‘जॉय’तर्फे 100 टक्के नैसर्गिक ‘एसपीएफ’सह ‘मिनरल सनस्क्रीन’ सादर

जॉयतर्फे 100 टक्के नैसर्गिक एसपीएफसह
मिनरल सनस्क्रीन सादर

सनस्क्रीन प्रवर्गासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून मिथिला पालकरशी करार

 

जाहिरातीचा व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक - https://www.youtube.com/watch?v=gQs4AGbsUZ4&feature=youtu.be

 

मुंबई 03 जुलाई 2020 : आरएसएच ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड’ या अग्रणी पर्सनल केअर क्षेत्रातील भारतीय कंपनीने आपल्या जॉय या ब्रँडने, नैसर्गिक, रसायन-मुक्त एसपीएफसह नवीन जॉय मिनरल सनस्क्रीन बाजारात आणण्याची घोषणा केली. याशिवाय, मिथिला पारकर या अभिनेत्रीची सनस्क्रीन या श्रेणीसाठी ब्रँड अँम्बेसेडर म्हणून जॉयतर्फे नियुक्ती करण्यात आली आहे.


 

जॉय पर्सनल केअर ह भारतातील सर्वात मोठ्या सनस्क्रीन ब्रॅंडपैकी एक आहे. बाजारपेठेत या ब्रॅंडचा सुमारे 20 टक्के हिस्सा आहे. सनस्क्रीनच्या क्षेत्रात आपला हिस्सा वाढविण्याच्या दृष्टीने जॉयने मिनरल सनस्क्रीन बाजारात सादर केले आहे. या सनस्क्रीनमध्ये सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठीचे खास सन प्रोटेक्शन फॅक्टर (एसपीएफ) असल्यामुळे, तसेच याची किंमत कमी असल्याने बाजारातील इतर उत्पादनांपेक्षा ते निराळे ठरते.

 

जॉय मिनरल सनस्क्रीन हे दररोज वापरण्याजोगे आहे, यावर या कंपनीने भर दिला आहे. या संदर्भातील जाहिरातीमध्ये मिथिला पारकर नमूद करतेकी ती नैसर्गिक घटकांचा वापर करण्याबाबत खूपच चोखंदळ आहे. ती नेहमी नैसर्गिक साबणऑरगॅनिक चहा किंवा सेंद्रिय भाज्या यांचाच वापर करते. त्वचेची काळजी घेण्याचा मुद्दा उपस्थित होतोतेव्हा तर ती नैसर्गिक घटक असलेल्या उत्पादनाचीच निवड करते आणि साहजिकचनैसर्गिकरसायन-मुक्त, एसपीएफने युक्त असे जॉय मिनरल सनस्क्रीन हेच तिच्या दैनंदिन उपयोगाचे उत्पादन आहे.

 

आरएसएच ग्लोबलचे अध्यक्ष सुनील अग्रवाल म्हणाले, “सूर्यप्रकाशातील यूव्हीए व यूव्हीबी या दोन किरणांचे त्वचेवर काय दुष्परिणाम होतातहे आजकाल सर्वच ग्राहकांना माहीत असते. व्यापक अर्थाने त्वचेचे संरक्षण करणारे सनस्क्रीन घेण्याकडे सर्वांचा कल असतो. त्यामुळेच हे नावीन्यपूर्ण सनस्क्रीन दररोज लावावे, यावर आमच्या जाहिरातींत भर देण्यात येत आहे. मिनरल सनस्क्रीन किंवा रसायनमुक्त सनस्क्रीन ही संकल्पना सामान्यजनांसाठी नवीन असलीतरी त्वचेशी संबंधित व्यावसायिकांसाठी ती महत्त्व राखून आहे. आमच्या सनस्क्रीनमध्ये झिंक ऑक्साईड हा एक महत्त्वाचा अजैविक स्वरुपाचा घटक आहे. तो प्रकाशाचे परावर्तन या तंत्राने काम करतो. या झिंक ऑक्साईडचा पातळ थर त्वचेवर बसतो. या थरामुळे यूव्हीए व यूव्हीबी हे अतिनील किरण त्वचेमध्ये शोषले जात नाहीत व त्वचेचे प्रत्यक्ष संरक्षण घडून येते. सनस्क्रीनच्या श्रेणीमध्ये या नव्या उत्पादनाचा समावेश झाल्याने व बाजारातील अन्य उत्पादनांच्या तुलनेत या सनस्क्रीनचा उत्कृष्ट परिणाम ग्राहकांना सहज जाणवणार असल्याने आम्ही मोठ्या अपेक्षा बाळगून आहोत.’’  

