भारतातील पहिलाच शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अ‍ॅप ‘हिपी’

भारतातील पहिलाच शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अ‍ॅप ‘हिपी’

भारतीय बनावटीचे असे ‘हिपी’ हे नाविन्यपूर्ण आणि रोमांचक व्यासपीठ ‘झी५’ ने सादर केले

मुंबई, १ जुलै २०२०:- चिनी अ‍ॅपना पर्याय म्हणून स्वदेशी बनावटीच्या अ‍ॅपना पर्याय म्हणून ‘झी५’ या वाहिनीने स्वत:ला भारतातील मनोरंजनाचे ‘सुपर-अ‍ॅप’ म्हणून स्थापित केले आहे. शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अ‍ॅप खास बनवून घेतलेले कार्यक्रम, गाजलेले चित्रपट, मुलांसाठीचे मनोरंजन, दूरचित्रवाणीचे थेट प्रक्षेपण व बातम्या, संगीत. खेळ आणि एतद्देशीय लघुपट, अशा विविधांगी कार्यक्रमांनी अतुलनीय असा ‘सुपर-अ‍ॅप’ चा अनुभव देत असताना, ‘झी५’ने आज बहुप्रतिक्षित आणि भारतातील पहिल्याच लघु व्हिडिओपटांसाठीच्या प्लॅटफॉर्मची घोषणा केली. खास भारतीय बनावटीचे असे ‘हिपी’ हे नाविन्यपूर्ण आणि रोमांचक व्यासपीठ ‘झी५’ने सादर केले आहे. यातील अत्याधुनिक वैशिष्ट्यांच्या मदतीने सर्वात कल्पक आणि रोमांचक अशी सामग्री या ठिकाणी कोणालाही तयार करता येईल.

उत्साही, जल्लोषपूर्ण वातावरणाची प्रचिती देणारे ’हिपी’ हे नाव धारण करणाऱ्या या विशेष वाहिनीवर, पूर्ण स्वातंत्र्य व आत्मविश्वास यांच्या जोरावर देशातील तरुणाई व्यक्त होऊ शकेल. निर्विवादपणे व बेदरकारपणे, कोणाच्याही टिकेची पर्वा न करता मस्ती व धमाल करू देणारे हे ‘झी’ चे हिपी व्यासपीठ तरुणाईला अभिव्यक्त होण्यास प्रोत्साहन देतेच, त्याशिवाय तरुणांच्या अंगी असलेल्या कला व कौशल्ये या गुणांना खतपाणी घालत त्यांना नवनिर्मितीचा आणि स्टार हेण्याची संधीही मिळवून देते. 

सर्जनशील मनाला सर्वात सृजनात्मक मार्गाने व्यक्त करू देण्यासाठीची अनेक रोमांचक वैशिष्ट्ये ‘हिपी’ मध्ये असतील. करमणूकप्रधान अशा सर्व गोष्टींचे हे प्रमुख ठिकाण असेल, तसेच विविध गोष्टींचे चाहते व कथाकार यांच्यासाठीचे हे व्यासपीठ असेल.

‘हिपी’ च्या औपचारीक सादरीकरणाविषयी अधिक जाणून डाऊनलोड करा व पाहात राहा.

FB: https://www.facebook.com/HiPiOfficialPage
Insta: https://www.instagram.com/hipiofficialpage/  
Twitter: https://twitter.com/HiPi_Official

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs