भारतीय शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ अॅप 'मित्रों'वर एका महिन्यात ९ अब्ज व्हिडीओची नोंद

भारतीय शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ अॅप 'मित्रों'वर 
एका महिन्यात ९ अब्ज व्हिडीओची नोंद
~ गूगल प्ले स्टोअरवरून ३३ दशलक्ष यूझर्सनी केले अॅप डाऊनलोड ~
मुंबई, ३१ जुलै २०२०: सरकारने चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर एक महिन्यातच मित्रों या शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ अॅपने त्याच्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड प्रमाणात प्रेक्षकसंख्या मिळवली. जवळपास ९ अब्ज व्हिडिओ एका महिन्यात पाहिले गेले असून गूगल प्ले स्टोअरवर ३३ दशलक्ष यूझर्सनी हे अॅप डाऊनलोड केले आहे.
एप्रिल २०२० मध्ये शिवांक अग्रवाल आणि अनिश खंडेलवाल यांनी एकत्रितरित्या लाँच केलेले मित्रों हे अॅप सुरुवातीपासूनच लोकप्रिय ठरले आहे. हलक्या-फुलक्या विनोदांचा धागा पकडत लोकांनी त्यांचे नावीन्यपूर्ण व्हिडिओ ऑनलाइन टाकावेत, जेणेकरून लोकांची डिजिटल गुंतवणूक आणि मनोरंजनाची नव्याने कल्पना केली जाईल, हाच या शॉर्ट फॉर्म व्हिडिओ अॅपच्या स्थापनेमागील उद्देश आहे.
मित्रोंचे संस्थापक आणि सीईओ शिवांक अग्रवाल म्हणाले, 'यूझर्सना विविध प्रकारचे शॉर्ट व्हिडिओ पाहणे आणि अपलोड करण्यासाठीचा प्लॅटफॉर्म प्रदान करणे ही संकल्पना अॅप विकसित करण्यामागे होती. अगदी थोड्या कालावधीत मित्रों ने मिळवलेली लोकप्रियता पाहून आम्ही थक्क झालो आहोत. मित्रों प्लॅटफॉर्मवर लाखो नवे व्हिडिओ तयार होणे, हे अविश्वसनीय आहे. या अॅपवर दैनंदिन मनोरंजनाचा डोस घेणाऱ्या आमच्या सर्व अॅप यूझर्सना आम्ही धन्यवाद देतो.'
देशातील करनाल, हुबळी, भावनगर, अलिगड, लुधियाना आणि विजयवाडा यासारख्या लहान शहर आणि गावांतून आम्हाला तगडा प्रतिसाद मिळतोय. येथून १००,००० पेक्षा जास्त यूझर्स मिळाले आहेत, ” असे शिवांक पुढे म्हणाले.
सह-संस्थापक आणि सीटीओ अनिश खंडेलवाल म्हणाले, 'आमच्या यूझर्सची वाढ खूप उत्साहवर्धक आहे. यूझर्सची व्यग्रता वाढवणे व त्यांनी अॅपवर टिकून राहण्यासाठी आम्ही लक्षपूर्वक प्रयत्न करत आहोत. जवळपास प्रत्येक यूझर दररोज ८० व्हिडिओ पाहतो. तसेच अनेक नव्या उत्पादन सुविधांद्वारे आम्ही आणखी एंगेजमेंट वाढवू शकू, असा आम्हाला विश्वास आहे.'
मित्रों विकसकांसाठी ग्राहकांची डेटा प्रायव्हसी ही प्राथमिकता आहे. हे अॅप यूझर्सना व्हिडिओ निर्मिती, संपादन आणि शेअर करण्यासाठी सोपे आणि अखंड इंटरफेस प्रदान करते. त्याचवेळेला प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओची लायब्ररीदेखील उपलब्ध करून देते.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE