फेडरल बँकेच्या सीएसआर अंतर्गत बांधलेल्या घरांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण
कोल्हापुर - 21जून 2020 - फेडरल बँकेने कोल्हापुरातील बाटसवाड आणि राजापूरवाडी येथील पूरग्रस्तांच्या हितासाठी पुनर्बांधित घरे आज लाभार्थ्यांना सुपूर्द केली. या गावांसाठी बँकेने आपल्या सीएसआर प्रकल्पांतर्गत 80 घरे पुन्हा बांधली आहेत. कचरा उचलण्यासाठी व्हॅन, वॉटर एटीएम आणि सौर उर्जा यंत्रणेचे औपचारिक हस्तांतरणही आज करण्यात आले. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर (राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग, अन्न व औषध प्रशासन व सांस्कृतिक कार्य) हे दोन्ही गावात बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. श्री अमन मित्तल आयएएस (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर) देखील दोन्ही ठिकाणी उपस्थित होते. श्रीमती. प्रज्ञा जितेंद्र चव्हाण (सरपंच, बस्तवाडग्राम पंचायत) व श्री विजय एकसंबे (सरपंच, राजापूरवाडी ग्रामपंचायत) याचेही या वेळी भाषण झाले.
ऑक्टोबर 2019 मध्ये फेडरल बँकेने कोल्हापुरातील या गावांच्या पुनर्बांधणीसाठी सर्वसमावेशक पॅकेज जाहीर केले होते. या प्रकल्पासाठी बॅंकेने ₹ 3.06 कोटीची तरतूद केली आहे. या खेड्यांमध्ये दोन शाळा इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी बँक निधी देत आहे. या शाळांना नवीन बेंच, टेबल्स, संगणक, प्रोजेक्टर इत्यादींनी सुसज्ज केले जात आहेत. बँकेने ज्या लोकांनी उपजीविकेचे साधन गमावले आहे त्या लोकांसाठी दुभती जनावरांना दिली आहेत आणि कुटीर उद्योगांसाठी यंत्रसामग्री दिली आहे. इतर सार्वजनिक सुविधा जसे जंतूंनाशक फवारणीची सुविधा, सार्वजनिक शौचालय आणि प्रथमोपचार सामग्री सारख्या वस्तु बँकेने प्रदान केले आहे. या खेड्यांमध्ये पॅकेजचा भाग म्हणून बँकेने 500 झाडे देखील लावली आहेत.
श्री. अजित मधुकर देशपांडे (उप-उपाध्यक्ष आणि फेडरल बँक कोल्हापूर क्षेत्रीय प्रमुख) आणि श्री. मेराज खान सिराज खान पठाण (सहाय्यक उपाध्यक्ष, फेडरल बँक) यांनी या कार्यक्रमात बँकेचे प्रतिनिधित्व करून उपस्थितांना संबोधित केले. या बैठकीस श्रीमती परवीन दादेपाशा पटेल (सदस्य जिल्हा परिषद कोल्हापूर), श्री प्रवीण दौलत माने (सदस्य जिल्हा परिषद कोल्हापूर), श्रीमती रुपाली महावीर मगदूम (सदस्य पंचायत समिती, शिरोळ), श्री दीपाली संजय परीट (सदस्य पंचायत समिती, शिरोळ), श्रीमती प्रियदर्शनी मोरे (उप-कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर), श्रीमती. अपर्णा मोरे धुमाळ (तहसीलदार, शिरोळ), श्री संजय राजमाने (मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर) आणि श्री शंकर कविताके (गट विकास अधिकारी, शिरोळ) उपस्थित होते.
Comments
Post a Comment