हाऊस ऑफ पॅरागॉनतर्फे ट्रेण्डी मिलेनियन्ससाठी लाइफस्टाइल लेबल EEKEN सादर
हाऊस ऑफ पॅरागॉनतर्फे ट्रेण्डी मिलेनियन्ससाठी लाइफस्टाइल लेबल EEKEN सादर
- लंडन, युकेमध्ये डिझाइन आणि भारतात तयार करण्यात आलेल्या ब्रॅण्डचे उत्साही व हौशी जनरेशन झेडवर लक्ष्य
- पुरूष व महिलांसाठी अस्सल लेदर स्नीकर्स, आकर्षक किंमतींमध्ये उच्च दर्जाच्या स्टायलिश डिझाइन्स
मुंबई, २४ डिसेंबर २०१९: पॅरागॉन फूटवेअर या अग्रणी भारतीय फूटवेअर कंपनीने तरूण, उत्साही व सक्रिय जनरेशन झेड ग्राहकांसाठी अॅथलेजर व लाइफस्टाइल ब्रॅण्ड EEKEN सादर केला. तरूण व उत्साही ग्राहकांचे दैनंदिन जीवन, नित्यक्रम व फॅशनमध्ये आकर्षक रंगसंगीची भर करण्याच्या उद्देशाने ब्रॅण्ड EEKEN निर्माण करण्यात आला आहे. या ब्रॅण्डअंतर्गत 'वीकेण्ड लाइफ'शी संलग्न उपलब्ध होण्याजोगी, टिकाऊ लाइफस्टाइल स्नीकर्सची रेंज ऑफर करण्यात येईल. EEKEN हे नाव 'वीकेण्ड' (‘weekend’) या शब्दामध्येच आहे. या रेंजमध्ये शूज (लाइफस्टाइल, कॅन्व्हास व अॅथलेजर), सँडल्स आणि फ्लिप-फ्लॉप विभागांचा समावेश आहे. हे विभाग लंडन, युकेमध्ये डिझाइन करण्यात आलेले असून भारतात तयार करण्यात आले आहेत.
EEKEN रेंजच्या पहिल्या टप्प्यामध्ये ८० हून अधिक शूज डिझाइन्सचा समावेश असेल. पुढील तिमाहीमध्ये ग्राहकांना फ्लिप-फ्लॉप्स व सँडल्ससह ओपन फूटवेअरमधून निवड करण्याची संधी मिळेल. या विभागाची किंमत ९९९/- रूपये ते २९९९/- रूपये आहे.
ओपन व क्लोज फूटवेअरसाठी असलेल्या एकूण बाजारपेठेपैकी ६० टक्के बाजारपेठ असंघटित आणि ४० टक्के बाजारपेठ संघटित आहेत. असे असले तरी बाजारपेठ संघटित विभागाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पुढील ३ वर्षांमध्ये कंपनीची ब्रॅण्डच्या माध्यमातून ५०० कोटी रूपयांचे लक्ष्य गाठण्याची योजना आहे.
बाजारपेठेचा ६० टक्के भाग पुरूषांच्या फूटवेअर विभागाने व्यापलेला आहे आणि तो १० टक्के सीएजीआर दराने वाढत आहे. महिलांच्या फूटवेअर विभागाचा हिस्सा ३० टक्के आहे आणि तो २० टक्के सीएजीआर दराने वाढण्याचा अंदाज आहे. तसेच बाजारपेठेमध्ये लहान मुलांच्या फूटवेअर विभागाचा हिस्सा १० टक्के आहे आणि तो १२ टक्के ते १५ टक्के सीएजीआर दराने वाढत आहे.
फूटवेअर विभागामध्ये मोठी हालचाल होताना दिसत आहे. विविध जागतिक ब्रॅण्ड्स बाजारपेठेमध्ये प्रवेश करत आहेत आणि भारतीय ब्रॅण्ड्स नवीन डिझाइन्ससह मोठी भूमिका बजावत आहेत. विभागातील कॅज्युअल शूजसाठी किंमतीमध्ये काहीशी वाढ झाली आहे. पुरूषांच्या फूटवेअर विभागामध्ये नेहमीच ब्रॅण्ड राहिले आहेत, पण महिलांच्या विभागामध्ये आतापर्यंत कोणताच प्रमुख राष्ट्रीय फूटवेअर ब्रॅण्ड नाही आणि म्हणूनच बाजारपेठेमध्ये मोठी संधी आहे.
