लोव लिंटास शुभारंभ करत आहे कामवापसीचा, स्थलांतरित कामगारांना शहरी नोक-या मिळवून देऊन त्यांना पुन्हा इथे जोडून घेण्यासाठी अव्वल कॉर्पोरेट्स द्वारे पाठिंबा लाभलेला एक तांत्रिक मंच
लोव लिंटास शुभारंभ करत आहे कामवापसीचा, स्थलांतरित कामगारांना
शहरी नोक-या मिळवून देऊन त्यांना पुन्हा इथे जोडून घेण्यासाठी
अव्वल कॉर्पोरेट्स द्वारे पाठिंबा लाभलेला एक तांत्रिक मंच
मुंबई, 29 जुलै 2020ः लोवे लिंटास कामवापसीचा शुभारंभ करत आहेत, स्थलांतरित कामगारंना पुन्हा काम मिळण्यास मदत होण्यासाठी, तसंच तत्परतेने उपलब्ध होणार्या कामगारांना निर्वाहाचा मार्ग मिळून नियोक्त्यांना सहाय्य होण्यासाठी उभारण्यात आलेला हा एक तांत्रिक मंच आहे. झी नेटवर्क, भारती एअरटेल, ऍक्सिस बँक, रेडिओसिटी आणि रेझरपोर्ड ह्यासारख्या कंपन्यांनी ह्या सामाजिक उपक्रमासाठी आपलं पाठबळ दिलेलं आहे, ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळण्यासाठी सरकारी उपक्रमांना सहाय्य होणार आहे.
लोव लिंटासचे
सीसीओ प्रतीक
भारद्वाज
ह्या संकल्पनेबद्दल
प्रतिक्रिया देताना
म्हणाले, “अखेर ज्या
काही परिस्थितीतून
स्थलांतरित कामगार
गेले आहेत
त्यामुळे नोकर्यांबाबतची
स्पष्टता आणि
नियमन असल्याखेरीज
ते शहरात
परतण्यास तयार
होणार नाहीत.
तसं परतण्यासाठी
त्यांना सक्रिय
योजनांची गरज
आहे. दुसर्या
बाजुला, अपूर्ण
राहिलेल्या योजना
पुन्हा सुरू
करण्यासाठी कामगारांची
गरज भासते
आहे. कामवापसी
हा पेच
सोडवण्यास मदत
व्हावी म्हणून
तयार करण्यात
आलेला रचनात्मक
तांत्रिक प्रकल्प
आहे. विविध
शहरांमधील योजनांद्वारे
स्थलांतरित श्रमिक
कामगारांना जोडल्यामुळे
भारतीय अर्थव्यवस्था
खुली होण्यास
गती मिळेल
अशी आम्हाला
आशा आहे. कोविड-19 मुळे जो राष्ट्रीय
लॉकडाउनचा निर्बंध घातला गेला त्याचा जास्त परिणाम स्थलांतरित कामगारांवर झाला. हजारो स्थलांतरित कामगारांना त्यांच्या स्वतःच्या राज्यांत परतावं लागलं, कारण लॉकडाउनमुळे त्यांच्या नोकर्या गेल्या आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. नंतर देशात लॉकडाउनचे निर्बंध हळुहळू उठवले गेल्यानंतरही हे कामगार
कामावर परतण्यास तयार नव्हते, ज्याचा परिणाम त्यांच्यावर अवलंबून असलेल्या विविध उद्योगांवर झाला.
Comments
Post a Comment