वाढीव सुरक्षेकरिता इंटेलिजन्ट टायर मॉनिटरिंग सिस्टीमसाठी ब्रिजस्टोनची मायक्रोसॉफ्ट समवेत हातमिळवणी


वाढीव सुरक्षेकरिता इंटेलिजन्ट टायर मॉनिटरिंग सिस्टीमसाठी ब्रिजस्टोनची मायक्रोसॉफ्ट समवेत हातमिळवणी

·         मायक्रोसॉफ्ट समवेत भागीदारीच्या माध्यमातून ब्रिजस्टोनकडून मायक्रोसॉफ्ट कनेक्टेड वेहिकल प्लॅटफॉर्म (एमसीव्हीपी) चा वापर करून अभिनव टायर डॅमेज मॉनिटरिंग सिस्टीमची निर्मिती  

·         रस्ते सुरक्षा वाढवणे तसेच तांत्रिकदृष्ट्या उद्‍भवणाऱ्या गडबडीमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करणे हे सिस्टीमचे उद्दिष्ट 

·         ही भागीदारी म्हणजे शाश्वत आणि प्रगत दळणवळण पर्यायांविषयीचा ग्लोबल लिडर बनण्याच्या ब्रिजस्टोनच्या प्रवासातील पुढचे पाऊल

 

ब्रिजस्टोन हा जगातील सर्वात मोठा टायर आणि रब्बर निर्मितीदार असून त्यांनी मायक्रोसॉफ्टसोबत भागीदारी करून टायरला झालेले नुकसान सुनिश्चित वेळेत शोधून काढणारी पहिली वैश्विक मॉनिटरींग सिस्टीम तयार केली आहे. या समस्या गंभीर स्वरुपाच्या असतात, रस्त्यांवर होणाऱ्या 30% अपघातांना तांत्रिकदृष्ट्या झालेल गडबड1 जबाबदार असल्याचे निदर्शनास आले आहे. 

टायरसंबंधी समस्यांचा शोध घेणारा अंतीम भाग

टायरविषयक समस्यांचे चार प्रमुख प्रकार असतात: टायरमध्ये हवेचा अपुरा दाब (प्रेशर), अत्याधिक वापर झाल्याने त्याची झालेली झीज, अनियमित देखभाल आणि रस्त्यावरील खड्डे किंवा तत्सम बाबींमुळे चाकाचे होणारे नुकसान. 

सुदैवाने, यापैकी जास्तीत-जास्त समस्यांचा निपटारा करण्याचा विचार याआधीच करण्यात आलेला आहे. टीपीएमएस (टायर प्रेशर मॉनिटरींग सिस्टीम्स) जगातील बहुतांशी भागांत सर्वच वाहनांमध्ये 2012 पासून अनिवार्य करण्यात आली आहेत. जेणेकरून वाहन चालविणाऱ्यांना कमी चाकात हवेचा दाब कमी असल्याचे संकेत मिळतात. टायरची नियमित देखभाल केल्याने आणि वेळेत चाक बदलल्याने होणारी झीज आणि हानीला अटकाव करता येतो.

कधीही उद्‍भवू शकणारी अपवादात्मक स्थिती आणि सुरक्षेच्या बाबतीत झालेले दुर्लक्ष यामुळे टायरचे नुकसान होते – अगदी काटेकोर तपासणीशिवाय, मानवी चाचपणीव्यतिरिक्त त्याचा खुलासा होणे शक्य नसते. झीज झालेल्या वाहन चाकांमुळे अपघातांना आमंत्रण मिळू शकते. शिवाय अशाप्रकारच्या हानीचा विपरीत परिणाम इतर भागांवर देखील होऊ शकतो, जेणेकरून चाकांचे नुकसान होते. ज्यामुळे वाहन चालविणाऱ्यांना अधिक धोक्यांना सामोरे जावे लागू शकते.

आता ही तूट भरून निघू शकते. ब्रिजस्टोनची टायर डॅमेज मॉनिटरींग सिस्टीम सुनिश्चित वेळेत चाकाच्या नुकसानाबाबत सजग करते. यामधील उपलब्ध सेन्सर डेटासमवेत एमसीव्हीपी क्लाऊड फ्रेमचा वापर करण्यात येतो. जो हार्डवेयरमध्ये आधीच इंस्टॉल असतो. टायरच्या पृष्ठभागाला प्रभावित करणारे नुकसान पडताळण्याकरिता या अल्गोरिदमचा वापर होतो. वाहन चालविणाऱ्याला त्वरीत या धोक्याचा सुगावा लागतो आणि त्यानुसार तो स्थितीवर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करू शकतो. सध्या बाजारात कोणतीही समर्पक मॉनिटरींग सिस्टीम उपलब्ध नाही. जे पर्याय आहेत, त्याच्याकरिता अतिरिक्त हार्डवेअरची आवश्यकता असते.

आगेकूच करताना

या टायर डॅमेज मॉनिटरींग सिस्टीमची आणखी एक अमूल्य उपयुक्तता आहे. या सिस्टीममुळे केवळ झालेली हानी समजत नाही तर नुकसान नेमके कोणत्या जागी आहे हे देखील कळते. त्यामुळे रस्ते तसेच पायाभूत सुविधेच्या बाबतीत व्यापक दृष्टी मिळते. या तंत्रामुळे रस्त्याच्या नुकसानाला जबाबदार एजन्सीला सावध करणे आणि खड्डे तसेच अन्य धोक्यांच्या जागेबाबत सजग करण्याचे काम सुलभ झाले आहे. या यंत्रणेचा लाभ आगामी काळात येणाऱ्या ऑटोनॉमस वाहनांना होईल. ही वाहने आसपासच्या परिसरातील स्थानिक धोक्यांची माहिती देण्यास तसेच क्लाऊड डेटामध्ये जतन करण्यात उपयुक्त ठरतील.

