ओकिनावाद्वारे १००० हून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री


ओकिनावाद्वारे १००० हून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री

~ लॉकडाऊन शिथिलनेनंतर वैयक्तिक वाहन घेण्याकडे असेल लोकांचा कल ~

मुंबई, २२ जून २०२०: ओकिनावा या 'मेक इन इंडिया'वर फोकस असलेल्या आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने आर्थिक व्यवहारांसदर्भात सरकारने शिथिलता आणल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या ब्रँड कार्यसंचालनापासून महिनाभरात १००० हून अधिक स्कूटर्सची विक्री केल्याची घोषणा केली आहे. ब्रँडने भारतभरातील ३५० हून अधिक डिलर्सपैकी ६० ते ७० टक्‍के कार्यरत टचपॉईंट्सच्या माध्यमातून हा विक्री आकडा संपादित केला. कंपनीने कोविड-१९ प्रतिबंधासाठी २५ टक्‍के कर्मचारीवर्ग आणि सुरक्षितताविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करत ११ मे २०२० रोजी अंशत: कार्यसंचालनांना सुरूवात केली. ओकिनावाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतरच्या १ महिन्याच्या कार्यसंचालनामध्ये १२०० हून अधिक वाहने पाठवली आहेत.

ब्रँड त्यांच्या भागधारकांच्या सुरक्षिततेसंदर्भात सर्व आवश्‍यक खबरदारीचे उपाय घेत आला आहे. उत्पादन युनिटमधील असेम्बलीमधून पाठवण्यापूर्वी सर्व उत्पादने सॅनिटाईज केली जातात आणि डिलरशिप्समध्ये डिलर भागीदार उत्पादने मिळाल्यानंतर सॅनिटाईज करतात. ओकिनावा आर्थिक वर्ष २०२० मधील भारतातील हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीमध्ये अव्वल स्थानी आहे आणि भारतामध्ये १०,००० चा टप्पा पार करणारी एकमेव ईव्‍ही कंपनी आहे.

ओकिनावाचे व्यवस्थापकीय संचालक श्री जीतेंदर शर्मा म्हणाले की, “सध्याच्या कोविड-१९ प्रादुर्भावादरम्यान मर्यादित डिलरशिप्स कार्यरत असताना देखील आम्ही १००० हून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री केली आहे. यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे. आम्‍हाला माहित आहे की, बाजारपेठेला पुन्हा प्रबळता मिळत आहे. आम्हाला अपेक्षित आहे की कोविड-१९ प्रादुर्भावामुळे अनेक लोक सार्वजनिक परिवहनाचा वापर टाळतील, ज्यामुळे वैयक्तिक मोबिलिटीसाठी नवीन वाहनांच्या मागणीमध्ये वाढ होईल. इलेक्ट्रिक वाहनांच्या आर्थिक व्यवहार्यतेबाबत वाढत्या जागरूकतेसह ग्राहकांकडून ईव्हींच्या मागणीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे." 

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy