INSOFE, भारत आणि केस वेस्टर्न रिझर्व युनिव्हर्सिटी, युएसए यांच्या वतीने एकमेव अशा कोअर इंजिनिअरिंग डिसिप्लिन्स आणि डेटा सायन्स एमएसच्या शुभारंभाची घोषणा


INSOFE, 
भारत आणि केस वेस्टर्न रिझर्व युनिव्हर्सिटी, युएसए यांच्या वतीने एकमेव अशा कोअर इंजिनिअरिंग डिसिप्लिन्स आणि डेटा सायन्स एमएसच्या शुभारंभाची घोषणा  
मुंबई 27 फेब्रुवारी, 2020: सीएएसई वेस्टर्न रिझर्व युनिव्हर्सिटी, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग यांच्याकडून  डिपार्टमेंट्स ऑफ बायोमेडीकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिविल इंजिनिअरिंग यांनी इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंजिनिअरिंग (आयएनएसओएफई) समवेत हातमिळवणी केली असून मास्टर डिग्री समवेत ड्यूएल स्पेशलायजेशन्स (कोअर अँड डेटा सायन्स/एआय) देऊ करण्यात येणार आहेत.   



हा प्रोग्राम INSOFE येथे डेटा सायन्स एज्युकेशनच्या 15 क्रेडीटनी सुरू होतो. एकदा ही क्रेडीट पूर्ण झाली, की अभ्यासक्रमाची उर्वरित क्रेडीट केस ही क्लीव्हलँड येथील वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीमध्ये सुपूर्द करण्यात येतील. 

या अभ्यासक्रमाचे प्रमुख लाभ
·         हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना क्लीव्हलँड ओएच, केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीकडून मास्टर डिग्रीकरिता संपूर्ण अधिस्वीकृत्या मिळतील आणि त्यामुळे 3 वर्षांच्या ओटीपी (युएससीआयएसकडून संमती मिळविण्याधीन) मधून लाभ मिळवता येईल.
·         हे अभ्यासक्रम अशापद्धतीने डिझाईन करण्यात आले आहेत की कोणत्याही इंजिनिअरिंग विद्यार्थ्याला कोणत्याही शाखेची निवड करणे शक्य होईल. केवळ विद्यार्थी हा गणित विषयाची पार्श्वभूमी असलेला असावा.
·         एकदा का विद्यार्थ्यांची निवड मुलाखत प्रक्रियेतून झाली की तो जीआरई/टीओईएफएल वेव्हर आणि $15,000 ट्युशन फी वेव्हरकरिता पात्र ठरणार आहे.
यावेळी बोलताना केस स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे डीन डॉ. वेंकटरामन रागू बालकृष्णन म्हणाले, “केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी येथील द केस स्कूल ऑफ इंजिनिअरिंगला उद्योगक्षेत्र तसेच इंजिनिअरिंग शाखेतील डेटा सायन्सचे महत्त्व समजले आहे. आमचे ड्यूएल स्पेशलायजेशन मास्टर्स डिग्री प्रोग्राम डेटा सायन्समधील ठोस अभ्यासक्रम उपलब्ध करून देतात. ते आमच्या पदवीधरांना त्यांच्या क्षेत्रात मदत करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आले आहेत. मी INSOFE सोबतच्या आमच्या भागीदारीसमवेत या अभ्यासक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. 

INSOFE चे अध्यक्ष आणि सह-संस्थापक डॉ. दक्षिणमूर्ती व्ही कोल्लूरू म्हणाले की, आता डीप लर्निंग सहज उपलब्ध आहे, त्यामुळे संघटना गुंतागुंतीच्या समस्यांवर काम करत आहेत. डेटा सायन्सचा वापर करून महत्त्वाच्या समस्या सोडविल्या जात आहेत. त्यामुळे स्वत:चे क्षेत्र  आणि डेटा सायन्स उत्तम प्रकारे जाणतात, असे इंजिनिअर ही काळाची गरज आहे.

झेडएस सहयोगी श्री. अंकुश गुप्ता म्हणाले की'लाइफसाइन्सेस उद्योगात महत्त्वाच्या दुहेरी वाटा उत्पन्न झाल्या आहेत. जिथे एआय आणि डेटा सायन्स सुधारित वाणिज्यिक आणि डेटा सायन्स मदतीचे ठरतात. उदाहरणार्थफार्मा कंपन्या आरोग्यसेवांशी अधिक चांगल्या पद्धतीने कशा व्यस्त राहू शकतात किंवा रोगनिवारक काळजी घेण्यासाठी आणि थेरपी पूर्ण करण्यासाठी रुग्णांच्या घटनांचा अंदाज लावू शकतात! अशा समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही झेडएसमध्ये उद्योग आणि डेटा विज्ञान खोलवर समजून घेणाऱ्या तज्ज्ञांवर विश्वास ठेवतो. या कार्यक्रमाचे समान दुहेरी उद्दीष्ट आहे आणि भविष्यातील तज्ज्ञ तयार करण्यासाठी योग्य मूलभूत पायरी असल्यासारखे वाटते.

