अडथळ्यापासून संधीपर्यंत: संकटातही वृद्धी अनुभवलेली क्षेत्रे

अडथळ्यापासून संधीपर्यंत: संकटातही वृद्धी अनुभवलेली क्षेत्रे

कोव्हिड-१९ च्या साथीने जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाले. तज्ञांच्या मते, यापेक्षा दुसरे कोणतेही मोठे संकट आजवर अनुभवले नाही. मागणीला बसलेला अभूतपूर्व फटका आणि अर्थव्यवस्थेला वृद्धी देणा-या सर्व कामकाज बंद पडणे यासारख्या स्थितीशी जगातील काही शक्तीशाली अर्थव्यवस्था संघर्ष करत आहेत. काही उद्योगांसाठी कोव्हिड-१९ हे नि:संशयपणे खूपच वाईट आहे. मात्र काही क्षेत्रांमध्ये या उद्रेकामुळे संधीची नवी कवाडं उघडली आहेत.


जाणून घेऊयात लॉकडाउनमध्ये वृद्धी अनुभवलेल्या काही क्षेत्रांबद्दल:

स्टॉक मार्केटस: तंत्रज्ञानामुळे अनेक व्यवसायांवर परिणाम झाला असला तरी ब्रोकिंग क्षेत्राने तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याने ब्रोकिंग हाउसेसला चांगले दिवस आले. बाजार पुन्हा एकदा मजबूत स्थितीत येईल, या विचाराने पहिल्यांदाच गुंतवणूकदार शेअर्स खरेदी करण्याचा विचार करीत आहेत. गुंतवणूकदार बाजार टॅप करण्यामागील आणखी एक कारण म्हणजे ते सध्या घरात आहेत व शेअर मार्केटवर नजर ठेवण्यास तसेच तो सखोलपणे समजून घेण्यासाठी त्याच्या हाती अतिरिक्त वेळ आहे. एंजेल ब्रोकिंग, झेरोदहा आदींसारख्या अग्रगण्य स्टॉक ब्रोकिंग हाउसेसनी क्लाएंटमध्ये वृद्धी अनुभवली. त्यामुळे त्यांच्या व्यापाराचे प्रमाणाही वाढले.

ओटीटी प्लॅटफॉर्म्स: नावाप्रमाणेच हे प्लॅटफॉर्म थेट इंटरनेटद्वारे दर्शकांना कंटेंट प्रदान करतात. सध्याच्या कोव्हिड-१९च्या साथीने तसेच देशभरातील लॉकडाउनमुळे उद्योग आणि आर्थिक कामकाज ठप्प केले आहे. एवढेच नव्हे तर डिजिटल कंझंप्शनसह लोकांच्या वागणुकीतही बदल घडून आला आहे. कंटेंट तयार होतो, तो वितरित होतो व प्रवाहित होतो, अशा प्रकारे बाजारपेठेतही लक्षणीय क्रांती झाली आहे. लोकांना सतत विविध प्रकारचा कंटेंट हवा असतो आणि ओटीटी वर्षभर विविध प्रकारचा कंटेंट पुरवून ही मागणी पूर्ण करते. प्रोमोडोम, हॉटस्टार, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, झी फाईव्ह इत्यादी ओटीटींनी लॉकडाउन काळात प्रेक्षकांची संख्या आणि अॅप डाउनलोडमध्ये प्रचंड मोठी वृद्धी केली.

नाविन्यपूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्म्स: चिनी अॅपवर नुकतीच बंदी घातल्याने लाइफस्टाइल कम्युनिटी-कॉमर्स प्लॅटफॉर्म ट्रेल, शॉर्ट व्हिडीओ मंच मित्रों, ऑडिओ प्लॅटफॉर्म खबरी यांसारख्या विविध नाविन्यपूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्म्सनी आपल्या अॅप्सच्या डाउनलोडमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली. यूझर्सनी चिनी अॅप्सवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देत ‘मेड इन इंडिया’ अॅप्सचा अधिकाधिक वापर करण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth