टाटा स्टील ‘नेस्ट-इन’ने तयार केले ऍग्रोनेस्ट, कांदा साठवून ठेवण्यासाठी भारतातील पहिले स्मार्ट वेअरहाऊस
टाटा स्टील ‘नेस्ट-इन’ने तयार केले ऍग्रोनेस्ट,
कांदा साठवून ठेवण्यासाठी भारतातील पहिले स्मार्ट वेअरहाऊस
~ शास्त्रोक्त अभ्यास, नाविन्यपूर्ण सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करण्यात आले आहे. ~
~ यामुळे कांदा शेतकऱ्यांना साठवणुकीमध्ये कांद्याचे होणारे नुकसान अर्ध्याने कमी करण्यात मदत होईल. ~
मुंबई, ३० जुलै, २०२०: टाटा स्टीलचा मॉड्युलर कन्स्ट्रक्शन सुविधांचा ब्रँड 'नेस्ट-इन'ने कांद्याच्या साठवणुकीसाठी ऍग्रोनेस्ट ही क्रांतिकारी सुविधा तयार केली आहे. कांद्याचे नुकसान होण्याचे प्रमाण सध्यापेक्षा अर्ध्याने कमी व्हावे हा यामागचा उद्देश आहे.
शास्त्रोक्त अभ्यासाचा आधार, नवनवीन सुविधा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कांद्यांसाठी विकसित करण्यात आलेले हे अशाप्रकारचे पहिलेच स्मार्ट वेअरहाऊस आहे. शास्त्रोक्त साठवणूक पद्धतींचा अभाव, स्टॅंडर्ड नसलेली डिझाईन्स आणि खराब दर्जाच्या साहित्याचा वापर यामुळे कांद्याच्या साठवणुकीमध्ये वेअरहाऊसच्या आतच ४०% पेक्षा जास्त कांद्याचे नुकसान होते. बेभरवशाचे हवामान, वातावरणात सतत होणारे बदल आणि सध्याच्या काळात वाहतुकीमधील अडथळे व आव्हाने यामुळे शेतकऱ्यांना कांदा साठवून ठेवण्यात अनंत अडचणींना सामोरे जावे लागते, उत्पादन चांगल्या अवस्थेमध्ये फार काळ साठवून ठेवता येत नाही. कांद्यांसाठी योग्य साठवणूक सुविधा उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक वर्षात शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनांचा दर्जा व प्रमाण यामध्ये खूप नुकसान सोसले आहे.
टाटा स्टीलचे सर्व्हिसेस आणि सोल्युशन्स विभागाचे चीफ श्री. पी आनंद यांनी सांगितले, "आम्ही असे मानतो की भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी शेतीमध्ये स्वावलंबन व स्वयंपूर्णता मिळवता येणे महत्त्वाचे आहे. या अभियानाने प्रेरित होऊन आमच्या तज्ञांनी शेती क्षेत्रासाठी अशा सुविधा तयार केल्या आहेत ज्या उपयोगानुसार वापरता येऊ शकतील. वातावरणातील बदल आणि पर्यावरण यामुळे शेती उत्पादने फार काळ साठवून ठेवता येत नाहीत, साठवणुकीच्या योग्य सुविधा नसल्यामुळे त्यांना खूप मोठे नुकसान सोसावे लागते. ही समस्या लक्षात घेऊन आमच्या टीम्सनी एक अशी सुविधा तयार केली आहे जी दीर्घकाळ पर्यंत वापरता येईल व व्यवहार्य आहे. आमच्या ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण उत्पादने व सुविधा तयार करून त्यांना उज्वल भविष्याच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
देशाची ७०% लोकसंख्या शेती क्षेत्रावर अवलंबून आहे, सकल राष्ट्रीय उत्पादनात शेती उद्योगाचे योगदान ५०% आहे. त्यामुळे सरकार शेती उत्पादक संघटनांमध्ये (एफपीओ) वेगाने गुंतवणूक करत आहे. टाटा स्टीलच्या इनोव्हेन्ट टीमने या बाजारपेठेतील रिकाम्या जागा नेमक्या हेरून शेतीसाठी पायाभूत सोयीसुविधा तयार केल्या आहेत.
