ग्लोबल फ्युजन प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या क्रायोस्टॅट उत्पादनात एल अँड टीने पूर्ण केला महत्त्वाचा टप्पा

 ग्लोबल फ्युजन प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या क्रायोस्टॅट उत्पादनात एल अँड टीने पूर्ण केला महत्त्वाचा टप्पा

सन्माननीय पाहुण्यांनी क्रायोस्टॅची अंतिम जुळणी आयटीईआर, फ्रान्सला पाठवण्यासाठी दाखवला झेंडा

 हजिरा (सूरत, गुजरात), 30 जून 2020 – भारतातील आघाडीची अभियांत्रिकी, बांधकाम, तंत्रज्ञान, उत्पादन आणि आर्थिक सेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या लार्सन अँड टुब्रोच्या अवजड अभियांत्रिकी विभागाने क्रायोस्टॅट या जगातील सर्वात मोठ्या स्टेनलेस- स्टील, उच्च- व्हॅक्यूम प्रेशर चेंबरच्या सर्वात जटील आणि अंतिम जुळणीला झेंडा दाखवला आहे. हा जागतिक न्युक्लियर फ्युजन क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचा टप्पा असून मेक इन इंडिया उपक्रमासाठी अभिमानास्पद क्षण आहे.


 अंतिम जुळणी कामाला झेंडा दाखवण्याच्या प्रसंगी डॉ. बर्नाड बिगो, संचालक- जनरल, आयटीईआर ग्लोबल, श्री. के. एन. व्यास, अध्यक्ष अटॉमिक एनर्जी कमिशन, भारत, श्री. यु. के. बरुआ, प्रकल्प संचालक, आयटीईआर- भारत, श्री. व्ही. के. सारस्वत, निती आयोग, श्री. ए. एम नाईक समूह अध्यक्ष, एल अँड टी, श्री. एस. एन. सुब्र्हमण्यम, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, एल अँड टी, श्री. आदिल झैनुलभाई, स्वतंत्र संचालक, एल अँड टी, श्री. एस. एन. रॉय, पूर्णवेळ संचालक, एल अँड टी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक, एल अँड टी पॉवर, श्री. एम. व्ही. सतीश, पूर्ण वेळ संचालक आणि वरिष्ठ ईव्हीपी (इमारती, खनिज व धातू विभाग), एल अँड टी, श्री. जे. डी. पाटील, पूर्णवेळ संचालक आणि वरिष्ठ ईव्हीपी (संरक्षण आणि स्मार्ट तंत्रज्ञान) आणि श्री. ए. व्ही. परब, ईव्हीपी आणि प्रमुख, एल अँड टी अवजड अभियांत्रिकी इत्यादी मान्यवर एल अँड टीच्या हजिरा मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्समध्ये व्हर्च्युअली उपस्थित होते.

 याप्रसंगी आयटीईआर कंपनीने संचालक जनरल डॉ. बर्नाड बिगो म्हणाले, आज हजिरामध्ये आम्ही क्रायोस्टॅटच्या सर्व विभागांचे विशेषतः सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत नुकतेच पूर्ण करण्यात आलेल्या क्रायोस्टॅट लिड विभागाचे फॅब्रिकेशन पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहोत. क्रायोस्टॅटमधी आव्हाने नेहमीपेक्षा खूप वेगळी असल्याने लार्सन अँड टुब्रोसारखा भागीदार आणि क्रायोस्टॅट फॅब्रिकेशनचा प्रमुख कंत्राटदार मिळाल्याबद्दल आयटीईआर प्रोजेक्ट आणि आयटीईआर- इंडिया स्वतःला सुदैवी समजते.

 या कामगिरीविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक. एस. एन. सुब्र्हमण्यम म्हणाले, कंपनीसाठी हा अभिमानाचा क्षण आहे, कारण आम्ही जगातील सर्वात मोठ्या स्टेनलेस- स्टील, उच्च- व्हॅक्यूम प्रेशर चेंबरच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. आयटीईआरला उच्च दर्जाच्या, उच्च दर्जाची अचूकता असलेल्या जुळणीचा अखंडित पुरवठा करण्यासाठी कंपनीने नाविन्यपूर्ण आणि डिजिटल उत्पादन तंत्रांचा वापर केला आहे. यामुळे फ्रान्समधील प्रकल्पाच्या ठिकाणी क्रायोस्टॅट इन्स्टॉल करण्यासाठी मार्ग मिळेल आणि कालांतराने फ्युजन- उर्जेची व्यापक व्यवहार्यता दिसून येईल. यामुळे भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विशिष्ट कौशल्यपूर्ण क्षेत्रातील ज्ञान मिळवत आत्मनिर्भर झाला आहे.

