एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीतर्फे जैविक आणि रासायनिक शस्त्रांच्या निर्मूलनावरील 4 दिवसीय अंतर्राष्ट्रीय परिषदेचा प्रारंभ

एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीतर्फे जैविक आणि रासायनिक शस्त्रांच्या 


निर्मूलनावरील 4 दिवसीय अंतर्राष्ट्रीय परिषदेचा प्रारंभ

 

जैव-रासायनिक युध्दाच्या जोखमीबद्दल जगामध्ये जागरुकता निर्माण करणे हा यामागील उद्देश आहे

 

भारत, जून 24, 2020 : भारताच्या आघाडीच्या शैक्षणिक संस्थांपैकी एक असणाऱ्या MIT World Peace University या संस्थेने जैविक आणि रासायनिक शस्त्रांचे निर्मूलन या सध्या धगधगत असलेल्या समस्येवर 4 दिवसांची वर्च्युअल परिषद प्रारंभ करण्याची घोषणा केली.

 

MIT World Peace University जागतिक शांततेला चालना देणारे उपक्रम राबवण्यावर ठामपणे विश्वास ठेवत असून या परिषदेमार्फत जागरुकतेचा प्रसार करण्याचा संस्थेने निर्णय घेतला आहे. अशा प्रकारच्या शस्त्रात्रांच्या संशोधन आणि विकासावर निर्बंध आणण्याच्या दृष्टीने कायदेशीर उपाययोजना करण्यामार्फत या जैविक युध्दाच्या जोखमीचा अंत करण्याकरीता यंत्रणा तयार करण्यासाठी सर्व देशांना एकत्र आणणे हा या परिषदेचा उद्देश आहे.

 

कोविड सारख्या जागतिक महामारीने आपल्या प्राणघातक परिणामांनी जगाला हादरवून सोडवले आहे आणि वैद्यकीयरित्या आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असणाऱ्या देशांनासुद्धा हा आजार त्रस्त करत आहे. या विषाणूच्या उगमाबद्दल अनेक आरोपप्रत्यारोप करण्यात आलेले आहेत, काहींच्या मते जैविक युध्दाचे हे एक मोठे कारण आहे. बायोलॉजिक वेपन्स कन्वेन्शन आणि ऑर्गनायजेशन फॉर प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स या दोन महत्वपूर्ण संस्था मोठ्या प्रमाणावर हानी करणाऱ्या अस्त्रांपासून सुटका करुन घेण्यासाठी कार्यरत असल्यातरी दुर्दैवाने त्यांच्याकडे कोणताही निर्णय रद्द करण्याची अधिकृतता नाही.

 

चार दिवसीय परिषदेमध्ये विविध क्षेत्रातील नामवंत या जैविक युध्दाच्या विविध पैलूंची चर्चा करतील आणि आपआपल्या ज्ञानाची देवाणघेवाण करतील, त्याचप्रमाणे कायदेशीर रुपरेषा तयार करण्याच्या दृष्टीने एकत्रितपणे प्रयत्न करतील. या प्रख्यात व्यक्तीमत्वांमध्ये यांचा समावेश होता- युनेस्कोचे चेअर होल्डर प्रा. डॉ. विश्वनाथ डी. कराड -एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक कार्यकारी अध्यक्ष, डब्ल्यूपीसी, एमएइइआर एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, माननीय न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन - भारताचे माजी मुख्य न्यायाधीश, माजी अध्यक्ष, नॅशनल ह्यूमन राइट्स कमिशन ऑफ इंडिया (एनएचआरसी), माननीय डॉ. राजेंद्र सिंह - सुप्रसिद्ध जलसंधारण तज्ञ (भारताचे वॉटरमॅन) आणि तरुण भारत संघाचे अध्यक्ष, माननीय जीव्हीव्ही सरमा, आयएएस, सदस्य सचिव, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सरकार भारत, माननीय, डॉ. वेलुमणी - संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, थायरोकेयर टेक्नोलॉजीज लिमिटेड आणि माजी वैज्ञानिक, भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी), न्यूक्लिअर हेल्थकेअर लि. (एनएचएल) चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक, माननीय श्री. आरिफ मोहम्मद खान - केरळचे माननीय राज्यपाल, माजी कॅबिनेट मंत्री, ऊर्जा आणि नागरी उड्डयण, भारतसरकार,माननीय प्रा. डॉ. अतानू बसु – संचालक श्रेणीचे वैद्यानिक जी, आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, आरोग्य संशोधन विभाग, आरोग्य व एफडब्ल्यू मंत्रालय, भारत सरकार आणि सहायक प्राध्यापक, स्कूल ऑफ लाइफ सायन्सेस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी) मंडी. या परिषदेमध्ये जैविक/रासायनिक हिताच्या अनेक पैलूंवर लक्ष केंद्रित करणाऱ्या विविध सत्रांचा समावेश असेल. 
 

