नवनीत एज्‍युकेशन लिमिटेडतर्फे ''मॉम आय नो'' सादर

नवनीत एज्‍युकेशन लिमिटेडतर्फे ''मॉम आय नो'' सादर

वर्षभर चालणारा शैक्षणिक उपक्रम, जो मुलांना घरीच अभ्‍यास करण्‍यामध्‍ये मदत करतो ~

मुंबईजून २०२०: जगभरात कोविड-१९ महामारीने थैमान घातले असताना भारतासह बहुतांश देशांनी तात्‍पुरत्‍या कालावधीसाठी शाळा बंद ठेवण्‍याची घोषणा केली आहे. ज्‍यामुळे जगभरातील मुलांच्‍या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. या अवघड काळामध्‍ये मुलांसाठी अध्‍ययन अनुभव व निष्‍पत्तींमध्‍ये सुधारणा करण्‍याच्‍या मिशनसह नवनीतने घरीच पालकांना मदत करण्‍यासाठी अध्‍ययन उपक्रम 'मॉम आय नो' सादर केला आहे.



नवनीत ज्ञानाचा प्रसार करण्‍यासंदर्भात नेहमीच अग्रस्‍थानी राहिली आहे. शैक्षणिक उत्‍पादनांसाठी एक-थांबा शॉप असल्‍यामुळे ब्रॅण्‍ड आता मुलांच्‍या पुस्‍तकांसाठी कायमस्‍वरूपी गंतव्‍य बनला आहे. नवीनच सादर करण्‍यात आलेला 'मॉम आय नो' उपक्रम ३ वर्षे, ४ वर्षे व ५ वर्षे वयोगटातील मुलांच्‍या गरजांची पूर्तता करतो आणि यामध्‍ये प्रत्‍येक वयोगटासाठी सानुकूल बॉक्‍सेस आहेत. प्रत्‍येक बॉक्‍समध्‍ये साक्षरता कौशल्याची ७ पुस्तकेसंख्याशास्त्र कौशल्याची ३ पुस्तकेसामान्य ज्ञान व पुरस्कार किंवा प्रेरक स्टिकर्सची २ पुस्तके आहेत.

स्‍थानिक लॉकडाऊनमुळे मुलांसाठी शाळा उशिरा सुरू होत असल्‍यामुळे किंवा त्‍यांच्‍या शिक्षणामध्‍ये व्‍यत्‍यय आला असल्‍यामुळे 'मॉम आय नो' उपक्रम शालेय अभ्‍यासासाठी परिपूर्ण आहे, या उपक्रमाच्‍या साहाय्याने घरीच अभ्‍यास करता येतो. मिक किटमध्‍ये शालेय अभ्‍यासक्रमानुसार मुलांसाठी अनुकूल अशा चित्रयुक्‍त कृती, स्‍वावलंबी अध्‍ययनकर्त्‍यांसाठी व्‍यापक व पद्धतशीर अभ्‍यासक्रम आणि कुटुंबांसाठी मुलांना अभ्‍यासाच्‍या सर्व प्रमुख भागांमधील आवश्‍यक पायाभूत कौशल्‍ये निर्माण करण्‍यामध्‍ये मदत करण्‍याकरिता डिझाइन करण्‍यात आलेल्या वापरण्‍यास सुलभ शालेय सुसज्‍ज किट्सचा समावेश आहे. या उपक्रमामध्‍ये मुलासाठी एक वर्षाचा संपूर्ण अभ्‍यासक्रम असेल.

एनसीएफ (नॅशनल करिक्‍युलम फ्रेमवर्क - शासकीय संस्‍था) मार्गदर्शकतत्त्वांवर आधारित:

·         पालक सोप्‍या पाय-यांचे पालन करत या वर्कशीट्स सहजपणे तयार करू शकतात.

·         संपूर्ण एक वर्षासाठी असलेले एक थांबा सोल्‍यूशन पालकांच्‍या विविध पुस्‍तके निवडण्‍याच्‍या आणि मुलांना शिकवण्‍याच्‍या समस्‍येचे निराकरण करते.

·         बालविकास तज्ञांद्वारे विकसित करण्‍यात आले आहे.

·         वयोमानानुसार हळूहळू अध्‍ययन करणारा कन्‍टेन्‍ट.

पालक Flipkart.com, FirstCry.com येथून पुस्‍तक खरेदी करू शकतात, तसेच पुस्‍तक आघाडीच्‍या स्‍टोअर्समध्‍ये देखील उपलब्‍ध आहे:   

Ø  Flipkart.com:https://www.flipkart.com/bks/~cs-ctss52izdu/pr?sid=bks&collection-tab-name=Top+picks+from+Navneet

Ø  Firstcry.com:https://www.firstcry.com/search?q=navneet%20mom%20i%20know&ref2=q_navneet%20mom%20i%20know

नवनीत एज्‍युकेशन लिमिटेडचे संचालक शैलेंद्र गाला म्‍हणाले, ''नवनीत संकटाच्‍या काळात देखील मुलांना शिक्षण मिळण्‍याची खात्री घेते. आपण सध्‍या सामना करत असलेल्‍या स्थितीमध्‍ये लहान मुलांसाठी शाळा व शिकवणींमध्‍ये व्‍यत्‍यय आला आहे आणि कदाचित नियोजनानुसार त्‍यांना शिक्षण मिळणार नाही. ''मॉम आय नो'' उपक्रम पालकांना मुलांना संपूर्ण वर्षभर अध्‍ययन करण्‍यामध्‍ये आणि शालेय शिक्षण देण्‍यामध्‍ये मदत करेल. आमची उत्‍पादने इंटरअॅक्टिव्‍ह, मजेशीर व ज्ञानयुक्‍त आहेत. ही उत्‍पादने मुलांच्‍या रूची लक्षात घेऊन डिझाइन करण्‍यात आली आहे. मी या उत्‍पादनांना यशस्‍वी होताना पाहण्‍यास उत्‍सुक आहे.''

चिल्‍ड्रेन्‍स बुक्‍सच्‍या प्रकाशन प्रमुख प्रिती गोसालिया म्‍हणाल्‍या, ''नवनीतच्‍या चिल्‍ड्रेन बुक विभागाने नेहमीच मुलांना माहितीपूर्ण व मजेशीर अध्‍ययन मिळण्‍याची खात्री घेतली आहे. सद्यस्थिती पाहता 'मॉम आय नो' उपक्रम शालेय शिक्षणाला आणि घरीच अभ्‍यास करण्‍याला साह्य करतो. हा उपक्रम गणित, साक्षरता, उच्‍चार, वाचन व पर्यावरणीय विज्ञान ही ५ मूलभूत कौशल्‍ये विकसित करण्‍यामध्‍ये मदत करेल. तसेच हा उपक्रम मुलाला संपूर्ण वर्षभर अध्‍ययन करण्‍यामध्‍ये मदत करेल. मी 'मॉम आय नो'चे यश पाहण्‍यासाठी उत्‍सुक आहे. आमचा अशा प्रकारचे अनेक उपक्रम सादर करण्‍याचा मनसुबा आहे.''

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202