 

आरएसएच ग्लोबलच्या मुख्य विपणन अधिकारी पौलोमी रॉय म्हणाल्या, “देशातील तरुणपिढीने आमच्या या नव्या सनस्क्रीनचे स्वागत केले आहे आणि मिथिला पालकर ही नव्या युगातील या उत्पादनाशी जणू एकरूप झाली आहे. मिथिला देशभरात लोकप्रिय आहे. त्या अनुषंगानेच आम्ही तिला ब्रॅंड अँम्बेसेडर म्हणून निवडले आहे. तिचा तरूणांवर खूप प्रभाव आहे आणि आमचा विश्वास आहे की जॉय आणि सनस्क्रीन या श्रेणीच्या विक्रीमध्ये ती जल्लोष निर्माण करील. आमच्या ब्रॅंडशी व जाहिरात मोहिमेशी तरुणाई लगेच जोडली जाईलयाची आम्हाला खात्री आहे. जाहिरातीमधील मिथिलाचे निवेदन अतिशय स्पष्ट आणि मनाला भावेल असे आहे. आपल्यापैकी अनेकांनी आपल्या रोजच्या आयुष्यात नैसर्गिक उत्पादनेच वापरण्याचे ठरविलेले आहेअशा वेळी सनस्क्रीनची निवड करतानाही नैसर्गिक हाच निकष का मानू नयेअसे आमचे मत आहे.

 

आरएसएच ग्लोबलच्या सनस्क्रीन श्रेणीची नवीन ब्रँड अ‍ॅम्बेसेडर मिथिला पालकर म्हणाली, “जॉय पर्सनल केअरच्या दुसर्‍या उत्पादनासाठीही माझीच निवड झाल्याने मी खूप आनंदीत आहे. सनस्क्रीन लावणे हा त्वचेची दैनंदिन काळजी घेण्याच्या माझ्या सवयीचा एक भाग आहे आणि जाहिरातीतही हेच नमूद करण्यात आले आहे. मिनरल सनस्क्रीन’ किंवा रसायनमुक्त सनस्क्रीन’ ही संकल्पना खूप नाविन्यपूर्ण आहे. शंभर टक्के नैसर्गिक एसपीएफ उत्पादन मिळणे ही आपणा सर्वांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे.

 

वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन व अनेक शहरांमध्ये प्रत्यक्ष उत्पादने सादर करून नवीन जॉय मिनरल सनस्क्रीनचा व्यापक प्रचार करण्यात येणार आहे.

 

जॉय पर्सनल केअरमध्ये नैसर्गिक स्वरुपाची नॉन-ऑयली सनस्क्रीन उत्पादनांची श्रेणी उपलब्ध आहे. ती यूव्हीए व यूव्हीबी यांपासून त्वचेचे संरक्षण करते. रासबेरी सीड ऑईल असलेले जॉय हॅलो सनस्क्रीन एसपीएफ-20’; ‘कॅरट सीड ऑईल व कॅमोमाईल अर्क असलेले जॉय हॅलो सन सनस्क्रीन एसपीएफ-30’; पपई व केशराचा अर्क असलेले जॉय हॅलो सन सनस्क्रीन एसपीएफ-40 आणि जॉय हॅलो सन टिंटेड सनस्क्रीन एसपीएफ-50 यांचा या उत्पादनांमध्ये समावेश आहे.

--

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202