मानसिक आरोग्य आणि सात्विक आहार या गुरूकिल्लीवर द योगा इन्स्टिट्यूटचा आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त भर


मानसिक आरोग्य आणि सात्विक आहार या गुरूकिल्लीवर योगा इन्स्टिट्यूटचा आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त भर

o   रणवीर ब्रार, ऋजुता दिवेकर, गौर गोपाल दास, टेरेन्स लेविस आणि राहुल शर्मा यांच्यासारख्या प्रख्यात तज्ज्ञांसह द योगा इन्स्टिट्यूट आंतरराष्ट्रीय योगदिन २०२० साजरा करण्यासाठी समारंभ आयोजित करणार

o   ३०हून अधिक शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी, मंत्रालय तसेच राजभवनातील कर्मचारी व सरकारी अधिकाऱ्यांसाठी अनेक लाइव्ह योग सत्रे घेतली जाणार

o   स्त्रिया व ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑनलाइन योग आरोग्य शिबिरे घेणार

 

मुंबई, १८ जून २०२०: द योग इन्स्टिट्यूट ही योग आणि मनाच्या अवधानासाठी (माइंडफुलनेस) काम करणारी जगातील सर्वांत जुनी संस्था आहे. सर्वांगीण योगिक जीवनशैलीबाबत जागरूकतेचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट पुढे नेत द योगा इन्स्टिट्यूट आंतरराष्ट्रीय योगदिन २०२०च्या निमित्ताने अनोख्या लाइव्ह चर्चा आणि लाइव्ह ऑनलाइन योग सत्रांचे आयोजन करत आहे. सध्या आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्माण झालेली खडतर परिस्थिती आणि सोशल डिस्टन्सिंगचे भान राखून संस्थेने दिवसभराचा लाइव्ह ऑनलाइन कार्यक्रम आखला आहे. यामध्ये योगाच्या विविध तत्त्वज्ञानांना स्पर्श केला जाणार आहे आणि त्यांचा दैनंदिन आयुष्यात कसा समावेश करावा हे सांगितले जाणार आहे. योगा इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ. हंसाजी योगेंद्र लाइव्ह चर्चासत्रांच्या माध्यमातून प्रख्यात तज्ज्ञांशी संवाद साधणार आहेत आणि योगिक जीवनशैलीशी निगडित अशा रोचक विषयांवर प्रकाश टाकणार आहेत

 

आंतरराष्ट्रीय योगदिनी द योगा इन्स्टिट्यूटचा भर मानसिक आरोग्याबाबतची जागरूकता व संपूर्ण सात्त्विक अन्नाचे लाभ यांवर असेल. डॉ. हंसाजी योगेंद्र त्यांचे मानसिक आरोग्याबद्दलचे रोचक आणि प्रदीप्त विचार आघाडीचे जीवनशैली प्रशिक्षक व प्रेरणादायी वक्ते श्री. गौर गोपाल दास यांच्यासोबतच्या लाइव्ह ऑनलाइन चर्चेदरम्यान मांडतील. सेलिब्रिटी शेफ रणवीर ब्रार आणि सेलिब्रिटी पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांच्याशीही डॉ. हंसाजी योगेंद्र अनुक्रमे सात्विक आहार व वनस्पतीआधारित सात्त्विक आहारातून मिळणारे दैनंदिन पोषण या रोचक विषयांवर लाइव्ह ऑनलाइन चर्चा करणार आहेत. नर्तक आणि नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लेविस यांच्याशीयोग या रोगया विषयावरील निकोप संभाषणातून  शारीरिक स्वास्थ्यासाठी योग कसा उपयुक्त ठरतो हे स्पष्ट केले जाणार आहे. प्रख्यात संतूरवादक राहुल शर्मा यांच्या खिळवून ठेवणाऱ्या लाइव्ह संगीत सादरीकरणाचा आनंही द योगा इन्स्टिट्यूटच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर घेता येणार आहे.

 

योगा इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ. हंसाजी योगेंद्र सांगतात, पहिल्या आंतरराष्ट्रीय योगदिनाची भारतात २०१५ मध्ये पायाभरणी करणाऱ्या प्रमुख संस्थांमध्ये आमची संस्था आहे. सध्या आपण शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या कठीण व अंगावर येणाऱ्या वातावरणात जगत आहोत. भावनिक शांती प्राप्त करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती व सशक्तता विकसित करण्यासाठी सर्वांत उपयुक्त उपायांपैकी एक म्हणून लोक योग आणि मनाच्या जागरूकतेकडे बघत आहेत. आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा योगाच्या माध्यमातून स्वास्थ्याची जबाबदारी शिरावर घेतली आहे आणि आपल्या नागरिकांना वैविध्यपूर्ण योगिक जीवनशैलीशी निगडित विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी मोठ्या तज्ज्ञांशी सहयोग केला आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा आदर राखून तसेच आरोग्य व सुरक्षिततेचे निकष लक्षात घेऊन हे सर्व उपक्रम आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लाइव्ह सादर केले जातील. विद्यार्थी, सरकारी कर्मचारी, स्त्रिया व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी खास लाइव्ह योग आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यासोबतच आम्ही मानसिक आरोग्याच्या जागरूकतेवर लक्ष केंद्रित करत आहोत आणि प्रख्यात व सन्माननीय तज्ज्ञांच्या मदतीने सात्त्विक आहार पोषणाच्या तपशिलांबद्दल व फायद्यांबद्दल सखोल माहिती घेत आहोत.”

 

 

आंतरराष्ट्रीय योगदिन २०२० निमित्त योग इन्स्टिट्यूटने आखलेले उपक्रम:

 

. डॉ. हंसाजी योगेंद्र आणि सेलिब्रिटी शेफ रणवीर ब्रार यांच्यात सात्त्विक आहाराबाबत संवाद व लाइव्ह ऑनलाइन चर्चा- १९ जून रोजी दुपारी ३ ते ३.४५.

. डॉ. हंसाजी योगेंद्र आणि सेलेब्रिटी पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांच्यात योग आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली तसेच तुमच्या दैनंदिन जीवनातील आरोग्यपूर्ण आहाराचे महत्त्व या विषयावर संवाद आणि लाइव्ह ऑनलाइन चर्चा. तारीख: २१ जून, संध्याकाळी ६ ते ६.४५.

. डॉ. हंसाजी योगेंद्र आणि आघाडीचे प्रेरणादायी वक्ते व जीवनशैली प्रशिक्षक गौर गोपाल दास यांच्या योग व मानसिक स्वास्थ्यामधील सुंदर नात्याबद्दल ऑनलाइन संवादात्मक संभाषण. तारीख २१ जून, ंध्याकाळी ७ ते ७.४५.

. डॉ. हंसाजी योगेंद्र आणि आधुनिक नर्तक टेरेन्स लेविस यांच्यात योग या रोग या विषयावर निकोप संभाषण. तारीख: २१ जून, सकाळी ११.३० ते दुपारी १२.१५.

. योगनाद हा संतूरवादक राहुल शर्मा यांचा लाइव्ह सांगितिक कार्यक्रम, २१ जून रोजी संध्याकाळी ५:३० ते ६. स्त्रियांच्या आरोग्यासाठी विशेष ऑनलाइन योगवर्ग- २१ जून- दुपारी २ ते ४.

. नैराश्य व चिंतेची समस्या हाताळण्यासाठी ऑनलाइन मानसिक आरोग्य शिबिर- २१ जून, सकाळी ९ ते ११.

. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष ऑनलाइन योगवर्ग- २१ जून, संध्याकाळी ४ ते ५.

 

वरील सत्रांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आणि द योग इन्स्टिट्यूटच्या सोशल मीडिया हॅण्डल्सद्वारे कोणीही त्यामध्ये सहभागी होऊ शकते.

 

द योग इन्स्टिट्यूट ३०हून अधिक शाळांतील व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी लाइव्ह ऑनलाइन योगसत्रे घेणार आहे आणि त्यांना योगासने शिकवणार आहे तसेच योगाचे लाभ समजून घेण्यास आणि हा दैनंदिन जीवनशैलीचा भाग करण्यात मदत करणार आहे.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202