नवीन ‘सरपंच प्लस’ ट्रॅक्टर श्रेणी ‘महिंद्रा’तर्फे महाराष्ट्रात सादर

 

नवीन सरपंच प्लस ट्रॅक्टर श्रेणी महिंद्रातर्फे महाराष्ट्रात सादर

·         सरपंच प्लस श्रेणीतून 30 एचपी (22.37 किलोवॅट) ते 50 एचपी (37.28 किलोवॅट) या क्षमतेच्या ट्रॅक्टर्सची नवीन मॉडेल्स सादर

·         या ट्रॅक्टरमध्ये बसविण्यात आले आहे प्रगतइंधन वाचविणारे इएलएस (एक्स्ट्रॉ लॉंग स्ट्रोक) डीआय इंजिन’, त्यातून 2 एचपी (1.49 केडब्ल्यू) अधिक शक्ती व उच्च बॅक-अप टॉर्क

·         या उद्योगातील सर्वात जास्त मुदतीची6 वर्षांची वॉरंटी

·         महाराष्ट्रात ऑनलाइन स्वरुपाची नोंदणीची सुविधा उपलब्ध


मुंबईजून 222020 – सुमारे 20.7 अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या महिंद्रा उद्योगसमुहातील महिंद्रा कृषि उपकरणे विभागाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरपंच प्लस ही ट्रॅक्टरची नवीन श्रेणी सादर केली आहे. या कंपनीच्या लोकप्रिय ठरलेल्या 575 सरपंच या ट्रॅक्टरची सुधारीत आवृत्ती 575 सरपंच प्लस या नावाने कंपनीने आणली आहे. या नव्या श्रेणीत 30 एचपी (22.37 किलोवॅट) ते 50 एचपी (37.28 किलोवॅट) या क्षमतेची इंजिने असलेल्या ट्रॅक्टर्सचा समावेश आहे.

नव्या सरपंच प्लस श्रेणीतील ट्रॅक्टरमध्ये 2 एचपी (1.49 केडब्ल्यू) इतकी शक्ती अधिक आहेतसेच कमाल टॉर्क, बॅक-अप टॉर्क हाही अधिक प्रमाणात आहे. ट्रॅक्टरने कसण्याच्या जमिनीची व्याप्ती त्यामुळे वाढते. महिंद्राच्या नवीन तंत्रज्ञानाच्या इंजिनांमुळे केवळ जास्त शक्ती मिळतेएवढेच नव्हे तरइंधनाची अधिक बचत होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण होते. या मॉडेल्समधील नवीन स्टाईल आणि चालकाला अनुरुप ठरेल असे डिझाईन यांमुळे ट्रॅक्टरचालकाला आराम मिळतो आणि मालकाला असा ट्रॅक्टर बाळगल्याबद्दल अभिमान वाटतो. नवीन सरपंच प्लस श्रेणीचे उत्पादन महिंद्राच्या देशभरातील अत्याधुनिक कारखान्यांमध्ये करण्यात येणार आहे.

नवीन सरपंच प्लस श्रेणीच्या ट्रॅक्टरसाठी महिंद्रातर्फे या उद्योगातील सर्वात जास्त मुदतीची6 वर्षांची वॉरंटी देण्यात येत आहे. या ट्रॅक्टरच्या खरेदीसाठी M2ALL.com या वेबसाइटवर 5000* रुपये भरून नोंदणी करता येईल. खरेदीदारांकरीता विशेष कर्जयोजना व इतर सवलती उपलब्ध आहेत.

नवीन सरपंच प्लस श्रेणी सादर करताना महिंद्रा अॅंड महिंद्रा कंपनीच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरचे प्रमुख हेमंत सिक्का म्हणाले, ‘’भारतीय ट्रॅक्टर्सच्या क्षेत्रात अग्रणी या नात्याने, आम्ही महिंद्रामधून अत्याधुनिक तंत्रज्ञान सादर करण्यात नेहमीच पुढे असतो. नवीन सरपंच प्लस श्रेणीची निर्मिती हे याच दिशेने टाकलेले पाऊल आहे. आधुनिक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा विचार करून अधिक शक्तीअधिक बॅक-अप टॉर्कमॉडर्न स्टाइलिंग आणि चालकाला अनुरुप असे सर्वोत्कृष्ट डिझाईन या बाबी आम्ही या श्रेणीमध्ये समाविष्ट केल्या आहेत. अतिशय प्रगत अशा इएलएस इंजिन तंत्रज्ञानामुळे या ट्रॅक्टरमध्ये अधिक शक्ती व इंधनाची बचत या दोन्ही गोष्टी साध्य होतात. त्यातून शेतकऱ्याची उत्पादकता वाढतेत्याच्या उत्पन्नात भर पडते आणि त्याची उन्नती होण्यास मदत होते.’’

महिंद्रा ट्रॅक्टरच्या तुमच्या नजीकच्या वितरकाकडेही आता नवीन सरपंच प्लस श्रेणी उपलब्ध

नवीन सरपंच प्लस ही श्रेणी महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या महाराष्ट्रातील सर्व सक्रीय वितरकांकडे उपलब्ध आहे. आमच्या ग्राहकांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन आम्ही महिंद्राच्या सर्व वितरकांच्या शोरूम्समध्ये स्वच्छतेच्या व सुरक्षेच्या आवश्यक नियमांचे काटेकोर पालन करीत आहोत. यातून आम्हाला ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे शक्य होते. 

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202