व्‍हीएफएस ग्‍लोबल काही शहरांमधील निवडक व्हिसा अॅप्‍लीकेशन सेंटर्समध्‍ये मर्यादित स्‍वरूपात कार्यसंचालनांना सुरूवात करणार

व्‍हीएफएस ग्‍लोबल काही शहरांमधील निवडक व्हिसा अॅप्‍लीकेशन सेंटर्समध्‍ये मर्यादित स्‍वरूपात कार्यसंचालनांना सुरूवात करणार

बेलारूस, डेन्‍मार्क, डोमिनिकन रिपब्लिक, आयर्लंड, इटली, नॉर्वे, पोर्तुगाल, दक्षिण कोरिया, तुर्की, युएई आणि युनायटेड किंग्‍डम येथील विशिष्‍ट व्हिसा विभागांसाठी व्हिसा प्रक्रिया सुरू होणार
 
व्‍हीएफएस ग्‍लोबल ही जगभरातील सरकार व मुत्‍सद्दी मिशन्‍ससाठी जगातील सर्वात मोठी व्हिसा आऊटसोर्सिंग व तंत्रज्ञान सेवा देणारी स्‍पेशालिस्‍ट कंपनी भारतातील संबंधित एम्‍बॅसीस/ कन्‍सुलेट्सच्‍या मान्‍यतेसह आणि आरोग्‍य व सुरक्षितताविषयक नियमांचे काटेकोर पालन करण्‍यासह मर्यादित शहरांमधील व्हिसा अॅप्‍लीकेशन सेंटर्स पुन्‍हा सुरू करत आहे.
  
संबंधित एम्‍बॅसीस/ कन्‍सुलेट्स, तसेच स्‍थानिक अधिका-यांनी मान्‍यता दिल्‍यानंतर व्‍हीएफएस ग्‍लोबलचे सेंटर्स विशिष्‍ट शहरांमध्‍ये निवडक देश व व्हिसा विभागांसाठी व्हिसा अर्ज स्‍वीकारतील. ग्राहकांना व्हिसा अॅप्‍लीकेशन सेंटर्सना भेट देण्‍यापूर्वी www.vfsglobal.com या संकेतस्‍थळाच्‍या माध्‍यमातून ऑनलाइन अपॉइण्‍टमेंट बुक करणे अनिवार्य असेल. 
 
कर्मचा-यांना सुरक्षित, उत्‍पादनक्षम कामाचे वातावरण मिळण्‍याच्‍या खात्रीसाठी, तसेच समुदायाचे कोविड-१९ कोरोना विषाणूपासून मोठ्या प्रमाणात संरक्षण करण्‍यासाठी व्‍हीएफएस ग्‍लोबलने सेंटर्समध्‍ये काटेकोरपणे पालन करावयाचे प्रमाणीकृत संरक्षणात्‍मक उपाय स्‍थापित केले आहेत. ज्‍यामध्‍ये सोशल डिस्‍टन्सिंग आणि सॅनिटायझेशन प्रक्रियेचा समावेश आहे. 

सेंटरच्‍या प्रवेशद्वारावर सर्व ग्राहकांच्‍या शरीराच्‍या तापमानाची तपासणी केली जाते. उच्‍च ताप, खोकला व श्‍वास घेण्‍यामध्‍ये त्रास होणे अशी कोविड-१९ संबंधित लक्षणे दिसून येणा-या ग्राहकांना केंद्रामध्‍ये प्रवेश करण्‍यास परवानगी देण्‍यात येणार नाही. तसेच सर्व ग्राहक आणि व्‍हीएफएस ग्‍लोबल कर्मचा-यांनी सेंटरमध्‍ये फेस मास्‍क परिधान करणे आणि सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य आहे. 

*युके व्हिसाबाबत अतिरिक्‍त माहिती:* 
*युके व्हिसा सेवा भारतातील ११ शहरांसोबत दक्षिण आशियामधील मर्यादित ठिकाणी सुरू होत आहे.* 
*• भारतातील ११ शहरांमधील प्रवासी ६ जुलै २०२० पासून युके व्हिसा अॅप्‍लीकेशन सेंटर्समध्‍ये त्‍यांचे व्हिसा अर्ज सबमिट करू शकतात.*

*• ६ जुलै २०२० पासून युके व्हिसा सेवा श्रीलंकामध्‍ये (कोलंबो) देखील सुरू होत आहे.*
 
*• सुरूवातीला ऑप्‍शनल प्रायोरिटी व्हिसा, सुपर प्रायोरिटी व्हिसा आणि वॉक-इन-सर्विसेसची सेवा देण्‍यात येणार नाही.*

*६ जुलै २०२० पासून भारतातील अहमदाबाद, बेंगळुरू (फक्‍त ग्‍लोबल टेक पार्क), चंदिगड, चेन्नई (स्‍थानिक लॉकडाऊन नियमांनुसार), जालंधर, कोची, हैद्राबाद, कोलकाता, मुंबई (फक्‍त महालक्ष्‍मी), नवी दिल्‍ली (फक्‍त शिवाजी मेट्रो स्‍टेडियम) आणि पुणे या ११ शहरांमधील निवडक व्हिसा अॅप्‍लीकेशन सेंटर्समध्‍ये युके व्हिसा आणि इमिग्रेशन सेवा पुन्‍हा सुरू होत आहे.* 

*६ जुलै २०२० पासून श्रीलंकेमधील (कोलंबो) देखील युके व्हिसा अॅप्‍लीकेशन सेंटर्स पुन्‍हा सुरू होत आहेत.*

*बंद राहणारी सेंटर्स:* 
दक्षिण आशियामधील सर्व इतर व्हिसा अॅप्‍लीकेशन सेंटर्स पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहतील. व्‍हीएफएस ग्‍लोबल या सेंटर्सवर यापूर्वी अपॉइण्‍टमेंट्स बुक केलेल्‍या ग्राहकांशी संपर्क साधेल आणि वेगळ्या ठिकाणी त्‍यांची अर्जपक्रिया पूर्ण करण्‍याची व्‍यवस्‍था करेल. 

*भारतातील पुढील शहरांमध्‍ये सेंटर्स बंद राहतील:* लखनऊ, गोवा, जयपूर, मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स सेंटर, दिल्‍लीमधील गुरगाव, बेंगळुरूमधील इलेक्‍ट्रॉनिक सिटी व व्‍हाईटफिल्‍ड सेंटर्स. या ठिकाणांमधील ग्राहक जवळच्‍या उपलब्‍ध ठिकाणी नवीन अपॉइण्‍टमेंट्स बुक करू शकतात. 

*पासपोर्ट कलेक्‍शन:* व्हिसा अर्जासंदर्भात निर्णय घेण्‍यात आला असेल तर व्‍हीएफएस ग्‍लोबल पासपोर्ट वितरित करण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यासाठी ग्राहकांशी संपर्क साधेल. 

*विद्यमान ग्राहक:* पूर्वीच्‍या अपॉइण्‍टमेंटवेळी उपस्थित राहू न शकलेल्‍या ग्राहकांना नवीन अपॉइण्‍टमेंट बुक करण्‍यासाठी त्‍यांच्‍या अकाऊंटमध्‍ये लॉग इन करण्‍याची सुविधा देण्‍यात येईल. GOV.UK वर अर्जप्रक्रिया पूर्ण केलेले, पण पूर्वी सेंटरमध्‍ये अपॉइण्‍टमेंट बुक न केलेले ग्राहक देखील ६ जुलै २०२० पासून अपॉइण्‍टमेंट बुक करू शकतात.

*ऑप्‍शनल सर्विसेस:* काही ऑप्‍शनल, प्रिमिअम सेवा देण्‍यात येणार नाही. ज्‍यामध्‍ये सुपर प्रायोरिटी व्हिसा, प्रायोरिटी व्हिसा (भेट देणा-या व्हिसासाठी), सेटलमेंट व्हिसांसाठी प्रायोरिटी व्हिसा, फ्लेक्‍झी टाइम सर्विस आणि वॉक-इन सर्विस यांचा समावेश आहे. ग्राहकांसाठी त्‍यांच्‍या ऑनलाइन कस्‍टमर जर्नीदरम्‍यान सेंटरला भेट देण्‍यापूर्वी उपलब्‍ध प्रिमिअम सेवांची यादी संकेतस्‍थळावर देण्‍यात येईल. 

*युके सीमेवर आरोग्‍यविषयक उपाय* 
सध्‍या सुरू असलेल्‍या कोविड-१९ प्रादुर्भावामुळे युकेमध्‍ये प्रवेश करण्‍याकरिता नवीन नियम तयार करण्‍यात आले आहेत. आम्‍ही आपणांस विनंती करतो की, कृपया प्रवास सुरू करण्‍यापूर्वी https://www.gov.uk/uk-border-control  येथे नवीन माहिती तपासा.

*काम, अभ्‍यास करण्‍यासाठी किंवा कुटुंबाला भेटण्‍यासाठी असलेला ३० दिवसांच्या व्हिसाची मर्यादा संपलेल्‍या ग्राहकांकरिता:*
काम, अभ्‍यास करण्‍यासाठी किंवा कुटुंबाला भेटण्‍यासाठी युकेला प्रवास करणारा ३० दिवसांचा व्हिसा संपलेले किंवा संपणार असलेले ग्राहक या वर्षाच्‍या अखेरपर्यंत मोफतपणे सुधारित वैधता तारखांसह रिप्‍लेसमेंट व्हिसासाठी विनंती करू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी https://www.gov.uk/guidance/coronavirus-covid-19-advice-for-uk-visa-applicants-and-temporary-uk-residents#outside-uk येथे भेट द्या. 


Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24