लिव्हींगार्ड टेक्नोलॉजी’जच्या वतीने कोविड-मुक्त जगाकरिता मास्कचे अनावरण

                                                                                                   
लिव्हींगार्ड टेक्नोलॉजी’जच्या वतीने कोविड-मुक्त जगाकरिता मास्कचे अनावरण

~ कोविड-19 विषाणूंना 99.9% असक्रीय करणारे क्रांतिकारक लिव्हींगार्ड फेस मास्क सादर~

मुंबई, 17 जून 2020, औषधशास्त्राच्या प्रगतीमुळे करोना विषाणूंचा नायनाट कसा करता येईल, याविषयी ऊहापोह सुरू आहे. या वैश्विक महामारीवर त्वरीत उपाय शोधणे आवश्यक आहे. साधारणपणे 65,000 हून अधिक प्रयोग राबवल्यावर आणि 100 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद केल्यानंतर स्वीस हायजीन कंपनी लिव्हींगार्डने भारतात कामकाजाला सुरुवात केली. त्याचप्रमाणे जर्मनी, युएसए, सिंगापूर, जपान आणि दक्षिण आफ्रिकेत देखील क्रांतीचा प्रवास सुरू असून त्यांनी जंतू-विषाणूंची सक्रियता कमी करणारे, अद्वितीय मास्क बाजारात उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. हे मास्क नोवल करोनाव्हायरस सार्स-कोवि-2 विषाणूंची सक्रियता 99.9% कमी करण्यात सफल ठरले आहेत. सध्या औषधालयांत किंवा बाजारात उपलब्ध असणारे मास्क प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरण्यात येत आहेत. मात्र लिव्हींगार्ड कंपनीचे मास्क हे बचावात्मक तर आहेतच, शिवाय जंतू-विषाणूंच्या प्रसाराला देखील अटकाव करतात. त्यामुळे असे मास्क वापरणारे आणि आसपासच्या व्यक्तींकरिता ते वरदान ठरणार आहेत. हे जागतिक पेटंटप्राप्त तंत्रज्ञान संजीव स्वामी या भारतीय वंशाच्या उद्योजकाने निर्माण केले असून ते या कंपनीचे प्रमुख आहेत.

कापड आणि उपचारीत लिव्हींगार्ड तंत्रज्ञान यांच्या संयोगामुळे काहीच तासांत सार्स-कोवि-2 चे कण मोठ्या प्रमाणावर 99.9% नी कमी होतात असे फ्री युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिन येथील इन्स्टिट्यूट फॉर अॅनिमल हायजीन अँड एन्व्हायर्नमेंटल हेल्थमधील संशोधकांनी घेतलेल्या शोधात आढळून आले. "या मास्ककरिता वापरण्यात आलेले कापड सातत्याने नाकावाटे आत आलेल्या विषाणूंची सक्रियता कमी करतात. तसेच या मास्कची हाताळणी देखील सुरक्षित आहे.” असे प्रोफेसर युवे रोझलेर सांगतात. “त्याशिवाय, कोविड-19 व्यतिरिक्त अन्य सर्वसाधारण आणि वैद्यकीय टप्प्यात असणाऱ्या आरोग्यविषयक समस्या देखील या कापडाच्या मदतीने कमी होण्यास उपकारक ठरते.” आज या मास्कचे व्हर्च्युअल पद्धतीच्या पत्रकार परिषदेत अनावरण करण्यात आले. ज्यामध्ये स्वत: संस्थापक त्यांच्या स्वीस मुख्यालयातून सहभागी झाले होते.

लिव्हींगार्ड टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि सीईओ संजीव स्वामी म्हणाले की, “महामारी दरम्यानच्या काळात 89 दशलक्ष मेडीकल मास्कची आवश्यकता भासणार असल्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेकडून व्यक्त करण्यात आला. दैनंदिन जीवन सर्वोत्तम दर्जाचे असण्याच्या दिशेने आमचे उद्दिष्ट असणार आहे. आधुनिक जगाला साजेशी स्वच्छता राखण्याचे आमचे ध्येय आहे. या कारणास्तव आम्ही उच्चतम मानकाकरिता प्रसिद्ध असलेल्या एफयु बर्लिन येथे उत्पादन चाचणी केली. भारतात लिव्हींगार्ड मास्क सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो आहे. दरदिवशी देशात रुग्णसंख्या वाढते आहे. या समस्येवर तोडगा शोधणे अतिशय कठीण झालेले दिसते. लिव्हींगार्ड मास्कचे अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे त्यामुळे वापरकर्त्यांना अभूतपूर्व सुरक्षा प्रदान होते. मध्य पूर्वेतील फाईन हायजीन होल्डिंग हा आमचा एक मोठा वापरकर्ता आहे, सिंगापूर, जर्मनी आणि चीनमध्ये आमचे लक्षावधी वापरकर्ते आहेत. भारतातही आम्हाला याप्रमाणे यश लाभेल याविषयी आत्मविश्वास वाटतो.”
त्यांनी पुढे म्हटले की, “लिव्हींगार्डचा सध्याचा कल आरोग्य जोखीम आणि आर्थिक समस्येचा परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने असल्याने लोकांना बचावासाठी सक्षम करणे, त्यांना कामावर पुन्हा रुजू करणे आणि जीवन सुरळीत करण्याकडे आहे. आमचे उत्पादन हे धुवून पुन्हा वापरण्यासारखे आहे. ते बहुतांशी सुती कापडाने तयार करण्यात आले आहे. हे मास्क पर्यावरण-स्नेही आणि शाश्वत आहे. जर लक्षावधी लोकांनी एक पुन्हा वापरता येईल अशाप्रकारचा लिव्हींगार्ड मास्क 210 वेळा वापरला तर आपण 36,000 टन कचरा निर्मितीला अटकाव करू असे आमच्या एका संशोधनातून स्पष्ट होते. नियमित मास्कच्या तुलनेत हा मास्क स्वस्त आहे. कारण आमच्या एका मास्कच्या तुलनेत एका व्यक्तीला 210 साधारण मास्कची नियमितपणे आवश्यकता भासू शकते.”
भारतातील ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, संपर्कातून पसरणाऱ्या सार्स कोवि 2 विषाणूला निष्क्रिय करण्यासाठी मास्कचा उपयोग केला जावा, असा जो वैज्ञानिक शोध लावला गेला आहे त्याला जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांनी मान्यता दिल्याने आता जागतिक स्तरावरील दृष्टीकोन बदलला आहे.  सध्याच्या या महामारीच्याही पुढील विचार करुन बचाव, सुरक्षितता आणि टिकाव या दृष्टीने या अभूतपूर्व आमूलाग्र बदलाचा फायदा प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवता यावा यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले गेले पाहिजेत.”
कापडाच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा (पॉझिटिव्ह चार्ज) कार्यान्वित असते हे लिव्हींगार्ड टेक्नोलॉजीचे मूळ तत्त्व आहे.  

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202