उद्घाटन समारंभामध्ये बोलताना एमएइइआरच्या एमआयटी ग्रुपचे उपाध्यक्ष, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष, बीसीएस, एमआयटीएसओजी, एनटीसी, एनडब्ल्यूपी, सरपंच संसदचे संस्थापक श्री राहुल व्ही कराड म्हणाले,” मानव सुरक्षेचा विकास होण्यासाठी सर्व राष्ट्रांनी शांततापूर्ण पध्दतीने काम करण्याच्या दृष्टीने जागतिक स्तरावर आवाज उठवण्याची आता गरज निर्माण झाली आहे. या परिषदेच्या मार्फत सर्व देशांना एका उद्देशासाठी एकत्रित करुन जैविक/रासायनिक अस्त्रांचे निर्मूलन करणारी यंत्रणा विकसीत करण्याचा तसेच संशोधनावर मर्यादा आणण्यासाठी व जैव-रासायनिक हिताच्या विकासासाठी कायदेशीर व्यवस्था करण्याचा आमचा मानस आहे.”

 

या सोहळ्यामध्ये बोलताना डॉ. एन टी राव, वाइस चान्सलर, एमआयटी-डब्ल्यूपीयू म्हणाले,”या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये अनेक सुजाण व्यक्ती युनायटेड नेशन्सना रासायनिक आणि जैविक शस्त्रांमुळे निर्माण झालेल्या या जोखमीचा समूळ नाश करण्याचे निवेदन करण्यासाठी एकत्रित झाल्या आहेत. एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये जागतिक शांततेवर विश्वास असलेले लोक एकत्रितपणे संवाद साधून निर्णय घेणार आहेत आणि जगाच्या हितासाठी ठराव संमत करणार आहेत.”

 

या प्रसंगी बोलताना श्री प्रविण व्ही पाटील, सीइओ, सेंटर फॉर इंडस्ट्री- ऍकेडेमिया पार्टनरशिपस, एमआयटी-डब्ल्यूपीयू म्हणाले, ”लोकांचा उदंड पाठिंबा आणि प्रतिक्रिया पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला आहे, आत्तापर्यंत जगभरामधून आमच्याकडे 5000हून जास्त नोंदण्या झाल्या आहेत. ही परिषद आयोजित करण्यामुळे आम्ही खरोखरच समाधानी आहोत, कारण यामुळे जैविक हितावर सखोल चर्चा करण्यासाठी जगभरातील वक्त्यांना एकत्र येण्यासाठी हा मंच मिळाला आहे.”

 

या परिषदेमार्फत जगातील तरुणांना “सेफ अँड सेक्युअर मॅनकाइंड” या संदेशासोबत अशाप्रकारच्या निंदनीय जैविक जोखमींची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परिषदेमध्ये भविष्यातील तयारीच्या समस्येचे निवारण करण्याच्या गरजेवर देखील लक्ष केंद्रित केले जाणार आहे ज्यामुळे आपण स्वत:ला अशा जागतिक संकटांपासून सुरक्षित ठेवू शकतो.

 

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App