पीएनजी ज्वेलर्स तर्फे नो मेकिंग अ‍ॅन्ड नो गोल्ड चार्जेस ऑफर


पीएनजी ज्वेलर्स तर्फे नो मेकिंग अ‍ॅन्ड नो गोल्ड चार्जेस ऑफर
*ग्राहकांना सॉलिटेअर हिरे खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन
पुणे,24 डिसेंबर 2019 : 2019 च्या वर्षाअखेरीस आणि लग्न-सराईच्या काळात पीएनजी ज्वेलर्स तर्फे फॉरएव्हरमार्क सॉलिटेअर डायमंड ज्वेलरीच्या खरेदीकरिता प्रोत्साहन देण्यासाठी एक नवीन ऑफर सादर करण्यात आली आहे. या ऑफरचा एक भाग म्हणून पीएनजी ज्वेलर्सने फॉरएव्हरमार्क सॉलिटेअर डायमंड ईयररिंग्सकरिता नो मेकिंग चार्जेस अ‍ॅन्ड नो गोल्ड चार्जेस ही ऑफर सादर केली आहे.

ही आकर्षक ऑफर पीएनजी ज्वेलर्सच्या पुणे,मुंबई,गोवा,औरंगाबाद,अहमदनगर आणि नागपूर येथे उपलब्ध असणार आहे. ही ऑफर केवळ 30 सेंट,40 सेंट आणि 50 सेंट सॉलिटेअर डायमंड ईयररिंग्सच्या खरेदीवर उपलब्ध असून ग्राहकांकरिता ही ऑफर १९ डिसेंबर,२०१९ ते 12 जानेवारी 2020 पर्यंत सुरू राहणार आहे.
 पीएनजी ज्वेलर्समध्ये विविध वयोगटातील महिलांच्या दागिन्यांबाबत गरजा लक्षात घेत अनेक आकर्षक पर्याय आहेत.डायमंडच्या या नवीन श्रेणीमुळे अनेक प्रसंगांमध्ये हे परिधान केले जाऊ शकतात.
 याप्रसंगी बोलताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले की, नवीन वर्ष अगदी उंबरठ्यावर येउन ठेपले आहे. तसेच, लग्न सराईचा काळ सुरू आहे. अशा रीतीने उत्सव आणि आपला आनंद एकाच वेळी साजरा करण्याची संधी सर्वानाच मिळत असताना आम्ही आमच्या ग्राहकांना अत्यंत उत्तम पद्धतीने व किफायतशीर दरात हा आनंद साजरा करण्याची संधी देऊ इच्छितो. सध्या हिर्‍यांच्या दागिन्यांमधील व्यवसाय आणि मागणी विविध कारणांमुळे वाढत असताना आम्ही वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक उत्पादने घेऊन ग्राहकांसमोर येत आहोत. तसेच, हिर्‍याची ईयररिंग सारखे उत्पादन खरेदी करण्यासाठी आकर्षक ऑफर देताना ग्राहकांना अधिकाधिक खरेदीसाठी प्रोत्साहन देऊ इच्छितो. ही योजना मर्यादित कालावधीसाठी असून ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE