फोर्स मोटर्सच्या वतीने कोविडविरुद्ध लढ्यासाठी 1000 नवीन ट्रॅव्हलर ॲम्ब्युलन्सची सोय

फोर्स मोटर्सच्या वतीने कोविडविरुद्ध लढ्यासाठी 1000 नवीन ट्रॅव्हल म्ब्युलन्सची सोय

 

02 जुलै, 2020एकीकडे टाळेबंदी शिथिल करत असताना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने आपल्या न्यायकक्षेत आरोग्य निगा पायाभूत सुविधा बळकट करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पुणे येथील फोर्स मोटर्स ही वाहन निर्मिती क्षेत्रात मातब्बर समजल्या कंपनीपैकी एक मानली जाते. या कंपनीने पूर्ण क्षमतेने ॲम्ब्युलन्सच्या श्रेणीची निर्मिती आणि पुरवठा करण्याचे निश्चित केले असून ही वाहने बांधणीनंतर पहिल्या दिवसापासूनच सेवेकरिता सज्ज असणार आहे. त्यासोबतच अलीकडे सादर करण्यात आलेल्या नॅशनल ॲम्ब्युलन्स कोडची पूर्तता कंपनीने केली आहे. 

 

टाईप बी ॲम्ब्युलन्स ही मुलभूत प्रकारात मोडणारी ॲम्ब्युलन्स असून ज्या रुग्णांना वाहतुकीदरम्यान कोणत्याही उपचाराची आवश्यकता नसते, अशांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याची सोय या ॲम्ब्युलन्समधून करण्यात येते. तर ज्या रुग्णांना वाहतुकीदरम्यान मुलभूत देखरेख तसेच रुग्णाच्या शरीराला काट-छेद न देता एअरवे मॅनेजमेंटची आवश्यकता असते अशा रुग्णांसाठी टाईप सी किंवा बेसिक लाईफ सपोर्ट ॲम्ब्युलन्सची सोय असणार आहे. तर टाईप डी ॲम्ब्युलन्स किंवा ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट ॲम्ब्युलन्समध्ये ज्या रुग्णांना देखभालीत अतिदक्षता त्याचप्रमाणे एअरवे मॅनेजमेंट आवश्यक पुरवली जाते.ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट ॲम्ब्युलन्स जीवरक्षक साहित्य जसे डिफायब्रिलेटर, ट्रान्सपोर्ट वेंटीलेटर, बीपी एपारेट्स, स्कूप स्ट्रेचर, स्पाईन बोर्ड इत्यादींची सुविधा देण्यात येते. जेणेकरून अॅम्ब्युलन्समधून अतिशय आजारी रुग्णाला वाहतुकीदरम्यान उपचार देण्यात मदत मिळेल.

 

त्याशिवाय फोर्स मोटर्सकडे मोबाईल मेडीकल युनिटचा पुरवठा करण्याची क्षमता असून याद्वारे दुर्गम भागात सल्ला तसेच उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र वसविण्यात येत आहेत.

 

या महामारीचा प्रतिकार करण्यासाठी राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाने सर्व प्रकारच्या ॲम्ब्युलन्सचे नियोजन केले आहे. जेणेकरून परिस्थितीनुसार सुविधा पुरवणे सोपे जाईल.

 

फोर्स मोटर्सने आंध्रप्रदेश सरकारला एक हजारहून अधिक ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्या. ज्यामध्ये 130 प्रगत जीवरक्षक ॲम्ब्युलन्स, 282 मुलभूत जीवसाह्य ॲम्ब्युलन्स आणि 656 पेक्षा अधिक मोबाईल मेडीकल युनिट्सचा समावेश आहे. यामुळे आरोग्य देखभाल पायाभूत सुविधेचे महत्त्वपूर्ण अद्ययावतीकरण होऊन वेळेत पोहोचणे सुधारून, रिस्पॉन्स टाईम कमी होणार आहे. आंध्र प्रदेश सरकारला मोबाईल मेडीकल युनिट्स सुपूर्द करण्यात आले आहेत, ते कोविड तपासणी सुविधेने सुसज्ज आहेत. नागरिकांनी 104 क्रमांकावर संपर्क साधून या सुविधेचा लाभ घेता येईल.

 

याप्रसंगी बोलताना फोर्स मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्ट प्रसन फिरोदीया  म्हणाले की, “आपल्या आरोग्य देखभाल यंत्रणेतील कमतरता महामारीच्या उद्रेकामुळे अधोरेखित झाल्या. स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारच्या वतीने सार्वजनिक आरोग्य पुरवठा यंत्रणेने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आपली सेवा अद्ययावत केली त्यांची ही कृती हृदयस्पर्शी ठरली. आंध्र सरकारने फोर्सच्या विश्वास सार्थ ठरवलेल्या, भरवशाच्या ट्रॅव्हलर ॲम्ब्युलन्सला पसंती दिल्याने आम्हाला आनंद वाटतो. इतर राज्यांमध्ये देखील अशाच पद्धतीचे साह्य मिळावे ही आशा करतो.”

एक जबाबदार कॉर्पोरेट समूह म्हणून डॉ. अभय फिरोदीया ग्रुपने महामारीथीविरोधात लढ्यात सक्रीय सहभाग घेतला आहे. त्यांनी कोविड – 19 संबंधित निरनिराळ्या मदत कार्यासाटी रु. 25 कोटींचे साह्य केले. या माध्यमातून आरोग्य देखभाल पायाभूत सुविधा अद्ययावतीकरण, मोबाईल क्लिनिक/चाचणी क्षमतेला चालना मिळाल्याने टाळेबंदीच्या कालावधीत 10 लाखांहून अधिक रुग्णांना उपचार उपलब्ध करून देणे शक्य झाले.

ट्रॅव्हलरच्या पूर्ण फॅक्टरी बिल्ड ॲम्ब्युलन्सच्या श्रेणीला तिची अद्वितीय कामगिरी, सर्वोत्तम विश्वसनीयता आणि टिकाऊपणाला आरोग्य विभाग, रुग्णालये आणि सेवा पुरवठादारानी पसंती दर्शवली आहे.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202