सध्या ब्रिजस्टोनची नवीन टायर डॅमेज सिस्टीम एमसीव्हीपीने सुसज्ज असलेल्या सर्व वाहन ताफ्यात आणि ओईएममध्ये आहे. मायक्रोसॉफ्टसोबतच्या भागीदारीमुळे ब्रिजस्टोन आगामी काळात वाहन ताफ्याच्या आणि जगातील मुख्य ओईएम भागीदारांच्या आवश्यकतेनुसार पर्यायांची निर्मिती करेल.

 

एमसीव्हीपी हे डिजिटल पद्धतीत एक सातत्यपूर्णक्लाऊड-कनेक्टेड समांतर मंच देऊ करत असल्याने त्यावर ग्राहकाधिष्ठित समाधान उपाय-योजनांसह इन-व्हेईकल इन्फोटेन्मेंटअत्याधुनिक नेव्हिगेशनस्वयंप्रेरित ड्रायव्हिंगटेलीमॅटीक्स आणि अंदाज सुविधा यासोबतच ओव्हर-द-एअर-अपडेट्स (ओटीए) ची सोय मिळते.  यामध्ये एंटरप्राईज-ग्रेडची जागतिक स्तरावरील उपलब्धता आणि मायक्रोसॉफ्ट अझूर सोबत येणाऱ्या मापदंडाचा समावेश आहे.

एमसीव्हीपी हे डिजिटल पायाभूत सुविधांसह ब्रिजस्टोन  देऊ करत असल्याने संपर्कातील मोबिलिटी उपाय-योजनांच्या वितरणाला चालना मिळेल आणि त्यामुळे मायक्रोसॉफ्ट अझूर क्लाऊडएआय आणि आयओटी क्षमतांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होईल. 

या बदल्यातब्रिजस्टोन सोबत काम केल्याने मायक्रोसॉफ्टला त्यांच्या सहाय्यक भागीदारांच्या पर्यावरण प्रणालीचा विस्तार करण्यासाठी मदत होईल आणि एमसीव्हीपीच्या ग्राहकांना त्यांच्या स्वतःच्या ऑफर्समध्ये या भागीदार उपाय-योजनांचा समावेश करण्याची संधी मिळेल.     

ब्रिजस्टोन  ईएमआयएचे सीईओ आणि अध्यक्ष लॉरन डाटू म्हणाले, “आज आम्ही ब्रिजस्टोन मध्ये जे काही करतो त्यात डिजिटलचा मोठा वाटा आहे.  जे आज आणि भविष्यात देखील आमच्या गरजा पूर्ण करू शकतील अशा उद्योगातील अग्रणी भागीदारांसोबत काम करणे ही आमची अत्यावश्यक गरज आहे.  मायक्रोसॉफ्टसोबत भागीदारी केल्याने आम्हाला आमची टायर डॅमेज मॉनिटरींग सिस्टम लक्षावधी चालकांपर्यंत पोहोचविण्याची तसेच त्यांना जास्त सुरक्षितता आणि मनाची शांती देऊ करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.”

मायक्रोसॉफ्टमधील मायक्रोसॉफ्ट कनेक्टेड व्हेईकल प्लॅटफॉर्म आणि अजूर मोबिलिटीच्या महाप्रबंधक तारा प्रक्रिया म्हणाल्या, “स्मार्ट मोबिलिटी सेवा प्रदाताच्या रुपात स्वत:चे परिवर्तन करण्याच्या कामात मदत करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने मोबिलिटी कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे.  मायक्रोसॉफ्ट कनेक्टेड व्हेईकल प्लॅटफॉर्मच्या मदतीने सुरक्षित आणि वैयक्तिकरित्या संपर्कातील मोबिलिटी अनुभवांचा वेग वाढविण्याचे आमचे ध्येय आहे.  एमसीव्हीपीचा वापर करुन ब्रिजस्टोन ने तयार केलेली टायर डॅमेज मॉनिटरींग सिस्टम ही रस्त्यावरील सुरक्षिततेत लक्षणीय योगदान देऊ करते आणि उद्योगजगतातील अग्रणी एकत्र आले की व्यवसायाच्या नव्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतात हे देखील सिद्ध करते.”

जागतिक स्तरावरील या भागीदारीबाबत बोलताना ब्रिजस्टोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पराग सातपुते म्हणाले, “या भागीदारीने ब्रिजस्टोन  इंडियाला मोबिलिटी उपाय-योजनांमध्ये भारतात स्टेट ऑफ आर्ट आणि अग्रगण्य तंत्रज्ञान आणण्याची संधी मिळाली आहे.  या भागीदारीमुळे ब्रिजस्टोन  इंडियाला त्यांच्या ओई भागीदारांसोबत आणखी सहयोग करण्याची आणि आमच्या ग्राहकांना उच्च दर्जाची सुरक्षितता देऊ करण्याची संधी मिळाली आहे. भारतातील आमच्या फ्लीट भागीदारांसाठी या अत्याधुनिक ऑफर्सचा समावेश म्हणजे जास्त चांगली सुरक्षितता आणि स्रोतांचा पुरेपूर वापर ठरणार आहे.”

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202