‘कोविड-19’साठीच्या ‘व्हेंटिलेटर’मध्ये लागणारे ‘प्रपोर्शनल सोलेनॉइड व्हॉल्व्ह’ विकसीत करून पहिल्या 1000च्या बॅचचे वितरण ‘डीआरडीओ’ला करण्यात ‘गोदरेज एअरोस्पेस’ यशस्वी

कोविड-19साठीच्या व्हेंटिलेटरमध्ये लागणारे प्रपोर्शनल सोलेनॉइड व्हॉल्व्ह विकसीत करून पहिल्या 1000च्या बॅचचे वितरण डीआरडीओला करण्यात गोदरेज एअरोस्पेस यशस्वी

मुंबई, 19 जून 2020 : व्हेंटिलेटर निर्मितीमध्ये आवश्यक असणारा प्रपोर्शनल सोलेनॉइड व्हॉल्व्ह हा भाग गोदरेज एअरोस्पेस या गोदरेज समुहातील कंपनीने संरक्षण विकास व संशोधन संस्थेसाठी (डीआरडीओ) उत्पादित केला आहे. हे एक हजार व्हॉल्ह नुकतेच डीआरडीओकडे वितरीत करण्यात आल्याची माहिती या समुहातील प्रमुख कंपनी गोदरेज अॅंबॉने दिली आहे.
रुग्णाच्या श्वासोच्छवासाच्या प्रत्येक चक्रात ऑक्सिजनच्या प्रवाहावर आवश्यकतेनुसार नियंत्रण ठेवणारा प्रपोर्शनल सोलेनॉइड व्हॉल्व्ह(पीएसव्ही) हा व्हेंटिलेटर आणि इतर वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीमधील एक महत्त्वपूर्ण घटक आहे.
वैद्यकीय उपकरणांसाठी लागणाऱ्याटीअशा इलेक्ट्रो-मॅग्नेटिक व्हॉल्व्हच्या निर्मितीनंतर, गोदरेज एरोस्पेस आता विविध प्रकारचे पीएसव्ही तयार करणार आहे. गंभीर वैद्यकीय स्वरुपाच्या व इतर उपकरणांची सध्याची आणि भविष्यातील मागणी पूर्ण करण्यासाठी संपूर्णपणे मेड इन इंडियाअसे हे उत्पादन असेल. कोविड-19 नंतरच्या काळात अनेक कंपन्या पुरवठ्याची साखळी पुरुज्जीवित करण्याचे प्रयत्न करीत आहेत. अशा वेळी वैद्कीय उपकरणांच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाऊल टाकण्याच्या दृष्टीने गोदरेज एअरोस्पेसतर्फे योजना आखण्यात येत आहेत.
कोविड-19च्या उद्रेकामुळे देशभरात व्हेंटिलेटर आणि इतर जीवनरक्षक उपकरणांची मागणी वाढू लागल्याने, गोदरेज एअरोस्पेसने संपूर्ण प्रपोर्शनल सोलेनॉइड व्हॉल्व्हची निर्मिती करण्याचे आव्हान घेतले. भारतातील हा पहिलाच प्रयत्न होता. डीआरडीओ, एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स (बीईएल) या संस्थांच्या तज्ज्ञांनी गोदरेज एअरोस्पेसमधील अभियंत्यांना सहकार्य केले. या सर्व पथकांनी 24 तास काम केले आणि वस्तूंचा पुरवठा व ने-आण यांवर कठोर निर्बंध असतानाही केवळ 10 दिवसांत उत्पादन सुरू केले. यात डीआरडीओच्या डिझाइनवर आधारित प्रोटोटाइपसाठी टेस्ट-रिग उभारणे हेही समाविष्ट होते. गोदरेज एअरोस्पेसने कर्मचार्‍यांसाठी स्वच्छता, सुरक्षा आणि सामाजिक अंतर राखण्याच्या नियमांवर लक्ष केंद्रित करुन हे काम केले.
