‘मर्सिडीझ-बेंझ इंडिया’ने सादर केली सर्वात मोठी व सर्वात आलिशान एसयूव्ही – ‘नवीन जीएलएस’ – ‘एसयूव्हीं’मधील ‘एस क्लास’ वाहन

मर्सिडीझ-बेंझ इंडियाने सादर केली सर्वात मोठी व सर्वात आलिशान एसयूव्ही – नवीन जीएलएस एसयूव्हींमधील एस क्लास वाहन
-       मर्सिडीज मी कनेक्ट अॅप आता नवीन वैशिष्ट्यांसह उपलब्ध. भारतात प्रथमच मर्सिडीजच्या ग्राहकांसाठीदेखील मर्सिडीज मी कनेक्टेड कार्स होणार ओव्हर द एअर द्वारा अद्ययावत.
-       भारतातील प्रमुख शहरांमध्ये मुख्य युनिट्समध्ये कोविड-19ची चाचणी केंद्रे दर्शविणार एमबीयूएक्स :  एमबीआरडीआयद्वारे आणखी एक स्थानिक उपक्रम

भारतासाठी जीएलएसचे महत्त्वः जीएलएसने भारतात एक दशक पूर्ण केले आहे. या श्रेणीतील 6700 पेक्षा अधिक वाहने भारतीय रस्त्यांवर सध्या धावत आहेत. साहजिकच या विभागातील ही सर्वात लोकप्रिय फुल-साइज लक्झरी एसयूव्ही आहे. नवीन जीएलएस ही भारतीय बाजारपेठेत मर्सिडीज-बेंझकडून सादर होणारी सर्वात आलिशान एसयूव्ही आहे आणि मर्सिडीज-बेंझच्या एसयूव्ही पोर्टफोलिओमध्ये ती यापुढेही महत्त्वाचा आधारस्तंभ राहील.मार्टिन श्वेंक
ü  2010 : जीएल-क्लासची भारतात सुरुवात, सीबीयू जीएल-क्लास सादर.
ü  2013 : जीएल-क्लासचे भारतात स्थानिक पातळीवर उत्पादन सुरू.
ü  भारतातील रस्त्यांवर आजपर्यंत धावत आहेत 6700 हून अधिक जीएलएस | ही जीएलएसची तिसरी पिढी.
ü  पूर्वीच्या मॉडेलपेक्षा नवीन जीएलएसमध्ये मोठा व्हीलबेस (लांबी +77 मिमी | रुंदी +22 मिमी | व्हीलबेस +60 मिमी | दुसर्‍या रांगेतील सीट्ससाठी +87 मिमी लेगरूम).
ü  फिट आणि हेल्दी घटक : 5 झोन थर्मोट्रॉनिक एसी, मागील एमबीयूएक्सच्या कार्यान्वयासाठी टॅब्लेट, शोफर पॅकेज, अ‍ॅक्टिव्ह सीट कायनेटिक्स :  पुढील सीटवरील प्रवाशांना एनर्जायझिंग पल्सेस पुरवते, दूरवरच्या प्रवासादरम्यान थकवा कमी करते, 64 कलर अॅंम्बियंट लाइटिंग, बर्मेस्टर सराउंड साउंड सिस्टीम - सुखदायक ध्वनी अनुभवण्यासाठी 13 स्पीकर्स.
ü  इंजिनांचे पर्याय : डिझेल 400 डी 4मॅटिक आणि सहा सिलेंडर इन-लाइन इंजिनसह पेट्रोल 450 4मॅटिक | 450 4मॅटिक पेट्रोल इंजिनमध्ये 48-व्होल्टच्या विद्युतीकरणासाठी इक्यू बूस्टचा समावेश.
ü  एमबीयूएक्ससह नवीन जीएलएस : टच कंट्रोल, कॉन्टॅक्टलेस कंट्रोल आणि ऑप्टिमाइझ्ड एआय आधारित व्हॉइस कंट्रोल सिस्टीम यांसारखे इन्ट्युटिव्ह व बहुउपयोगी ऑपरेटिंग पर्याय.
ü  नवीन जीएलएस 450 4मॅटिकसाठी स्टार इझ सर्व्हिस पॅकेज82,100 रुपयांमध्ये उपलब्ध; तसेच जीएलएस 450 4मॅटिकसाठी 2 वर्षे किंवा अमर्यादित किलोमीटर्सकरीता 98,800 रुपयांमध्ये उपलब्ध.
