एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीच्या आंतरराष्ट्रीय व्हर्च्युअल परिषदेमध्ये जैविक/रासायनिक शस्त्ररावर निर्बंध घालण्याची अपील


एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीच्या आंतरराष्ट्रीय व्हर्च्युअल परिषदेमध्ये

 जैविक/रासायनिक शस्त्ररावर निर्बंध घालण्याची अपील

  • समस्येचे निराकरण करण्यासाठी युनायटेड नेशन्स आणि पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये कायदेशीर रुपरेषा प्रस्तुत करण्याचा प्रस्ताव
  • जागतिक  महत्वाच्या संस्थांचे दृढीकरण्यावर भर देण्यात आला
  • सामाजिक हितासाठी आणि सुरक्षित व दीर्घकालीन भविष्याची शाश्वती देण्यासाठी धोरण निर्माण करण्याच्या दृष्टीने व्रिचारवंतांच्या दृष्टिकोनांचे आणि शिफारशींचे दस्तऐवजीकरण करण्यात आले

भारत, जून 29, 2020 - जैविक युध्द आणि जैविक दहशतवाद हा सध्या जगभरासाठी, खासकरुन संपूर्ण जग कोविड-19 महामारीचा सामना करत असताना अतिशय महत्वपूर्ण समस्या म्हणून नावरुपास येत आहे. या विषाणूच्या उगमाबद्दल अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आलेले आहेत, काहींच्या मते जैविक युध्दाचे हे एक मोठे कारण आहे. आपला देश आणि चीन दरम्यान असलेला सीमेसंबंधित तणाव आणि इतर शेजारी राष्ट्रांसोबतच्या अस्थिर संबंधांमुळे दहशतवादाची जोखीम वाढली आहे, यामुळे जैविक/रासायनिक आयुधांच्या जोखमीचे मूल्यांकन करण्याची आता गरज निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या विध्वसांपासून सुटका करुन घेण्यासाठी जवाबदारी पेलणाऱ्या बीडब्ल्यूसी आणि बीडब्ल्यूसीओ (बायोलॉजिकल वेपन्स कन्वेन्शन ऍंड ऑर्गनायजेशन) संस्थांकडे दुर्दैवाने कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्याची अधिकृतता नाही.

या समस्येवर विचार करण्यासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटी या भारतातील आघाडीच्या शैक्षणिक संस्थेने “जैविक आणि रासायनिक शस्त्रांचे निर्मूलन” या विषयावर चार दिवसीय वर्च्युअल आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेमार्फत तरुणाईमध्ये जैविक युध्दाबद्दल जागरुकता आणि सजगता प्रसारीत करणे हा विद्यापीठाचा उद्देश होता. या परिषदेने अशा प्रकारच्या अस्त्रांच्या संशोधन आणि विकासावर निर्बंध घालण्यासाठी कायदेशीर यंत्रणांची स्थापना करण्याच्या आपल्या मूख्य उद्देशावर देखील लक्ष केंद्रित केले.

वर्तमान परिस्थितीवर आपले मत व्यक्त करताना प्रा. डॉ. विश्वनाथ डी. कराड - संस्थापक अध्यक्ष, एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटी म्हणाले,” कोविड-19 महामारीने आपल्या सर्वसामान्य जीवनाला नेस्तनाभूत केले आहे. अनेकांचा असाही आरोप आहे की या विषाणूचा उगम जगावर वर्चस्व स्थापन करण्यासाठी जाणूनबूजून केलेला प्रपंच होता.  दुर्दैवाने एका राष्ट्राच्या हव्यासापोटी आपल्या सर्वांना याचा भयानक त्रास भोगावा लागतो आहे. एकमेकांविरुध्द लढण्याच्या ऐवजी आपण सर्वांनी शांतता व समन्वय प्रस्थापित करण्यावर काम करण्याची शपथ घेणे गरजेचे आहे”.

आपल्या भावना व्यक्त करताना श्री राहुल व्ही. कराड, उपाध्यक्ष- एमएइइआर एमआयटी ग्रुप, कार्यकारी अध्यक्ष-एमआयटी डब्ल्यूपीयू, संस्थापक-बीसीएस, एमआयटीएसओजी, एनडब्ल्यूपी, सरपंच संसद म्हणाले, ”आपल्या सर्वांना याची कल्पना आहेच, की कोविड-19ने आपल्या सर्वांचे आयुष्य ठप्प केले आहे, जगाच्या कार्यपध्दतीचा आपण पुन्हा विचार करण्याची आता वेळ आली आहे. जागतिक शांततेच्या संकल्पनेला समर्पित असलेली एक शैक्षणिक संस्था म्हणून, जैवरासायनिक शस्त्रांच्या निर्मूलनावर कार्य करण्यावर आमचा ठाम विश्वास आहे. विविध देशांमधल्या लोकांना एकत्र आणून जैवयुध्दाचे उच्चाटन करण्यासाठी मदत करणाऱ्या यंत्रणेचा विकास करण्यामार्फत जागरुकता आणि सतर्कता निर्माण करणे हा या आंतरराष्ट्रीय परिषदेचा उद्देश होता.”

या परिषदेमध्ये बोलताना डॉएन टी राववाइस चान्सलर, एमआयटी-डब्ल्यूपीयू म्हणाले,या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये अनेक सुजाण व्यक्ती युनायटेड नेशन्सना रासायनिक आणि जैविक शस्त्रांमुळे निर्माण झालेल्या या जोखमीचा समूळ नाश करण्याचे निवेदन करण्यासाठी एकत्रित झाल्या आहेतएमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये जागतिक शांततेवर विश्वास असलेले लोक एकत्रितपणे संवाद साधून निर्णय घेऊन आणि जगाच्या हितासाठी ठराव संमत केला.

 

या परिषदेच्या मार्गाने आम्ही देशातील तरुणांपर्यंत पोहचू शकलो आणि याहून अधिक महत्वाचे म्हणजे जैव-रासायनिक शस्त्रांमुळे असलेल्या जोखमीबद्दल त्यांना संवेदनशील करु शकलो, याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. जगभरातील अगणित वक्त्यांच्या समर्थनामुळे आणि सहभागामुळे, आम्ही युनायटेड नेशन्स आणि पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये यशस्वीपणे याचिका प्रस्तुत केली आहे आणि आम्ही याचा तर्कसंगत निर्णय घेण्यासाठी वचनबध्द असू.”, असे समापन करतेवेळी श्री प्रविण व्ही पाटील, सीइओ, सेंटर फॉर इंडस्ट्री-अकेडेमिया पार्टनरशिप्स, एमआयटी-डब्ल्यूपीयू म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App