एक हजारावा व्हॉल्व्ह हस्तांतरीत करण्याच्या डिजिटल समारंभात हा व्हॉल्व्ह स्वीकारताना प्रमुख पाहुणे, डीआरडीओचे अध्यक्ष, एडीएचे महासंचालक व सरकारच्या डिफेन्स आर अॅंड डी विभागाचे सचिव डॉ. जी. सतीश रेड्डी म्हणाले, “व्हेंटिलेटर व्हॉल्व्ह विकसीत करून त्याचे 1 हजार इतके उत्पादन अतिशय कमी वेळेत घेण्याच्या कार्यात गोदरेज एअरोस्पेसशी भागीदारी केल्याबद्दल आम्हाला समाधान वाटत आहे. कोविड-19च्या साथीच्या काळात लोकांचे जीव वाचविण्याकरीता हे व्हॉल्व्ह फार महत्त्वाचे आहेत. गोदरेजशी आमचे संबंध गेल्या अनेक दशकांपासून आहेत. या काळात गोदरेज समूह नेहमीच एक विश्वासार्ह भागीदार राहिलेला आहे. सध्याच्या काळात आपल्या देशाच्या पलीकडे जाऊन या कंपनीने अन्य देशांना हे व्हॉल्व्ह पुरवावेत यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन देत आहोत आणि या कामी आम्ही आवश्यकतेनुसार मदतही करायला तयार आहोत. गोदरेजचे वरिष्ठ व्यवस्थापक, उत्पादन विभागातील अधिकाऱी, शॉप फ्लोअरवरील कामगार व कंपनीचे पुरवठादार यांनी अवघड परिस्थितीत अतिरिक्त श्रम घेऊन कार्यभाग साधल्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो."
गोदरेज अॅंबॉचे कार्यकारी संचालक व प्रेसिडेंट अनिल जी वर्मा म्हणाले, “आम्ही 1897 मध्ये कुलुपे व साबण बनविण्यास सुरुवात केली, तेव्हापासूनच देशाला स्वयंपूर्ण बनविण्याचे आमचे ध्येय निश्चित झाले. गोदरेज एअरोस्पेसमध्ये आम्ही दक्ष नियोजनाने कठोर परिश्रम करीत असतो व त्याचे फळ आम्हाला मिळाले आहे. मुंबईत कडक टाळेबंदी असूनही, आम्ही 1 हजार व्हॉल्व्ह अल्पावधीतच बनवून वितरीत करू शकलो. डीआरडीओ, बीईएल, एडीए यांच्या पथकांचे सततचे मार्गदर्शन व प्रोत्साहन, तसेच आपल्या कर्तव्यनिष्ठेतून मेड इन इंडिया स्वरुपाच्या उपक्रमाला पाठिंबा देणाऱ्या 22 पुरवठादारांचे सहकार्य याशिवाय हे यश साध्य झाले नसते.
गोदरेज एअरोस्पेसचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख सुरेंद्र एम. वैद्य म्हणाले, ‘’संरक्षण, अंतराळ मोहिमा आणि उपग्रह प्रक्षेपण यांसारख्या क्षेत्रांत डीआरडीओबरोबर तीन दशकांपेक्षा अधिक काळ आमची भागीदारी सुरू आहे. डीआरडीओच्या डिझाइनच्या आधारे, ‘प्रपोर्शनल सोलेनॉइड व्हॉल्व्ह10 दिवसात विकसीत होऊन त्यांचे उत्पादनही झाले. एक हजार व्हॉल्व्हजचे वितरण झालेले आहे आणि पुढील दोन हजार व्हॉल्व्ह जूनच्या अखेरीस वितरित करण्याचे आमचे लक्ष्य आहे. महत्त्वाच्या अशा एका घटकाच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये आमच्यावर आणि भारताच्या आत्मनिर्भरतेवर सतत विश्वास ठेवणाऱ्या डीआरडीओ, एडीए आणि बीईएल यांचे आम्ही मनापासून आभार मानतो."

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24