ü  नवीन मर्सिडीज-बेंझ जीएलएस 400 डी 4मॅटिक आणि जीएलएस 450 4मॅटिक या दोन्ही कार्सची प्रत्येकी किंमत 99.90 लाख रु. (केरळ वगळता सर्व भारतात सर्व किंमती एक्स-शोरूम).
ü  मर्सिडीज मी अॅपमध्ये नवीन वैशिष्ट्ये: जिओफेन्सिंग, वाहन शोधक, खिडक्या आणि सनरूफचे नियंत्रण रिमोटद्वारे.

पुणे : मर्सिडीज-बेंझ या भारतातील सर्वात मोठ्या आलिशान कार उत्पादक कंपनीने आज नवीन जीएलएस ही सर्वात मोठी व सर्वाधिक आलिशान एसयूव्ही सादर केली. या श्रेणीला एसयूव्हीमधील एस-क्लास म्हणून ओळखले जाते. नवीन मर्सिडीज-बेंझ जीएलएसही मर्सिडीज बेंझची सर्वात मोठी आणि सर्वात आलिशान एसयूव्ही आहे. ग्राहकांना या गाडीमध्ये अधिक जागा, अधिक आराम, अधिक तंत्रज्ञान आणि अधिक आलिशानपणा मिळू शकणार आहे. भारतीय रस्त्यांवर धावणाऱ्या इतर कोणत्याही एसयूव्हीमध्ये नसतील अशी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त वैशिष्ट्ये नवीन जीएलएसमध्ये आहेत. हे खरोखरीच ऑफ-रोडर वैशिष्ट्ये असलेले आलिशान स्वरुपाचे वाहन आहे. नवीन जीएलएसमधील अंतर्गत रचना व सजावट ही मर्सिडीज-बेंझ लक्झरी सलूनसारखी आहे, तसेच  एसयूव्हीसारखा दणकटपणा व आरामही यामध्ये जाणवतो. नवीन जीएलएसमध्ये तिच्या पूर्वीच्या श्रेणीपेक्षा मोठा व्हीलबेस (3135 मिमी, 60 मिमीने जास्त) दिलेला असून आतील जागाही जास्त (87 मिमी) आहे. विशेषत: दुसर्‍या रांगेतील सीट्ससाठी ही जादाची जागा उपलब्ध आहे आणि सीट मागेपुढे करून ती जुळवूनही घेता येते.
मर्सिडीझ-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेंक यांनी पुण्यातील चाकण येथील कंपनीच्या सेंटर ऑफ एक्सलंसमध्ये जीएलएसचे औपचारिक उद्घाटन डिजिटल पद्धतीने केले. ते याप्रसंगी म्हणाले, आलिशानपणा, आराम आणि तंत्रज्ञान यांचा संयोग असलेली मर्सिडीज-बेंझ जीएलएस आज बाजारात उपलब्ध असलेली सर्वात चांगली आलिशान एसयूव्ही आहे. पूर्ण आकाराच्या, सात-सीटर असलेल्या या नवीन जीएलएस एसयूव्हीमध्ये सर्वच प्रवाशांना सपैस  जागा मिळते; विशेषतः दुसर्‍या रांगेत बसणाऱ्यांसाठी अधिक जागा आणि अतिरिक्त लेगरूम आहे. जीएलएसमध्ये अत्याधुनिक स्वरुपाची एमबीयूएक्स इंफोटेनमेंट सिस्टीम आहे, त्याशिवाय मर्सिडीज मी कनेक्ट सर्व्हिसद्वारे ती पूर्णपणे कनेक्टेड आहे. त्यामुळे ती टेक्-सॅव्ही एसयूव्ही बनली आहे. जीएलएसचा अंतर्गत भाग आधुनिक, विलासी सौंदर्यशास्त्र आणि एसययूव्हीचा हॉलमार्क यांचा अनोखा संगम आहे. आमच्या मते, नवीन जीएलएस ही ऑफ-रोडरच्या वैशिष्ट्यांसह आधुनिक लक्झरीचे एक आदर्श मिश्रण आहे."
