आंतरराष्ट्रीय योग दिनी ध्यान करणार्‍या लाखो हृदयांशी जोडले जाऊन करुणेला सर्वव्यापी बनवा



 

आंतरराष्ट्रीय योग दिनी ध्यान करणार्‍या लाखो हृदयांशी जोडले जाऊन
करुणेला सर्वव्यापी बनवा
 
# करुणेसाठी योग
 
Mumbai, 18th June, 2020 : आंतरराष्ट्रीय योग दिन 2020 ला करुणा केंद्रस्थानी असेल. या वर्षी, हा दिवस जागतिक संगीत दिवसही आहे. हार्टफुलनेस इन्स्टिट्युटने करुणेला सर्वव्यापी करण्याकरिता आयुष मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्र महासंघाच्या सार्वजनिक माहिती खात्याच्या सहयोगाने एका वैश्‍विक योगाथॉनचे आयोजन केले आहे, ज्यात संगीत, योगाविषयी चर्चा आणि एकत्रित ध्यान करण्याची सुवर्णसंधी आहे. या सोहळ्याला उत्तर अमेरिका आणि भारतातील 500हून अधिक सामाजिक, व्यावसायिक तसेच सांस्कृतिक संस्थांचे भरघोस समर्थन लाभले आहे.
 
या महामारीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना आणि सध्याच्या काळातील वैयक्तिक, आर्थिक आणि सामाजिक आव्हानांना सामोरे कसे जायचे हे ठरवत असताना, करुणामय जीवन जगणे ही सर्वाधिक गरजेची गोष्ट आहे. भवितव्याबद्दलची असुरक्षितता आणि भीती यांनी ग्रासलेल्या हृदयांचे सांत्वन केवळ करुणाच करू शकेल. हा कार्यक्रम करुणेच्या अपार महत्त्वाची जाणीव करून देईल आणि करुणामय जीवन जगण्यासाठी लोकांना प्रेरित करेल. करुणेच्या परिवर्तनशील शक्तीबद्दल जगातील सर्व महान धार्मिक ग्रंथांमध्ये व्यापक नोंदी आढळून येतात आणि आपण त्यांची स्वत:ला आठवण करून देण्याची वेळ आली आहे.
 
आपापल्या क्षेत्रातील नावाजलेले हे दिग्गज या योगाथॉनमध्ये सहभागी होतील : कमलेश पटेल (दाजी), हार्टफुलनेसचे वैश्‍विक मार्गदर्शक; योगऋषी बाबा रामदेवजी; आयुष मंत्री, श्रीपाद नाईक; भारतीय पीएमचे शेर्पा, श्री. सुरेश प्रभू; युएनआयसी भारताचे प्रमुख अधिकारी, राजीव चंद्रन; संगीतज्ञ पद्मविभूषण पंडित जसराज; पद्मविभूषण पंडित हरीप्रसाद चौरसिया आणि पद्मश्री शंकर महादेवन; स्वास्थ्यतज्ञ शायना एन. सी. आणि मिकी मेहता; क्रिडा क्षेत्रातील चमकते तारे पी. व्ही. सिंधू, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, नवदीप सैनी, अभिनेते ओमी वैद्य, सुधांशु पांडे आणि इतर.
 
या सोहळ्याच्या मध्यवर्ती संकल्पनेबद्दल दाजी म्हणाले, “करुणा ही संसर्गजन्य आहे आणि ती एखाद्या विषाणूपेक्षाही जास्त वेगाने पसरून, आपल्याला बलवान बनवते. करुणेच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन हे अतिशय योग्य व्यासपीठ आहे आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर या कारणासाठी आपले समर्थन देण्यास उत्स्फूर्तपणे तयार झाले आहेत. हे आंतरराष्ट्रीय योगाथॉन ही चेतना जागृत करण्यास मदत करेल की अधिक उच्च स्तरावरील करुणेच्या कृतींची आवश्यकता आहे, ज्या आपल्या जीवनाला अधिक शांतिमय आणि अर्थपूर्ण बनवतील.”
 
हा सोहळा 20 जून 2020 रोजी संध्याकाळी 7 वाजता (ET) अमेरिकेत व 21 जून 2020 रोजी सकाळी 7 वाजता भारतात थेट प्रक्षेपित होईल.
 
'योगाथॉन'वर टिप्पणी करताना सह-आयोजक श्री. श्रीपाद नाईक म्हणाले, “हा आंतरराष्ट्रीय योग दिन 2020 हा योगाभ्यासाचा वैश्‍विक प्रसार करण्याच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असेल. आपल्या माननीय पंतप्रधानांच्या प्रेरणेमुळे संयुक्त राष्ट्रसंघांनी स्वीकारलेला हा उपक्रम आता एक वैश्‍विक चळवळ बनला आहे. योगाची परंपरा ही अतिप्राचीन आहे आणि जागतिक वारसा वृद्धिंगत करण्यात तिचे मोठे योगदान आहे, ही जगभरात कुठेही असलेल्या भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. ही आपली जबाबदारी आहे - या अभूतपूर्व साधनेचे संगोपन करणे आणि तिचे फायदे सर्वांपर्यत पोहोचवणे, जेणेकरून जगभरातील भावी पिढ्यासुद्धा मानवतेला मिळालेल्या या भेटीचा आनंद घेतील.
 
हा सोहळा खालील सामाजिक माध्यमांच्या संकेतस्थळांवरसुद्धा प्रकाशित होईल :
 
या सोहळ्याचे संकेतस्थळ आहे-  http://heartfulness.org/IDY
 
सोहळ्याचे भागीदार आहेत :
 
या सोहळ्याच्या 500हून अधिक भागिदार संस्था, ज्यांनी उत्स्फुर्त पाठिंबा दिला आहे, त्यामध्ये अनेक प्रथितयश संस्था आहेत, ज्यात व्यावसायिक संस्था, सामाजिक परिवर्तनात कार्यशील असणार्‍या संस्था, आंतरराष्ट्रीय व भारतीय सरकारी संस्था आणि इतर अनेक. ज्यामध्ये विशेषत: - डीडीएफसी, युको बँक, एसबीआय, एनटीपीसी, बीएचइएल, पोर्ट असोशिएशन ऑफ इंडिया, रिलायन्स जीओ, जीआयसीपीएल, दिल्ली पोलीस, सेबी, जीएसीएल, इंडिगो एअरलाइन्स, सेवा इंटरनॅशनल, एआयएम फॉर सेवा, एएपीआय, टीएएनए, टीएएमए, एटीए - आदींचा सहभाग आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24