पेटीएमने पंतप्रधान केअर्स फंडात ५०० कोटी रुपयांचे योगदान देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे


पेटीएमने पंतप्रधान केअर्स फंडात ५०० कोटी रुपयांचे 
योगदान देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे

कोविड -१९ विषाणू विरूद्धच्या लढ्यास समर्थन देण्यासाठी, भारताचे आघाडीचे डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा प्लॅटफॉर्म पेटीएम पेटीएम अ‍ॅपवर पंतप्रधान केअर्स (पंतप्रधान नागरिक मदत व आपत्कालीन परिस्थिती निधीमध्ये मदत) साठी योगदान करणार आहे. पीएम-केअर्स फंडात  ५०० कोटी रुपयांचे योगदान देण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.

वॉलेट, यूपीआय आणि पेटीएम बँक डेबिट कार्डचा वापर करुन पेटीएमवर केलेल्या प्रत्येक योगदानासाठी किंवा इतर कोणत्याही देयकासाठी, कंपनी १० रुपयांपर्यंत जास्तीचे योगदान देईल.

गेल्या काही आठवड्यांत पेटीएमने कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. ज्यांच्याकडे वैयक्तिक स्वच्छता साधने खरेदी करण्यासाठी निधी नसले अशा लोकांसाठी वैयक्तिक स्वच्छता साधने खरेदी करण्यासाठी योगदान करणे सुरू केले आहे. तसेच या विषाणूचा सामना करण्यासाठी वैद्यकीय उपकरणे किंवा औषधे विकसित करणार्‍या इन्नोव्हेटर्ससाठी कंपनीने पाच कोटींचा निधी तयार केला आहे.

पीएम केअर्स फंडला आयकर कायदा नुसार १९६१ च्या कलम १० आणि १३९ च्या अंतर्गत परताव्याच्या उद्देशाने सूट देण्यात आली आहे. पीएम केअर्ससाठी केलेले योगदान इन्कम टॅक्स ऍक्ट १९६१ च्या ८० (जी) या सेक्शन अंतर्गत करपात्र उत्पन्नातून १०० टक्के करमाफीसाठी पात्र असेल.

Comments