मर्सिडीज मी कनेक्ट अॅपला एक नवीन यूजर इंटरफेस आणि एक अतिरिक्त नवीन सर्व्हिस अ‍ॅप देखील जोडण्यात आलेले आहे. यातून प्रवाशांना अखंड ऑनलाइन अनुभव मिळत राहतील. येत्या 1 जुलै 2020 पासून मर्सिडीज मी कनेक्ट घेतलेल्या सर्वांना यूझर इंटरफेससह नवीन मर्सिडीज मी अॅप पुरविले जाणार आहे. या नवीन अ‍ॅपमध्ये नवी वैशिष्ट्ये देऊ करणारा प्लॅटफॉर्म असेल. ही वैशिष्ट्ये ओव्हर द एअर अपडेट होऊ शकतील. आम्ही लवकरच जिओ-फेंसिंग, वाहन शोधक आणि रिमोटद्वारा खिडक्या व सनरूफ चालू वा बंद करण्याची सुविधा सादर करणार आहोत,’’ अशी माहिती श्वेंक यांनी दिली.
एमबीआरडीआयमधील आमच्या सहकाऱ्यांनी स्थानिक पातळीवरील माहितीशी सांगड घालून एक प्रणाली विकसीत केली आहे. यामुळे एमबीयूएक्स एनटीजी-6 हेड युनिट्सच्या माध्यमातून नेव्हीगेशन पेनवर कोविडच्या चाचण्यांची केंद्रे दिसू शकणार आहेत. या नावीन्यपूर्ण संशोधनामुळे, मर्सिडीज-बेंझ कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन ग्राहकांना किती वेगाने सेवा देऊ शकते व कशी मदत करू शकते,  हे अधोरेखित होते. यासाठीचा डेटा दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद आणि पुण्यासह सर्व प्रमुख शहरांसाठी उपलब्ध असेल. ही सुविधा मॅप माय इंडियाच्या सहकार्याने आणण्यात आली आहे.
पॉवरट्रेनः पेट्रोल इंजिनमध्ये आहे एकात्मिक स्टार्टर-जनरेटर आणि इक्यू बूस्ट
आलिशान वाहने चालविणे सुखदायक ठरावे आणि त्यास सहजपणे शक्ती मिळावी, यासाठी सामर्थ्यवान असे सहा सिलेंडरचे इंजिन देण्यात येत असते. यांसारख्या वाहनांचे ते प्रमुख वैशिष्ट्यच ठरते. तथापि, ‘मर्सिडीज-बेंझ जीएलएस 450 4मॅटिकमध्ये सहा-सिलेंडर इन-लाइन इंजिनसह 48-व्होल्ट तंत्रज्ञान आणि इंटिग्रेटेड स्टार्टर-जनरेटर (आयएसजी) यांचाही समावेश आहे. त्याचा कार्यप्रदर्शन डेटा पुढीलप्रमाणे – 270 केडब्ल्यू (367 एचपी) आणि 500 एनएम टॉर्क, तसेच पुढील 250 एनएमटॉर्क व 16 केडब्ल्यू / 22 एचपी उपलब्ध. इंटिग्रेटेड स्टार्टर-जनरेटर (आयएसजी) हा इक्यू बूस्ट किंवा ऊर्जेची भरपाई करतो, त्याचबरोबर इंधनाचीही बचत करतो. हे उपकरण यापूर्वी उच्च व्होल्टेज असलेल्या हायब्रिड तंत्रज्ञानासाठी वापरले जात असे.
एअरोडायनॅमिक्स: या वर्गातील सर्वोत्कृष्ट सीडी आकड्यांसाठी तपशीलवार फाइन-ट्यूनिंग
नवीन जीएलएस गाडी 0.32 पर्यंतची सीडी आकडेवारी साध्य करते. मोठ्या आलिशान एसयूव्ही श्रेणींमध्ये इतकी कमी सीडी आकडेवारी क्वचितच मिळते. यापूर्वीच्या श्रेणीमध्ये हा आकडा सीडी 0.35 इतका असे. उत्कृष्ट एअरोडायनॅमिक्समुळे गाडीमध्ये इंधनाचा वापर कमी होतो आणि दुसरे म्हणजे, गाडीला वाऱ्याचा अडथळा कमी होतो. या वैशिष्ट्यासाठी कंपनीच्या संशोधकांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202