 टॉप लिड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रायोस्टॅट जुळणीचे वजन 650 एमटी (मेट्रिक टन्स) असून ती आयटीईआरसाठी (इंटरनॅशनल थर्मोन्युक्लियर एक्सपिरीमेंटल रिअक्टिर) इतर क्रायोस्टॅट विभागांबरोबर दक्षिण फ्रान्समधील रिअक्टर पिटमध्ये इनस्टॉल केली जाईल. एल अँड टी ने यापूर्वी क्रायोस्टॅटसाठी बेस सेक्शन, लोअर आणि अप्पर सिलिंडरचे वितरण केले आहे. क्रायोस्टॅट फ्युजन रिअक्टरला थंडावा देते आणि त्यांच्या गाभ्यातील उच्च तापमान नियंत्रणाखाली ठेवते.

 एल अँड टीच्या अवजड अभियांत्रिकी विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि प्रमुख श्री. अनिल परब म्हणाले, टॉप लिड सेक्टरच्या पुरवठ्यासह आम्ही या प्रकल्पातील भारताकडे असलेली जबाबदारी वेळेआधीच पूर्ण केली आहे. या घटकांसाठी वापरण्यात आलेले फॅब्रिकेशन आकार आणि दर्जाच्या कडक मापदंडाच्या बाबतीत अद्भुत आहे. जागतिक पातळीवर उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताची क्षमता दर्शवण्याचा हा क्षण एल अँड टी अवजड अभियांत्रिकी विभागासाठी अभिमानास्पद आहे.

 एल अँड टीच्या अवजड अभियांत्रिकी विभागाकडे देण्यात आलेले या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत विभागले गेले होते. पहिल्यांदा कंपनीला आपल्या अत्याधुनिक हजिरा मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्समध्ये जुळणीचे उत्पादन करायचे होते. दुसऱ्या भागात कॅडराश, फ्रान्स येथील प्रकल्पाच्या ठिकाणी विविध सेक्टर्सच्या जुळणीसाठी तात्पुरते वर्कशॉप उभारायचे होते. अखेर क्रायोस्टॅटचे टोकामॅक रिअक्टर इमारतीत एकत्रीकरणाचे काम पूर्ण करायचे होते. या शुभारंभासह एल अँड टीच्या अवजड अभियांत्रिकी विभागाने भारतात नियोजित केलेले उत्पादनाचे काम पूर्ण केले आहे.

 एल अँड टीच्या अवजड अभियांत्रिकी विभागाला हे प्रतिष्ठित काम आयटीईआर, इंडियाकडून मिळाले आहे. आयटीईआर इंडिया ही आण्विक उर्जा विभागाची शाखा असून ती भारतासह सात महत्त्वाच्या देशांच्या सहभागासह आखण्यात आलेल्या भव्य, वैज्ञानिक प्रकल्पासाठी कार्यरत आहे. प्रकल्पाचा खर्च अंदाजे 20 अब्ज डॉलर्स आहे.

 हजिरा (सुरत), पवई (मुंबई) आणि वडोदरा येथे एल अँड टी च्या अवजड अभियांत्रिकी विभागाच्या अत्याधुनिक, पूर्णपणे सर्वसमावेशक, जागतिक दर्जाच्या उत्पादन सुविधा कार्यरत आहेत. एल अँड टी च्या अवजड अभियांत्रिकी विभागाला शुद्धीकरण कारखाने, तेल आणि वायू क्षेत्र, पेट्रोकेमिकल, खते, आण्विक उर्जा इत्यादी क्षेत्रांतील ग्राहकांना तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे व यंत्रणा पुरवण्याचा अनुभव आहे.हजिरा मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आलेल्या झेंडा दाखवण्याच्या व्हर्च्युअल प्रसंगी निती आयोग, आयटीईआर, भारत, आयटीईआर ग्लोबल, डीएई, राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन, एनपीसीआयएल, एईआरबी आणि बार्क डिजिटल प्लॅटफॉमवरून सहभागी झाले होते.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24