हेड ऑफ एज्युकेशन युएसए, INSOFE आणि सीईओ, सुथसेयर अॅनलेटीक्स, युएसए स्थित डेटा सायन्स आणि ए. आय. कन्सल्टींग कंपनीचे गौरव अगरवाल म्हणाले की, “हा मास्टर प्रोग्राम भारतातील युवकांसाठी अभिनव संधी घेऊन आला आहे, जेणेकरून ते वैश्विक बाजारपेठेत डेटा सायन्समधील असमांतर शिक्षण घेऊन सर्वोत्तम कामगिरी बजावतील. युवकांकरिता रोजगाराच्या संधी सुधारतील व भारताची क्रमवारी अशा प्रतिभावंतांमुळे सर्वोच्च स्थानी येईलअसे म्हणून अगरवाल यांनी उपस्थित मीडियाचे त्यांनी दिलेल्या पाठबळाबद्दल आभार मानले.   

INSOFE विषयी
INSOFE ही जागतिक दर्जाची संशोधनसल्लागार आणि शैक्षणिक संस्था आहे, जिचा भर डेटा सायन्स, एआय आणि मशीन लर्निंगवर आहे. आपला विस्तार डेटा सायन्स या कल्पनेपलीकडे व्हावा व कम्प्युटर सायन्समध्ये स्पेशलायजेशन शक्य व्हावे यामुळे आम्ही या महत्त्वाच्या शिक्षण पर्यायाचा विचार केला, ज्यामध्ये सायन्स आणि डेटा समन्वय राखता येईल. आरोग्य देखभाल, पुरवठा साखळी, वित्तीय बाजारपेठा आणि रोबोटीक्स अशा विविध शाखांमधील समस्यांचे निराकरण या पर्यायाद्वारे करण्यात येते आहे. आम्ही तंत्रज्ञान संवेदनशील उद्योगक्षेत्रातील लागू अभियांत्रिकीचे शिक्षण देण्याबाबत उत्कट आहोत. आम्ही सीएक्सओनॉन-टेक लीडरटेक लीडर आणि एक्झिक्युटिव्ह यांच्या सहाय्याने या शिक्षणाला आमच्या कामाद्वारे नवीन आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे. आमचा विश्वास आहे की हे जग चांगल्यासाठी बदलेल.

INSOFE ची खासियत
·  विविध क्षेत्रांमध्ये डेटा सायन्स लागू करण्यात कल्पक शैक्षणिक अभ्यासक्रम तयार करणे
·  डेटा सायन्सच्या प्रसारामुळे उद्योगक्षेत्रामधील बदलत्या भूमिकांवर संशोधन
या प्रत्येक भूमिकेसाठी योग्य हस्तक्षेप चालवणारे प्रात्यक्षिक प्रोग्राम तयार करणे आणि उपलब्ध करून देणे.
·         संशोधन करणेआयपी तयार करणेउत्पादनांत नाविन्य आणणे आणि कंपन्यांशी सल्लामसलत करण्यासाठी त्यांना काही अत्यंत आव्हानात्मक अशा वास्तविक-जगाच्या समस्या सोडवण्यास मदत होईल.


आमचे अभिनव पैलू
·  15 पूर्णवेळ शिक्षक
·  सहयोगी शिक्षक
·  40+ डेटा सायंटीस्ट
·  6000+ विद्यार्थी

केस वेस्टर्न रिझर्व युनिव्हर्सिटीबद्दल
सुमारे 125 हून अधिक वर्षांचा अनुभव असणाऱ्या केस वेस्टर्न रिझर्व युनिव्हर्सिटीमधील केस स्कूल ऑफ इंजिनिअरिंगची मुळे एकत्रित संशोधन आणि प्रायोगिक शिक्षणात आहेत. अद्वितीय शिक्षक वर्गासमवेत विद्यार्थी चौकसपणा दाखवतात, शोध घेतात आणि निर्मिती करतात. क्लीव्हलँड येथील सांस्कृतिकदृष्ट्या पुढारलेल्या समुदायात वर्ग घेतले जातात, जिथे वैश्विक व्यावसायिकांचे जाळे उभारले जाते आहे.

·  युएसएमधील सर्वात अग्रेसर खासगी संशोधन संस्थांपैकी एक. हायर लर्निंग कमिशनची अधिस्वीकृती
·  स्थापना 1826 मध्ये
·  17 नोबेल पुरस्कार विजेते
·  वेगवेगळ्या 81 देशांमधून 12,000 विद्यार्थी
·  20000+ माजी विद्यार्थी



Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24