आयडीएफसी फर्स्ट बँक ऑनलाइन बचत खात्यांसाठी व्हिडिओ केवायसी सुरु करीत आहे

 आयडीएफसी फर्स्ट बँक ऑनलाइन बचत खात्यांसाठी 
व्हिडिओ केवायसी सुरु करीत आहे
ग्राहक घरबसल्या 7% कमाई सुरू करू शकतात
डिजिटल भ्रमंती ग्राहकांना घरबसल्या शाखेप्रमाणे अनुभव प्रदान करून केवायसी ऑनलाईन पूर्ण करण्यास सक्षम करते

मुंबई, 27 मे, 2020: ग्राहकांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देत आयडीएफसी फर्स्ट बँकेने आज ऑनलाइन बचत खाती उघडण्याच्या दिशेने व्हिडिओ केवायसी सुरू करण्याची घोषणा केली. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत डिजिटल प्रवास बचत खाते उघडणे सुखद बनवतो, कारण तो ग्राहकांना कागदविहीन केवायसी प्रक्रिया अंदाजे दोन मिनिटांत पूर्ण करून आणि बचत खात्यातील शिल्लक रकमेवर या व्यवसायातील सर्वोत्कृष्ट व्याज दराचा लाभ मिळवून देतो.
डिजिटल सुविधा ग्राहकांना घरबसल्या शाखा-सदृश अनुभव देऊ करते ज्यायोगे ग्राहकांना अक्षरशः त्यांना सोयीस्कर असलेल्या वेळेवर बॅंकर्सना भेटणे शक्य होते. शून्य संपर्क पद्धत कागदपत्रांचे कार्य किंवा बायोमेट्रिक पडताळणीस पूर्णपणे दूर ठेवते, ज्यायोगे केवायसी प्रक्रियेतून बँक आणि ग्राहक यांच्यात शारिरीक संवाद काढून टाकणे आवश्यक होते.
महामारीने ग्राहकांच्या त्यांच्या बँकांशी संवाद साधण्याच्या पद्धतीत बदल केला आहे कारण ते आता व्यवहारांसाठी अधिकाधिक डिजिटल आणि मोबाईल वाहिन्यांवर अवलंबून असतात. नवीन डिजिटल अनुभव निर्माण करण्यात अग्रभागी असलेली बँक म्हणून, आयडीएफसी फर्स्ट बँकेने, सामाजिक अंतर राखणे शक्य करतानाच, ग्राहकांना वैयक्तिकृत मानवी सहाय्य देऊन, या वाढत्या गरजेला त्वरित प्रतिसाद दिला आहे.
आयडीएफसी फर्स्ट बँकेचे किरकोळ देयता प्रमुख – अमित कुमार म्हणाले, “ग्राहक-केंद्रित बँक म्हणून आम्ही डिजिटल अनुभवांची निर्मिती करीत आहोत ज्यामुळे शाखेत असल्यासारखा अनुभव कायम ठेवून ग्राहकांना सुरक्षित आणि व्यस्त असल्याची अनुभूती मिळेल.”  व्हिडीओ केवायसी बचत खाती उघडण्याचा ऑनलाइन प्रवास सुलभ आणि जलद करते कारण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या घराबाहेर जाण्याची किंवा बँकेच्या कोणासही भेटण्याची गरज नाही. ग्राहक 7% व्याज मिळविणे सुरू करू शकतात आणि राखून ठेवलेल्या किंवा कुठेही गुंतवलेल्या निधीवर त्यांचे उत्पन्न जास्तीत जास्त वाढवू शकतात. बहुतेक इतर पर्यायांनी सध्याच्या काळात केलेले उत्पन्नाचे नुकसान आणि कमी परतावा याच्याशी हे विशेषतः सुसंगत आहे.” 
ऑनलाइन बचत खाते उघडण्यासाठी आरबीआयने मंजूर केलेल्या व्हिडिओ-आधारित केवायसी प्रक्रियेमुळे ग्राहकांना खात्यातील कमाल शिलकीवर कोणतीही मर्यादा न ठेवता पूर्णपणे क्रियाशील बचत खाते उघडता येते.
जेव्हा ऑनलाइन बचत खाते उघडले जाते, तेव्हा ग्राहकांना वापरकर्ता-विशिष्ट व्हिडिओ केवायसी लिंक पाठवली जाते आणि बँकेचा प्रतिनिधी व्हिडिओ कॉलवर केवायसी पूर्ण करतो. नियमांच्या अनुसार ग्राहकांच्या डेटाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी बँकेची कठोर नियंत्रणे आहेत.
आयडीएफसी फर्स्ट बँक बचत खात्यासोबत अनेक ऑफर्स युक्त डेबिट कार्ड, प्रयोक्ता-सुलभ मोबाईल अ‍ॅप आणि नेट बँकिंग, व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग आणि बचत खात्यावर शिल्लक असलेल्या 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर व्यवसायातील सर्वोत्तम 7 % व्याज दर असे इतर बरेच फायदे मिळतात.
बँक आपल्या ग्राहकांच्या वाढत्या गरजांना त्वरित प्रतिसाद देऊन ग्राहकांना त्यांच्या डिजिटल बँकिंग प्रवासात सहाय्य करण्यास आणि त्यांना दूरस्थपणे व्यवहार करण्यात मदत करण्यास वचनबद्ध आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202