ऑल्टबालाजीआणि पेपॉईंटचे अधिक ओटीटी प्रसारासाठी सहकार्य

ऑल्टबालाजीआणि पेपॉईंटचे अधिक ओटीटी प्रसारासाठी सहकार्य

व्हिडीओ-ऑन-डिमांड सेवेसाठी ऑफलाइनची सुविधा हा या क्षेत्रातील या प्रकारचा पहिलाच उपक्रम

मुंबई, 7 जुलै, 2020: सध्याचे बाजारपेठेतील अस्तित्व अधिक बळकट करणे आणि नव्या बाजारपेठांमध्ये स्थान मिळवण्याच्या उद्देशाने ऑल्टबालाजी या देशातील आघाडीच्या देशी ओटीटी व्यासपीठ आणि पेपॉईंट इंडिया यांनी धोरणात्मक भागीदारी केली आहे. ग्रामीण आणि निमग्रामीण भागातील डिजिटल साह्य आणि ऑफलाइन सबस्क्रिप्शन पेमेंटचे पर्याय हवे असलेल्या ग्राहकांसाठी खासकरून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 
भारतभरातील पेक्षकांपर्यंत कंटेंट पोहोचवणारी ऑल्टबालाजीकंटेंटचे सर्वसामान्यकरण करण्यातील महत्त्वाची कंपनी म्हणून ओळखली जाते. पेपॉईंटचे भारतभरातील 45,000 हून अधिक तंत्रज्ञानाधारित रीटेलर्स आहेत. शिवाय, त्यांचे 80 टक्क्यांहून अधिक ग्राहक ग्रामीण आणि निमग्रामीण भागात असल्याने कंटेंट अधिक प्रमाणात उपलब्ध करून देत ऑल्टबालाजीला बाजारपेठांमध्ये अधिक सखोल विस्तार करता येणार आहे. ऑल्टबालाजीच्या चाहत्यांसाठी पेपॉईंट ऑफलाइन स्टोअरमधून अॅक्टिवेशनसाठी तसेच सबस्क्रिप्शनचे पैसे भरणे, रोख रकमेने नुतनीकरण करणे आणि घरबसल्या विविध प्रोग्राम्स मिळवणे यासंदर्भांत सहज मार्गदर्शन आणि साह्य मिळेल. यामुळे ऑल्टबालाजीच्या सबस्क्राइबर्सना सामान्यांसाठी तयार करण्यात आलेल्या 60 हून अधिक भारतीय ओरिजनल्स उपलब्ध होतील.
सध्याच्या महासंकटात ऑल्टबालाजीहा मुख्य प्रवाहातील मनोरंजनाला उत्तम पर्याय ठरत असून डिजिटल सबस्क्रिप्शनमध्ये वाढ अनुभवत आहे. लॉकडाऊनच्या आधी मार्च 2020 मध्ये दररोज 10,600 इतके सबस्क्रिप्शन होत होते. मात्र, लॉकडाऊननंतर या काळात 60 टक्के वाढ होऊन हा आकडा 17,000 पर्यंत वाढला आहे. पेपॉईंट ही आघाडीची ऑफलाइन-टू-ऑनलाइन (ओ2ओ) कंपनी गेल्या दहा वर्षांपासून भारतभरात कार्यरत आहे. ही कंपनी आता ऑल्टबालाजीसाठी रोख रक्कम जमा करण्याची सोय रीटेल आऊटलेटमध्ये देणार आहे. त्यामुळे ग्राहकांना ओव्हर-द-टॉप (ओटीटी) व्यासपीठांवर ताजा, अस्सल आणि गुंतवून ठेवणारा कंटेंट पाहता येणार आहे. 
ऑल्टबालाजीचे सीईओ आणि बालाजी टेलिफिल्म्सचे ग्रूप सीओओ नचिकेत पंतवैद्य म्हणाले, "आमच्या भारतीय प्रेक्षकांसाठी देशी ओरिजनल्स तयार करण्यावर आमचा भर असल्याने यातून कंटेंटचा सामान्यांपर्यंत विस्तार झाला. यातून दर्शकांच्या संख्येत वाढ झाली आहे आणि या भागात या व्यासपीठांवर व्यतित होणाऱ्या वेळेतही वाढ झाली आहे. त्यामुळेच, या ग्रामीण आणि निमग्रामीण बाजारपेठांमध्ये आमचे दमदार अस्तित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने पेपॉईंटसोबत केलेली धोरणात्मक भागीदारी म्हणजे या दिशेने टाकलेले सुयोग्य पाऊल ठरते. ग्राहकानुभव आणि बाजारपेठेतील व्यवहारांमध्ये सुलभता आणणारा आणखी एक टचपॉईंट आम्ही देऊ शकलो, याचा आम्हाला आनंद आहे. यातून, ग्राहकांमध्ये अधिक दृढ विश्वासाची भावना निर्माण करून आमच्या ग्राहकांसोबतच बंध आम्ही अधिक घट्ट करू शकू, यावर आमचा विश्वास आहे."
