ड्रीम स्‍पोर्टस् फाऊंडेशनकडून कोविड-१९ दरम्‍यान ६ लाखांहून अधिक भारतीयांना मदत


ड्रीम स्‍पोर्टस् फाऊंडेशनकडून कोविड-१९ दरम्‍यान ६ लाखांहून अधिक भारतीयांना मदत

मुंबई, १८ जून २०२०: ड्रीम स्‍पोर्टस् फाऊंडेशन या भारताची आघाडीची स्‍पोर्टस् टेक कंपनी ड्रीम स्‍पोर्टसच्‍या  परोपकारी संस्‍थेने मार्च २०२० पासून सुरू असलेल्‍या कोविड-१९ संकटादरम्‍यान ६ लाखांहून अधिक भारतीयांना साह्य केले आहे. कोविड-१९ विरोधातील लढ्यामध्‍ये देशाला साह्य करत ड्रीम स्‍पोर्टस् फाऊंडेशनने वंचित लोकांना शिजवलेले भोजन, ड्राय रेशन आणि स्‍वच्‍छताविषयक किट्स दिले आहेत, तसेच महाराष्‍ट्र सरकार व बीएमसीच्‍या (बृहन्‍मुंबई महानगरपालिका) प्रत्‍यक्ष आघाडीवर काम करणा-या कर्मचा-यांना संरक्षणात्‍मक गिअर दिले आहेत. डीएसएफने कोविड-१९ साठी पीएम केअर्स फंड आणि सीएम रीलीफ फंडमध्‍ये देखील योगदान दिले आहे.

ड्रीम स्‍पोर्टस् फाऊंडेशन ही ड्रीम स्‍पोर्टसची परोपकारी संस्‍थ आहे. ड्रीम स्‍पोर्टसच्‍या पोर्टफोलिओमध्‍ये ड्रीम११, फॅनकोड आणि ड्रीमएक्‍स असे ब्रॅण्‍ड्स आहेत. फीडिंग इंडिया, वंदना फाऊंडेशन, मुंबई फूड प्रोजेक्‍ट, लर्निंग बाय लोकल्‍स आणि एंजल एक्‍स्‍प्रेस यांसारख्‍या स्‍वयंसेवी संस्‍थांच्‍या पाठिंब्‍यासह डीएसएफने सर्वाधिक गरज असलेले रोजंदारी कामगार व वंचित कुटुंबांना ६०,००० हून अधिक फूड पॅकेट्स, ५,३०० ड्राय रेशन आणि ३,५०० स्‍वच्‍छताविषयक किट्स दिले. ड्रीम स्‍पोर्टसच्‍या कर्मचा-यांनी व्‍यक्तिश: स्वेच्‍छेने २५ लाख रूपयांहून अधिक रक्‍कमेचे योगदान देत संघटितपणे ३,५०० पीपीई किट्स दान केले. तसेच डीएसएफने महाराष्‍ट्र सरकारला ४.७५ लाख मास्‍क्‍स देखील दिले आहेत. हे मास्‍क्‍स प्रत्‍यक्ष आघाडीवर काम करणा-या कर्मचा-यांना देण्‍यात येतील.

ड्रीम स्‍पोर्टसचे सीईओ व को-फाऊंडर हर्ष जैन म्‍हणाले आम्‍ही कोविड-१९ महामारीचे निराकरण करण्‍यामध्‍ये आपले सरकार व नागरी संस्‍थांना मदतीचा हात पुढे करण्‍याशी कटिबद्ध आहोत. आम्‍हाला आनंद होत आहे की, आमच्‍या प्रयत्‍नांच्‍या माध्‍यमातून  आम्‍ही ६ लाखांहून अधिक भारतीयांना मदत करण्‍यामध्‍ये यशस्‍वी झालो. स्‍पोर्टन्‍सने (ड्रीम स्‍पोर्टस् कर्मचारी) देखील पुढाकार घेत या लढ्यामध्ये देशाला साह्य करण्‍यासाठी स्वेच्‍छेने जवळपास २५ लाख रूपयांचे योगदान दिले. ड्रीम स्‍पोर्टस् फाऊंडेशनच्‍या प्रयत्‍नांचे आभार मानत महाराष्‍ट्र शासनाच्‍या वैद्यकीय शिक्षण, अन्‍न व औषध प्रशासन आणि सांस्‍कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी म्‍हणाले, आम्‍ही कोविड-१९ चे निराकरण करण्‍यासाठी महाराष्‍ट्र सरकारला केलेल्‍या साह्याबद्दल ड्रीम स्‍पोर्टस् फाऊंडेशनचे आभार मानतो. त्‍यांच्या योगदानामुळे आमच्‍या प्रत्‍यक्ष आघाडीवर काम करत असलेल्‍या कर्मचा-यांना सुरक्षित राहण्‍यासोबत उत्तमप्रकारे कर्तव्‍य बजावण्‍यामध्‍ये मदत होत आहे.

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App