तैवानचे स्‍मार्ट मॅन्‍युफॅक्‍चरिंग सोल्‍यूशन्‍स कोविडचा प्रादुर्भाव थांबल्‍यानंतर उद्योगक्षेत्राला देणार चालना

तैवानचे स्‍मार्ट मॅन्‍युफॅक्‍चरिंग सोल्‍यूशन्‍स कोविडचा 
प्रादुर्भाव थांबल्‍यानंतर उद्योगक्षेत्राला देणार चालना
मुंबई, एप्रिल २०२०: कोविड-१९ महामारीचा जगभरातील व्‍यवसायांवर प्रतिकूल परिणाम झाला असताना जगभरातील देश पर्यायी उपाय शोधण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. तैवान हे आयसीटी केंद्र असल्‍यामुळे देशातील उद्योग उत्‍पादनांमध्‍ये आयओटी संकल्‍पनांचा अवलंब करत आले आहे आणि सेन्‍सर सिस्टिम्‍स, ऑटोमेशन उकपरण, बिग डेटा विश्‍लेषण व ए.आय. अशा उच्‍च तंत्रज्ञानांचा समावेश करत आले आहे. या बेटाने पारंपारिक मशिनरी उत्‍पादनांमधून स्‍मार्ट उत्‍पादनाच्‍या सोल्‍यूशन प्रदात्‍यांमध्‍ये बदल केला आहे. हे उद्योग इंडस्‍ट्री ४.०च्‍या जागतिक विकासामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
अलिकडील काळात आयओटीने संपूर्ण उद्योगक्षेत्राला पुनर्परिभाषित करत उद्योगामध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. डिजिटल तंत्रज्ञान आणि ऑटोमेटेड कंट्रोल तंत्रज्ञानाच्‍या एकीकरणाच्‍या माध्‍यमातून आयओटी मानवी-रोबो सहयोग व सहकार्य, प्रक्रिया ऑटोमेशन घडवून आणू शकते आणि उच्‍च-स्थिर उत्‍पादन सुविधांची निर्मिती करू शकते. सध्‍याच्‍या स्थितीमध्‍ये कमी आकारमान आणि उच्‍च मिश्रित बाजारपेठ मागणीमुळे उत्‍पादक त्‍यांच्‍या उत्‍पादन प्रक्रियेमध्‍ये सुधारणा करत उच्‍च सानुकूल पद्धतींचा अवलंब करू शकतात. या नवीन दृष्टिकोनामुळे उत्‍पादन क्षमता वाढू शकते, नवीन महसूलाला चालना मिळू शकते आणि व्‍यवसाय संधी निर्माण होऊ शकतात. उत्‍पादन सुविधा स्थिर व कार्यक्षम होऊ शकतात, ऑपरेटर्स इंटरनेट-कनेक्‍टेड डिवाईसेसच्‍या माध्‍यमातून समस्‍या निवारण करू शकतात आणि आधुनिक उत्‍पादन स्थितीबाबत माहिती प्राप्‍त करू शकतात.
चिन फाग मशिन इंडस्‍ट्रीयल कं. हे एक चांगले उदाहरण आहे. ही कंपनी आयओटी तंत्रज्ञानाला चालना देते. या कंपनीची इंटेलिजण्‍ट डबल क्रँक पॉवर प्रेस बिग डेटा कलेक्‍श्‍ान, एआय तंत्रज्ञान आणि सेन्सिंग उपकरणाचा समावेश करत स्‍वयं-देखरेख कार्यक्षमता देते. क्‍लाऊड तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आणि ऑटोमेटेड प्रॉडक्‍शन लाइन्‍सच्‍या एकीकरणाच्‍या माध्‍यमातून पॉवर प्रेस स्‍मार्ट उत्‍पादन व्‍यवस्‍थापन देखील संपादित करू शकते. दुसरी एक कंपनी आहे इक्विपटॉप. ही कंपनी स्‍मार्ट प्रीसिशन ग्राइण्‍डर ऑफर करते, जे आयओटी कार्यक्षमतांच्‍या एकीकरणाच्‍या माध्‍यमातून नवीन विक्रीपश्‍चात्त यंत्रणेची निर्मिती करते.
तैत्राच्‍या धोरणात्‍मक विपणन विभागाचे कार्यकारी संचालक मार्क वू म्‍हणाले, ''औद्योगिक आयओटी नेक्‍स्‍ट-जनरेशन मॅन्‍युफॅक्‍चरिंग यंत्रणेचे आधारस्‍तंभ मानले गेले आहे. उद्योगक्षेत्र कोविडच्‍या परिणामांमधून सावरण्‍याचा प्रयत्‍न करत असताना याला अधिक महत्त्व प्राप्‍त झाले आहे. तैवानमधील उद्योगक्षेत्राने प्रगत आयसीटी व स्‍मार्ट उत्‍पादनाच्‍या एकीकरणाच्‍या माध्‍यमातून औद्योगिक आयओटीची नवीन इकोप्रणाली निर्माण केली आहे. ते औद्योगिक सुधारणेच्‍या काळामध्‍ये जागतिक उत्‍पादन उद्योगक्षेत्रासाठी सर्वोत्तम भागीदार म्‍हणून त्‍यांची योग्‍यता सिद्ध करू शकतात.''

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs