एसबीआय जनरल इन्शुरन्स सादर करत आहे नव्या रचनेतील लोगो आणि नव्या टॅगलाइनसह नवी ब्रँड ओळख

एसबीआय जनरल इन्शुरन्स सादर करत आहे 

नव्या रचनेतील लोगो आणि नव्या टॅगलाइनसह नवी ब्रँड ओळख


एसबीआय जनरल इन्शुरन्स (एसबीआयजी) ने आज नवा लोगो आणि 'सुरक्षा और भरोसा दोनो' या नव्या टॅगलाइनसह ब्रँडची नवी कॉर्पोरेट ओळख सादर केली. डिजिटायजेशन नेहमीच एसबीआयजीच्या मुळाशी होते. त्यामुळे, कंपनीने या टप्प्यावर स्वाइप होणारा आणि नव्या ताजातवान्या लागोसह नव्या ब्रँड ओळखीवर भर दिला आहे.

नव्या जांभळया रंगाच्या लोगोमध्ये एसबीआयजीची भविष्यकालीन सज्जता दिसून येते. भारतभरातील पारंपरिक आणि आधुनिक अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांना सेवा देण्यास ही संस्था सज्ज आहे. पारंपरिक पद्धतीचे ग्राहक विश्वासार्हता, निष्ठा, पैशांचे मूल्य आणि निष्ठा या तत्वांना महत्त्व महत्त्व देतात. तर, आधुनिक ग्राहक लवचिकता आणि भविष्याची सज्जता असण्याला महत्त्व देतात. जांभळ्या रंगातून तारुण्याचा उत्साह, प्रज्ञा आणि बांधिलकी प्रतित होती.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्लोबल बँकिंग अॅण्ड सबसिडरीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश कुमार खारा म्हणाले, "आम्ही भारतभरातील लोकांच्या आयुष्याला विविध तऱ्हेने स्पर्श करीत असतो त्यामुळे आमचा व्यवसाय फक्त बँकिंगपुरता मर्यादित राहू नये, याची खातरजमा करण्यासाठी एसबीआय नेहमीच प्रयत्नशील असते. राष्ट्रउभारणीप्रती आमची बांधिलकी संपूर्ण आणि सर्वसमावेशक आहे. ब्रँडच्या नव्या ओळखीसह एसबीआय जनरल देशाला सुरक्षित करण्यास हातभार लावताना नव्या वाटा धुंडाळत आहे आणि विश्वासाचा आमचा वारसा पुढे नेत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. वृद्धिंगत झालेल्या डिजिटल क्षमतांसह आपल्या ग्राहकांना सेवा देण्यास आम्ही सुयोग्य स्थानी आहोत आणि त्यातून अधिक चांगला आणि सकारात्मक ग्राहकानुभव देऊ शकू, याची आम्हाला खात्री आहे."

एसबीआय जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुशन महापात्रा म्हणाले, "एसबीआयचा वारसा पुढे नेताना आम्हाला अभिमान वाटतो आणि विश्वास आणि सुरक्षेचा हा वारसा पुढे नेणे हा नक्कीच आमचा सन्मान आहे. भारतातील इन्शुरन्स क्षेत्र भीती आणि असुरक्षिततेने व्यापले आहे. या समस्येवर उपाय म्हणून आणि 'विश्वास' या शब्दाला साजेशी आमच्या ब्रँडची ओळख खरी ठरवण्यासाठी आम्ही नवी टॅगलाइन काढली आहे - सेक्युरिटी आणि ट्रस्ट, बोथ म्हणजेच सुरक्षा और भरोसा दोनो”. ते पुढे म्हणाले, "आमच्या ग्राहकांनी आमच्यावर टाकलेला विश्वास हा आमचा सन्मान आहे. आमच्या नव्या लोगोतून आम्ही त्यांना पुन्हा खात्री देऊ इच्छितो की त्यांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही नव्या युगातील पद्धती आणि सेवांसह सज्ज आहोत." दशकभराच्या आपल्या प्रवासात एसबीआयजीने 1000 कोटी रुपयांच्या ग्रॉस रीटन प्रीमिअमचा टप्पा सर्वाधिक वेगाने अवघ्या चार वर्षांत गाठणे, जानेवारी 2007 मध्ये शुल्क बदलाच्या प्रक्रियेनंतर या क्षेत्रात प्रवेश करणारी आघाडीची खासगी इन्शुरर, आर्थिक वर्ष 18 पासून सातत्याने फायदेशीर आणि ब्रेक इव्हनला असलेली कंपनी आणि 2011 मध्ये 17 शाखा असे अनेक मैलाचे टप्पे गाठले आहेत. या दशकभरात एसबीआय जनरलने आपली व्याप्ती भारतभरातील 120 हून अधिक शाखा आणि 253 ठिकाणची उपस्थिती अशी वाढवली आहे. त्यांच्या बळकट वितरक भागीदारांनी भारताच्या कानाकोपऱ्यात त्यांचे अस्तित्व नेले आहे. एसबीआयच्या 22000 हून शाखा, इतर वित्तीय आणि डिजिटल भागीदार आहेत. या यशाच्या दणकट पायावर आताच्या नव्या ओळखीसह एसबीआय जनरल इन्शुरन्सने प्रत्येक भारतीयाच्या सामान्य विम्याच्या गरजांसाठीचा प्राधान्यक्रम ठरण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे.


Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202