ऑडिओ ब्रँड 'ट्रूक'ने वायरलेस इअरबड्स 'फीट प्रो' लॉन्च केले

ऑडिओ ब्रँड 'ट्रूक'ने वायरलेस इअरबड्स 'फीट प्रो' लॉन्च केले


मुंबई, ६ जुलै २०२०: विलक्षण संगीतानुभवासाठी ऑडिओ ब्रँड 'ट्रूक' (truke) ने वायरलेस इअरबड्स 'फीट प्रो' लाँच केले आहेत. सर्वोच्च दर्जाचे, नावीन्यपूर्ण डॉल्फिन आकाराचे ओपन फिट इअरबड्समध्ये युनिव्हर्सल टाइप सी चार्चिंग इंटरफेस, १५ मिनिटे क्विक चार्ज केल्यावर १ तासाचे प्लेबॅक तसेच ९९ टक्के स्मार्टफोन आणि गेमिंग उपकरणांशी जुळू शकण्याची ताकद ही वैशिष्ट्ये आहेत. अॅमेझॉनवर हे केवळ ९९९ रुपयांना उपलब्ध आहे.

ट्रूक फिट प्रो इअरबड्स हे अतिशय कार्यक्षमतेने डिझाइन केलेले असून यात जास्तीत जास्त आरामदायीपणा आहे. २४ तास म्युझिक प्लेबॅक मिळण्यासाठी यात ५०० एमएएच चार्जिंग केसचा आधार आहे. बेसिल ग्रीन, रॉयल ब्लू आणि कार्बन ब्लॅक या तीन ट्रेंडी कलरमध्ये हे उपलब्ध असलेले हे ट्रू वायरलेस इअरबड्स तत्काळ उपकरणांशी कनेक्ट होते. तसेच त्याच्या १३ मिमि डायनॅमिक ड्रायव्हरद्वारे तंतोतंत ध्वनी ऐकवते.

ट्रूकचे संस्थापक आणि सीईओ पंकज उपाध्याय म्हणाले, ‘प्रीमियम साउंड क्वालिटी, विश्वसनीयता, परिधान करतानाचा आरामदायीपणा आणि इतर गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणारे नव्या काळातील अत्याधुनिक वायरलेस इअरफोन आणि साउंड अॅसेसरीज तयार करण्यासाठी ट्रूक वचनबद्ध आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील बहुतांश ब्रँड वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने ब-याच जास्त किंमतीत विकतात, असे आमचे निरीक्षण आहे. आम्ही नव्याने सादर केलेला ट्रूक फिट प्रो हा किफायतशीर, हाय टेक पर्याय असून तो या क्षेत्रातील महागड्या उत्पादनांप्रमाणेच ऐकण्याचा सर्वोच्च आनंद प्रदान करतो. हे उत्पादन भारतातील लोकांच्या श्रवणेंद्रीयांना यशस्वीरित्या उत्तेजन देईल अशी आम्हाला आशा आहे.”

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24