डबेवाले आणि टीव्ही सहाय्यक कर्मचा-यांच्या सहाय्यासाठी मुंबईमध्ये सुरू

#UMEEDHAINHUM, उम्मीद हैं हमइंडिया गेट बासमती राईसचा उपक्रम 

शेफ विकास खन्नांच्या #FeedIndia फीड इंडिया मोहिमेच्या अंतर्गत डबेवाले आणि 

टीव्ही सहाय्यक कर्मचा-यांच्या सहाय्यासाठी मुंबईमध्ये सुरू

 

समुदायांच्या मदतीसाठी मुंबईतील डबेवाले  टीव्हीतील सहाय्यक कलाकारांसाठी अन्नदानाचा उपक्रम

 

1890 पासून पांढरे कपडे  पारंपारिक गांधी टोपीमध्ये येणारी मुंबईतील डबेवाल्यांची सेना घरी बनवलेल्या जेवणाद्वारे सुमारे दोन लाख मुंबईकरांची भूक भागवत आहे  दररोज हे डबे घरून कार्यालयामध्ये पोहचवले जातातकोव्हिड- 19 लॉक डाउनमुळे कॉरपोरेट क्षेत्रामधील कामांवर नाट्यमय मर्यादा आली आहे  त्यमुळे हे डबेवाले  त्यांचे कुटुंबीय ह्यांच्या आयुष्यावर परिणाम झाला आहे  त्यांचा एकमेव उत्पन्न स्रोत हिरावून घेतला गेला आहेलॉक डाउनमध्ये सवलत दिल्यानंतरही डबेवाल्यांच्या डब्यांची सेवा अद्याप सुरू झालेली नाहीकारण प्रत्येक जण सावधानता बाळगत आहे  सोशल डिस्टन्सिंगच्या उपायांचे पालन करत आहे.


 

लॉक डाउन सुरू झाल्यापासून शंभर वर्षे जुनी आणि भारतातील सर्वोत्तम तांदुळाचा ब्रँड असलेली इंडिया गेट बासमती राईस कंपनी भारतभरातील लक्षावधी लोकांच्या भुकेच्या समस्येला हाताळत आहेइंडिया गेट बासमती‌ राईस हा केआरबीएलचा मुख्य ब्रँड आहे  ही जगातली सर्वांत मोठी राईस मिलर कंपनी आहे  अलीकडेच कंपनीने #UmeedHainHum उम्मीद हैं हम हा उपक्रम सुरू केला आहे  देशभरातील सर्व गरजू आणि वंचितांना प्राथमिक जेवण पोहचवण्याचे मोठे परंतु महत्त्वपूर्ण कार्य करणेहे त्याचे उद्दिष्ट आहेआत्तापर्यंत हा ब्रँड 140 पेक्षा जास्त शहरांमध्ये पोहचला आहे  गेल्य तीन महिन्यांमध्ये 1.5 कोटींपेक्षा जास्त लोकांना अन्न देण्यात आले आहे  हा देशातील अन्नदानाच्या सर्वांत मोठ्या आणि सर्वाधिक परिणामकारक उपक्रमांपैकी एक आहे.

 

अधिक गरजू लोकांपर्यंत पोहचण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणूनकेआरबीएल लि.- इंडिया गेट ह्यांनी मुंबईतील डबेवाले आणि दररोजच्या भत्त्यांवर निर्वाह करणारे मुंबईतील टीव्ही सहाय्यक कर्मचारी ह्यांना अन्न  आवश्यक पदार्थ वितरणासाठी एक उपक्रम आयोजित केला आहेअमेरिकन राजदूत आणि मुंबई डबेवाले संघटनेचे अध्यक्ष श्रीउल्हास शांताराम मुके ह्यांच्या उपस्थितीमध्ये हयात रिजन्सी येथे हा कार्यक्रम संपन्न झालाह्या उपक्रमामध्ये #UmeedHainHum उम्मीद हैं हम अभियानाद्वारे 5000 पेक्षा जास्त कुटुंबियांची काळजी घेतली जाणार आहे

 

ह्या अभियानाविषयी बोलतानाइंडिया गेट बासमती राईसचे बिजनेस हेड श्रीआयुष गुप्ता ह्यांनी म्हंटले की, “प्रत्येकासाठी हा कठीण काळ आहे आणि भारतातील सर्वांत जुना आणि सर्वांत मोठा ब्रँड म्हणून एक शतकापेक्षा अधिक काळापासून आमच्या उत्पादनांवर विश्वास ठेवलेल्या समजाप्रती परतफेड करणे आणि विशेषतगरजू लोकांना मदत करणेही आमची जवाबदारी आहेमुंबईचे डबेवाले आणि मुंबईतील टीव्ही सहाय्यक कर्मचा-यांना मदत करणे आणि त्यांची काळजी घेण्यासाठी हा उपक्रम आम्ही विचारपूर्वक आखलेला आहेहा उपक्रम करत असल्याचा आम्हांला अभिमान वाटतो आणि आम्हांला खात्री आहे कीआमच्या कृतींद्वारे आम्ही सुखदु: वाटून घेण्याच्या जुन्या भारतीय मूल्यांचा खोलवर अंगीकार करत आहोतभारताच्या ह्या प्राचीन भावनेला अनुसरूनच आम्ही पुढील काळामध्ये देशाच्या सेवेला तत्पर राहू.”

 

मिचेलिनमधील कलाकार आणि #FeedIndia फीड इंडियाचे सूत्रधार शेफ विकास खन्ना ह्यांनी म्हंटले की, “#FeedIndia फीड इंडिया हा उपक्रम माझ्या हृदयाच्या अतिशय जवळ आहे आणि इंडिया गेटसारखे पार्टनर एकत्र येत असताना त्यांच्या सहकार्यातून ही वाटचाल अधिक सक्षम होत आहेघरोघरी पोहचलेल्या खाद्य ब्रँडने ही जवाबदारी घेणे आणि अतिशय नि:स्वार्थीपणे पूर्ण अभियानामध्ये योगदान देणे हे अतिशय कौतुकास्पद आहे.”

 

हा प्रकल्प मुख्यतजगातल्या सर्वांत मोठ्या अन्न वाटप करणारा समुदाय असलेल्या "मुंबईच्या डबेवाल्यांच्या"‌ सेवेसाठी मदत पोहचवत आहेहे लोक एका शतकापेक्षा जास्त काळापासून मुंबईचे पोट भरत आहेतपरंतु आता त्यांना स्वत:लाच चांगले जेवण मिळणे कठीण झाले आहेमदत देण्यात येणारा दूसरा गट हा मुंबईतील टीव्ही सहाय्यक कर्मचारी हा आहेभारताच्या मनोरंजनासाठी हे लोक अथक प्रकारे परिश्रम करत असतातपरंतु आता मनोरंजन उद्योगातील शूटिंग बंद झाल्यामुळे आलेल्या स्थगितीमध्ये ते असहाय झाले आहेतम्हणून चेफ विकास खन्ना ह्यांच्यासह केआरबीएलइंडिया गेट ह्यांनी एकत्र येऊन इतरांकडून मदत  करण्यात आलेल्या ह्या समुदायांना अत्यावश्यक सेवांच्या व्यवस्थेसाठी #UmeedHainHum उम्मीद हैं हम ही मोहीम सुरू केली आहे.

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App