कौरातर्फे भारतातील महाराष्‍ट्र सरकारला १०,००० इनहेलर्स दान

कौरातर्फे भारतातील महाराष्‍ट्र सरकारला १०,००० इनहेलर्स दान
(कोविड-१९ महामारीचे निराकरण करण्‍यासाठी काम करत असलेली राज्‍यस्‍तरीय नोडल एजन्‍सी हाफकिन इन्स्टिट्यूटच्‍या माध्‍यमातून) ~हे दान कोरोना विषाणूशी (कोविड-१९) लढत असलेल्या अधिका-यांच्या प्रयत्‍नांना सहाय्य करणार~ कौरा (Koura), या ऑर्बिया अ‍ॅडवान्‍स कॉर्पोरेशन एस.ए.बी. डी सी.व्‍ही. (बीएमव्‍ही: ऑर्बिया*)चा भाग असलेल्‍या कंपनीने भारतातील महाराष्‍ट्र सरकारला १०,००० मेडिकल ग्रेड इनहेलर्स दान केल्याचे जाहीर केले आहे. दान करण्‍यात आलेल्‍या या इनहेलर्सच्‍या वितरणामागे या संकटाच्‍या काळामध्‍ये जगभरात कोविड-१९च्‍या लक्षणांचे निर्मूलन करण्‍यासाठी मागणी वाढली असताना भारतीय अधिका-यांना पुरवठा करण्‍यामध्‍ये साह्य करण्‍याचा उद्देश आहे. विषाणूच्‍या संपर्कात आलेले आणि पूर्वीपासून श्‍वसनविषयक आजार असलेले किंवा नसलेले रूग्‍ण श्‍वास घेण्‍यामध्‍ये होणा-या त्रासापासून आराम मिळण्‍यासाठी महत्त्वाचा उपाय म्‍हणून पीएमडीआयवर (प्रेशराईज्‍ड मीटर डोस इनहेलर्स) अवलंबून असण्‍याचे प्रमाण वाढत आहे. सध्‍याच्‍या कोविड-१९ विषाणूविरोधातील लढ्यामध्‍ये कौराचे कार्य महत्त्वाचे आहे. दमा व क्रोनिक ऑब्‍स्‍ट्रक्टिव्‍ह पल्‍मनरी डिसीज (सीओपीडी)साठी दररोज १०० दशलक्ष व्‍यक्‍तींद्वारे वापरण्‍यात येणारे जगातील ८० टक्‍के मेडिकल ग्रेड इनहेलर्स कौराने उत्‍पादित केलेल्‍या प्रोपेलेंट गॅसने युक्‍त आहेत. सहेतूक व्यवसाय समुदायांचा भाग म्‍हणून कौरा जगभरातील जीवन प्रगत करण्‍यामध्‍ये मदत करत जागतिक आव्‍हानांचे निराकरण करण्‍यामध्‍येही मदत करते. हे दान आवश्‍यक सहकार्य व उपाययोजना देण्‍याच्‍या माध्‍यमातून कोरोनाव्‍हायरस (कोविड-१९) महामारीविरोधात लढणा-या अधिका-यांच्‍या प्रयत्‍नांना सहाय्य करण्‍याचा उद्देश असलेल्‍या ऑर्बियाच्‍या अथक प्रयत्‍नांचा भाग आहे.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202