पेपॉईंट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक केतन दोषी म्हणाले, "ऑल्टबालाजीसारख्या सामान्यांच्या मनोरंजन पर्यायांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग भारताच्या ग्रामीण भागात आहे. मात्र, डिजिटल व्यवहारांमध्ये फारसे कुशल नसलेल्यांसाठी ही सेवा घेणे आणि ऑफलाइन रीचार्ज करण्यात काही अडचणी येतात. या भागीदारीमुळे या ग्राहकांना तात्काळ अॅक्टिवेशन आणि नुतनीकरण शुल्क भरता येणार आहे."
"व्हिडीओ-ऑन-डिमांड ओटीटी सेवेसाठी ऑफलाइन रीचार्ज सेवा पहिल्यांदाच उपलब्ध झाली आहे आणि हा या क्षेत्रातला पहिलाच उपक्रम आहे. या सहकार्यामुळे ऑल्टबालाजीला सबस्क्राइबर्सची संख्या वाढवणे शक्य होईल आणि भारताच्या कानाकोपऱ्यातील ग्राहकांना देण्यात येणाऱ्या विविध सेवांमध्ये पेपॉईंटला एका अभूतपूर्व सेवेची भर घालता येईल," असे केतन पुढे म्हणाले.
या सहकार्यामुळे ऑल्टबालाजीला हे ओटीटी व्यासपीठ सामान्यांपर्यंत नेणे आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून आपल्या ग्राहकसंख्येत दमदार वाढ करणे शक्य होणार आहे. डेस्कटॉप, लॅपटॉप्स, टॅबलेट्स, स्मार्टफोन्सपासून इंटरनेट रेडी टेलिव्हिजनपर्यंत विविध इंटरफेसवर उपलब्ध असणारी ही सबस्क्रिप्शनवर आधारित व्हिडीओ ऑन डिमांड (एसव्हीओडी) सेवा आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि गुंतवून ठेवणाऱ्या कथानकांना एकत्र आणणार आहे. सर्व प्रकारच्या ग्राहकांना भावतील अशा 60 हून अधिक प्रकारातील ओरिजनल्सच्या व्यापक संग्रहासह ऑल्टबालाजीवरील शो म्हणजे थ्रिलर, ड्रामा, रोमान्स, युथ ड्रामा, हॉरर, कॉमेडी अशा अनेक प्रकारांचा संगम आहे. या व्यासपीठावर उपलब्ध किंवा येऊ घातलेला प्रत्येक शो हा विविध भौगोलिक आणि सामाजिक गटातील प्रेक्षकांच्या आवडीनिवडींचा विचार करून तयार करण्यात आला आहे. 'अपहरण', 'मेंटलहूड', कोड एम', 'कहने को हमसफर है', 'कर ले तू भी मोहोब्बत', 'एम-ओ-एम मिशन ओव्हर मार्स', 'कोल्ड लस्सी और चिकन मसाला', द वर्डिक्ट-स्टेट वर्सेस नानावटी', 'ब्रोकन... द ब्युटिफुल', 'रागिनी एमएमएस रीटर्न्स', 'टेस्ट केस', 'बेस' असे अनेक ख्यातनाम शोजचा वारसा ऑल्ट बालाजीकडे आहे आणि या शोजना प्रेक्षकांनी प्रचंड पसंती दिली आहे.
पेपॉईंट हे फास्ट-मुव्हिंग कन्झ्युमर सर्विसेसच्या अंतिम पुरवठ्यातील एक विश्वासार्ह भागीदार आहे. बिलांचा भरणा,

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24