मारवाडीज इन ठाणे' चा आगळावेगळा समाजसेवी उपक्रम


कोरोना रुग्णांच्या चांगल्याप्रकारे उपचारासाठी 
ठाणे सिव्हील इस्पितळास सकस खाद्यान्न सामुग्री प्रदान:
'मारवाडीज इन ठाणे' चा आगळावेगळा माजसेवी उपक्रम

मारवाडीज इन ठाणे वेल्फेअर संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्षा सौ. सुमन अग्रवाल यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या सदर सामाजिक उपक्रमांतर्गत नुकत्याच जिल्हा प्रशासनाने  सिव्हील हास्पिटल, ठाणेच्या सिव्हील सर्जनतर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जिल्ह्यातील या सर्वात मोठ्या इस्पितळात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल रुग्णांकरिता सकस खाद्यान्न सामुग्री प्रदान करण्यात आली. या खाद्यान्न सामुग्रीमध्ये रवा, मैदा, साखर, शुद्ध तूप, शेवया, गुळ, साबण, मिनरल वाटर आदी वस्तूंचा समावेश होता
 
   जिल्ह्यातील सर्वात मोठा सरकारी रुग्णालया असल्यामुळे ठाणे सिव्हील इस्पितळामध्ये मोठ्या संख्येने कोरोनाबाधितांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यात ठाणे महापालिका हद्दीतील क्षेत्रांमध्ये सध्या कोरोनाबाधितांची संख्या सुमारे २५०, मिरा-भायंदरमध्ये १४६, नवी मुंबईत १३२ तर कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील क्षेत्रांमध्ये ही आकडेवारी   १२९ वर पोहोचलेली आहे

भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोविड-१९ या विनाशकारी महामारीचा संसर्ग अत्यंत तिव्रतेने पसरत असून आतापर्यंत महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा ९००० तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या औद्योगिक हब मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात हा आकडा ७०० वर पोहोचलेला आहे. एकूण परिस्थिती फार चिंताजनक झाली आहे. केवळ ठाणे महापालिका हद्दीतील क्षेत्रांमध्ये कोरोनाबाधित संशयितांची संख्या २५० इतकी झालेली आहे. कोरोनाच्या या महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी  सध्या सुरू असलेल्या आतापर्यंतचा सर्वात मोठ्या राष्ट्रव्यापी लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांचे फार वाईट हाल झाले आहे. बजारपेठ, उद्योगधंदे, कारखाने, दुकानी आदी सर्व काही व्यवहार बंद असल्याने काम  पैश्यांच्याअभावी अनिवासी रोजंदारीमजुर  असंघटीत क्षेत्रातील गोरगरीब कामगारांवर अगदी उपसमारची पाळी आलेली आहे. संकटाच्या अशा विकट परिस्थितीत या गोरगरिब-गरजूंच्या सढळहस्ते मदतीसाठी सरकारीयंत्रणेच्या कांद्याला कांधा लावून कित्येक स्वयंसेवी सामाजिक संघटनाही पुढे सरसावलेली आहेत. अशा संघटनांमध्ये मारवाडीज इन ठाणे वेल्फेअर संस्थेसह मारवाडी समाजातील अनेक संघटनांचे समावेश आहे. लॉकडाऊनच्या सद्यकाळात मागील काही दिवसांपासून मारवाडीज इन ठाणे वेल्फेअर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली विविध भागांतील झोपडपट्टया  चाळींमध्ये राहणाऱ्या गोरगरिब-गरजू मजुरांना सातत्याने खाद्यान्नाचा वाटप करण्यात येत आहे.  
     
      सामाजिक बांधिलकीने अशाचप्रकारे सर्वांनी एकवटून माणुसकीला हातभार लावून कोरोनाच्या विरुद्धातील लढाईत विजयश्री संपादित करावयाची आहे आणि आपण सगळे मिळून हे नक्कीच करून दाखवू, असा ठाम विश्वास सौ. सुमन  अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth