, एकत्रित संशोधन, आंतराष्ट्रीय रोजगार आणि अदलाबदल ही २०२०च्या दुसऱ्या सत्रात सुरू केली जाईल.
Comments
Post a Comment