हे उद्धिष्ट पूर्ण करण्यासाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत व्हावा यासाठी टाटा स्टीलच्या नेस्ट-इनने व इनोव्हेन्ट टीम्सनी ऍग्रोनेस्ट हे स्मार्ट वेअरहाऊस तयार केले आहे. जास्तीत जास्त हवा खेळती राहील असे अतिशय अनोखे साचेबद्ध डिझाईन असून जागा विशाल आहे, त्यामुळे कांदे दीर्घकाळ आणि सुरक्षित पद्धतीने साठवून ठेवता येतील. कांद्यांचे नुकसान कमीत कमी होईल हे सुनिश्चित करून खर्चाला प्रभावी ठरवणारे वातावरण यामुळे निर्माण करता येईल. या वेअरहाऊसमध्ये सेन्सर्स लावण्यात आले आहेत, ज्यामुळे आतील तापमान, आर्द्रता आणि वायू यांच्यावर निगराणी ठेवता येते, त्यामुळे कांदे जर खराब होण्याजोगे वातावरण निर्माण होत असेल तर ते आधीच ओळखता येते.
इनोव्हेन्ट
आजच्या उद्योग जगतामध्ये स्पर्धा करत असलेल्या कोणत्याही कंपनीसाठी नावीन्य ही गुरुकिल्ली आहे. उद्योगक्षेत्रातील प्रणेते व बाजारपेठेत नवनवीन उत्पादने, सेवा आणणारी कंपनी म्हणून टाटा स्टीलने भविष्यासाठी सुविधा तयार करण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलत २०१४ साली इनोव्हेन्ट डिपार्टमेंटची संकल्पना रचून एका नवीन क्षेत्रात प्रवेश केला.
नेस्ट-इन
नेस्ट-इन हा टाटा स्टीलचा मॉड्युलर, स्टीलवर आधारित कन्स्ट्रक्शन सुविधा निर्मिती व्यवसाय आहे. नेस्ट-इन संपूर्ण देशभरात कार्यरत असून, अत्यंत सक्षम डिलिव्हरी यंत्रणा असलेले नेस्ट-इन आपल्या परिपूर्ण क्रांतिकारी सुविधांमधून ग्राहकांना अनोखा अनुभव मिळवून देते. त्यांच्या प्री-फॅब सुविधा गृहनिर्माण, मॉड्युलर शौचालये, स्मार्ट शौचालये, औद्योगिक इमारती, एका जागेतून दुसरीकडे हलवण्याजोग्या केबिन्स इत्यादींसाठी अनुकूल आहेत.
नेस्ट-इनच्या सुविधा सरकारच्या स्मार्ट शहरे अभियानासारख्या विविध उपक्रमांच्या, कॉर्पोरेट प्रकल्पांच्या हलक्या बांधकामाच्या आणि ऑपरेशन्सच्या गरजा तसेच सीएसआर उपक्रम यांच्या सध्याच्या व भविष्यातील निर्माण गरजा पूर्ण करण्यासाठी सज्ज आहेत. याखेरीज नेस्ट-इन व्यक्तिगत घर विस्तारासाठी आवश्यक सुविधा, उत्पादने देखील पुरवते. अधिक माहितीसाठी - https://www.nestin.co.in/
नेस्ट-इन उत्पादने, सुविधांची प्रमुख वैशिष्ट्ये -
- आधुनिक बांधकाम सुविधा
- विनासायास, सहजसोपा अनुभव
- उत्पादनांचा, सुविधांचा दर्जा
- जलद गतीने बांधकाम
- देशभरात, सर्वात कठीण भूप्रदेशांमध्ये देखील सोयीस्कर इंस्टॉलेशन्स
- सेवेची विश्वसनीयता
Comments
Post a Comment