पियाजिओतर्फे भारतातील व्‍यावसायिक वाहन क्षेत्रामध्‍ये अनोखे ई-कॉमर्स व्‍यासपीठ सादर - युआरएल - www.apeautomall.com

पियाजिओतर्फे भारतातील व्‍यावसायिक वाहन क्षेत्रामध्‍ये अनोखे ई-कॉमर्स व्‍यासपीठ सादर - युआरएल - www.apeautomall.com

जदल व सुलभ एण्‍ड-टू-एण्‍ड ऑनलाइन खरेदी अनुभव, फायनान्‍स ऑफर्स आणि होम डिलिव्‍हरी
मुंबई: पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि. भारताच्‍या लहान व्‍यावसायिक वाहनांच्‍या आघाडीच्‍या उत्‍पादक कंपनीने आज त्‍यांच्‍या व्‍यावसायिक वाहनांसाठी भारतातील व्‍यावसायिक वाहन क्षेत्रातील अनोखे व नवीन ई-कॉमर्स व्‍यासपीठ सादर केले.

पियाजिओने यापूर्वीच १० जून २०२० रोजी उत्‍पादनांच्‍या दुचाकी रेंजसाठी ई-कॉमर्स वेबसाईट सादर केली होती. आता व्‍यावसायिक वाहन ग्राहकांच्‍या आवश्‍यकता लक्षात घेत त्‍यांचा व्‍यावसायिक वाहन ब्रॅण्‍ड 'आपे' साठी नवीन ई-कॉमर्स व्‍यासपीठ सादर करण्‍यात आले आहे. या नवीन ई-कॉमर्स व्‍यासपीठामध्‍ये स्‍थानिक कनेक्ट व प्रमाणीकृत डिलिव्‍हरी अनुभवासाठी भारतभरातील सर्व पियाजिओ व्‍यावसायिक वाहन डिलरशिप्‍सचा समावेश आहे. 

ग्राहकाने त्‍याच्‍या शहराची निवड केल्‍यानंतर त्‍या बाजारपेठेमध्‍ये लागू असलेले मॉडेल्‍स दिसतील. ज्‍यामुळे ग्राहकांना योग्‍य निवड करणे सोईस्‍कर जाईल. ग्राहक या व्‍यासपीठावर उत्‍पादनाची वैशिष्‍ट्ये आणि तंत्रज्ञान माहिती देखील प्राप्‍त करू शकतात. ग्राहक त्‍यांच्‍या शहरासाठी एक्‍स-शोरूम व ऑन-रोड किंमतीची माहिती मिळवू शकतात, त्‍यांच्‍या ईएमआयचे गणन करू शकतात, त्‍यांच्‍या पसंतीच्‍या फायनान्शियरकडे कर्जासाठी अर्ज करू शकतात आणि फक्‍त १०००/- रूपये भरत ऑनलाइन बुकिंग करू शकतात. बुकिंग रक्‍कमेचे पेमेण्‍ट्स ग्राहकांच्‍या आवडीनुसार पे वॉलेट्स, नेट-बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड अशा विविध पर्यायांच्‍या माध्‍यमातून सुरक्षितपणे करू शकतात. पियाजिओने ग्राहकांना विविध फायनान्‍स पर्याय दिले आहेत, ज्‍यामुळे ग्राहक स्‍वत:हून व्‍यासपीठावर कर्जाच्‍या आवश्‍यक रक्‍कमेसाठी अर्ज करू शकतात. कागदपत्र व्‍यवहार पूर्ण होण्‍यासह पेमेण्‍ट प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर निवडण्‍यात आलेले वाहन सर्व सुरक्षितताविषयक नियमांचे पालन करत प्रशिक्षित डिलरशशिप कर्मचारीच्‍या माध्‍यमातून ग्राहकांना घरपोच डिलिव्‍हर करण्‍यात येईल. 

या सादरीकरणाबाबत बोताना पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि.चे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. डिएगो ग्राफी म्‍हणाले, ''तीनचाकी कार्गो विभागामधील आघाडीचा ब्रॅण्‍ड आणि आघाडीचा लघु व्‍यावसायिक वाहन ब्रॅण्‍ड म्‍हणून पियाजिओचा बदलत्‍या खरेदी पद्धतींसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा व उपाययोजना देण्‍यावर विश्‍वास आहे. व्‍यावसायिक वाहन क्षेत्रामध्‍ये या अद्वितीय व्‍यासपीठाच्‍या सादरीकरणामुळे आमचे ग्राहक शोरूमला भेट दिल्याशिवाय त्‍यांच्‍या घरांमधूनच आरामशीरपणे त्‍यांच्‍या आवडीचे मॉडेल बुक करू शकतील. आमचा विश्‍वास आहे की, भारतीय सीव्‍ही क्षेत्रातील ही अनोखी ऑफरिंग आमच्‍या ग्राहकांना अनेक पद्धतीने लाभ देईल. आम्‍ही बदलत्‍या काळानुसार गरजांची पूर्तता करण्‍यासाठी आमची उत्‍पादने व प्रक्रियांमध्‍ये सातत्‍याने नाविन्‍यता आणत आहोत. आम्‍ही आमच्‍या ग्राहकांसाठी भावी काळात अनेक उपक्रम सादर करण्‍याचे नियोजन केले आहे.''

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24