या सादरीकरणाबाबत बोलताना पॅरागॉन फूटवेअरच्या विपणन,EEKEN व माहिती तंत्रज्ञान विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष श्री. सचिन जोसेफ म्हणाले, ''भारत ही अॅथलेजर व स्पोर्टसवेअरसाठी झपाट्याने विकसित होत असलेली बाजारपेठ आहे. आम्ही तरूण, महत्त्वाकांक्षी असलेल्या आमच्या निष्ठावान ग्राहकांसाठी उच्च ऑफरिंग सादर करण्यासाठी उत्सुक आहोत. EEKEN रेंज सर्व वयोगटातील सूक्ष्मदर्शी ग्राहकांना आनंदित करेल. पॅरागॉन आपल्या ग्राहकांना दर्जा, टिकाऊपणा व पैशांचे मोल देण्यासाठी ओळखली जाते. EEKEN सह आम्ही अॅथलेजर व लाइफस्टाइल विभागातील डिझाइन आणि स्टाइलला उच्च स्तरावर घेऊन जाऊ. EEKEN उत्पादने फॅशनप्रेमी पुरूष व महिलांना पसंतीस येण्यासाठी लंडनमध्ये डिझाइन करण्यात येतील.''
परिषदेमध्ये पॅरागॉन फूटवेअरच्या विक्री व विपणनाचे संचालक श्री. जोसेफ जकारिया म्हणाले, ''आजचे तरूण आकर्षक लुक्सना अधिक प्राधान्य देतात आणि हा ट्रेण्ड अॅथलेजर बाजारपेठेच्या विकासाला चालना देत आहे. मध्यम किंमत असलेल्या विभागामध्ये, पण किफायतशीर लाइफस्टाइल विभागामध्ये EEKEN कार्यरत असेल. आम्ही मध्यमवर्गीय गटातील १८ ते २५ वर्षे वय असलेल्या तरूणांच्या आकांक्षा व गरजा पूर्ण करण्यासाठी ८० डिझाइन्स सादर करत आहोत. आमच्या ऑफरिंग आनंद देण्यासाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत.''
EEKEN लाँचच्या पहिल्या टप्प्यामध्ये कंपनी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अहमदाबाद, हैद्राबाद व बेंगळुरू अशा बाजारपेठांमध्ये प्रवेश करेल. दुस-या टप्प्यामध्ये देशभरातील इतर मेट्रो व महानगरीय शहरांमध्ये प्रवेश करण्यात येईल. पॅरागॉन फूटवेअरचे प्रमुख सामर्थ्य व्यापक पसरलेले डीलर व वितरक नेटवर्कमध्ये सामावलेले आहे. कंपनीची देशभरातील २.५ लाख रिटेलर्सच्या माध्यमातून ब्रॅण्ड उपस्थिती आहे.
पॅरागॉन फूटवेअर बाबत:
१९७५ मध्ये पॅरागॉन फूटवेअरची स्थापना करण्यात आली. कंपनीचे मुख्यालय केरळमध्ये होते आणि कंपनीची दिवसाला १५०० उत्पादन उत्पादित करण्याची क्षमता होती. वर्ष १९८२ मध्ये पॅरागॉनच्या इतर राज्यांमधील प्रवासास सुरूवात झाली. भारतभरातील १८ केंद्रांमधून कंपनीच्या फूटवेअरचे वितरण केले जाते. तसेच देशाच्या कानाकोप-यामध्ये रिटेल दुकानदारांना ५०० हून अधिक वितरकांची सेवा दिली जाते आणि कमीत-कमी वेळेमध्ये स्टॉक्स वितरित केले जातात. पॅरागॉनची इन-हाऊस फूटवेअर डिझाइन टीम देखील आहे. ही टीम बाजारपेठेची मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन डिझाइन्स व मॉडेल्स तयार करते.
Comments
Post a Comment